शाळा-कॉलेज: निरोप समारंभ मराठी भाषण । Farewell/Send off speech in Marathi

Send off speech in Marathi: मित्रानो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला आपल्या प्रिय सोबतीनां सोडून जावे लागते आणि बऱ्याचदा अश्या वेळी निरोप समारंभाचे आयोजन देखील केले जाते. पण खूप साऱ्या मित्राना प्रश्न पडतो कि निरोप समारंभ भाषण कसे द्यावे? 

शाळा कॉलेजमधे देखील 10 वी निरोप समारंभ भाषण मराठी द्यावे लागते. आजच्या या लेखात आपण आहोत निरोप समारंभ भाषण, Send off speech in Marathi, दहावी निरोप समारंभ भाषण मराठी इत्यादि पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.. 
शाळा कॉलेज निरोप समारंभ - Farewell Speech in Marathi

1) निरोप समारंभ भाषण - Send Off Speech in Marathi

नमस्कार मंडळी,

येथे जमलेल्या आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रमंडळींनो. माझे नाव (तुमचे नाव) आहे आणि मला आशा आहे की आपण सर्वजण मला ओळखतच असाल. आज आपण सर्वजण याठिकाणी निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी जमलो आहोत.

आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्यासोबत शिकणाऱ्या सर्व मित्र मंडळीं  व आम्हाला शिकवणाऱ्या शिकांसाठी अत्यंत भावूक दिवस आहे, आज नंतर कदाचितच आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल. कारण आज नंतर प्रत्येक जण पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या कॉलेज मध्ये निघून जातील. काही जण जॉब करण्यासाठी जातील. एकंदरीत आपण सर्वजण एकमेकांपासून वेगळे होऊ आणि सोबत राहतील त्या फक्त आठवणी गोड, कडू, मस्तीखोर आणि खोडकर आशा सर्व आठवणी....

मला आज असे वाटत आहे जसे माझ्या आयुष्यातून काहीतरी अत्यंत महत्वाचे सुटून जात आहे. खरे पाहता काहीतरी नाही तर खूप काही सुटत आहे आणि कदाचित आयुष्याचं सुटत आहे…! मला अजूनही तो कॉलेज मधील पहिला दिवस आठवतो जेव्हा मी अतिशय शांत पण बसलो होतो. डोळ्यात भय आणि कदाचित अश्रू पण होते. आश्चर्याची गोष्ट आहे आज सुद्धा माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. परंतु आजच्या अश्रुंचे कारण भीती नव्हे तर हे अश्रू या साठी आहेत कारणं मी तुम्हा सर्वांसोबत जो वेळ घालवला तो मला परत मिळणार नाही. मित्रांनो माझ्या आयुष्यात एक आई-वडील आणि दुसरे तुम्ही सर्वजण आहेत ज्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. 

तुम्हा सर्वांचे अत्यंत हृदयापासून धन्यवाद.. तुम्ही मला खऱ्या अर्थाने जगणे शिकवले. जर कळत नकळत माझ्या कळून काही चूक झाली कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला त्याबद्दल क्षमा करावी. शेवटी परमेश्वराला हीच प्रार्थना आहे की आपण सर्व जिथेही राहू तेथे आनंदाने आणि सुखाने राहू व आयुष्यात उत्तम प्रगती करू... धन्यवाद!

***


सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी संदेश <<येथे वाचा


2) 10 वी 12 वी निरोप समारंभ भाषण मराठी | Farewell/Send off Speech in Marathi

सहवास सुटला म्हणून, सोबत सुटत नाही 
आणि नुसता निरोप दिल्याने, नाते तुटत नाही...

अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, काही वर्षांपूर्वी या हायस्कूल च्या वट वृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपणासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे.

वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल
पंखात भरलेल्या विचार बळाने,
भारारीला सिद्ध व्हावे लागेल...!

आज माझ्या सोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झाली आहे. अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहे. 

घेतांना आज निरोप शाळेचा, आले भरूनिया डोळे
शाळेतील दिवस बनले, स्मारणाच्या पुस्तकातील पाने.

काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो. शिल्पकार ज्या पद्धतीने ओबड धोबड दगडा पासून सुंदर शिल्प घडवतो, त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजनांनी उत्तम संस्कार केले. आभ्यासाबरोबर क्रीडा, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली. 21 व्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले.

सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नवी आशा,, शोध घेण्याची जबर मानशा.
याच शाळेने लावले वळण, त्यावर चढवू यशाची चढण.

ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे. या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, समूहगीत, बालगीते शिकलो. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आमचा पाय पक्का केला. आज माझ्या नजरेसमोर अनेक प्रसंग तरळत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन त्याजागी घट्ट नाते संबंध निर्माण झाले आहेत. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो, एकत्र जेवण केले, एकत्र अभ्यास केला. सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती, वृक्षप्रेम, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, मोठ्यांचा आदर, एकमेकास सहकार्य इत्यादी गोष्टी मी याच शाळेत शिकलो. स्नेहसंमेलन, सहली, विज्ञान प्रदर्शन, व्याख्यान, विविध स्पर्धा या दरम्यान अनेक अनुभव मिळाले. 

थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी च्या प्रसंगी शिक्षकांनी सांगितलेले विचार आजही आमच्या मनात आहेत. प्रत्येक परीक्षेला वाटणारी धास्ती आमच्या शिक्षकांनी दूर केली. या शाळेत मी फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवाव हे देखील शिकलो. केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा व मराठी वर प्रेम करायला शिकलो.

गाठली जरी आम्ही, भव्य दिव्य शिखरे
आमची तू जन्मदात्री, आम्ही तुझीच पाखरे,
देऊनी बळ पंखांना, तू करिते प्रतिपाळा,
सर्वाहून निराळी, माझी शाळा....

अश्या प्रकारे या शाळेने मला आभ्यसाचे विषयच न शिकवता जगावे कसे हे शिकवले. मला खात्री आहे की या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार आहे.

***

तर मित्रांनो हे होते निरोप समारंभ  मनोगत व भाषण (Nirop Samarambh Bhashan) - send off speech in Marathi व 10, 12 निरोप समारंभ भाषण मराठी Farewell speech in Marathi. आशा करतो की ही मराठी भाषणे तुम्हाला आवडली असतील. आम्हाला कमेन्ट मध्ये तुमचे विचार नक्की कळवा. धन्यवाद


आधिक वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

7 टिप्पण्या

  1. अप्रतिम भाषण 😊👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम भाषण 😊👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻


    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने