खो खो खेळाची माहिती मराठी | Kho Kho Information in Marathi

Kho Kho Information in Marathi : नमस्कार या पोस्ट मध्ये आम्ही आपल्याला खो खो खेळाची माहिती मराठी देणार आहोत. खो खो हा खेळ आपण सर्वांनाच माहित असेल व आपल्या लाहानपणात आपण कधी न कधी हा खेळ खेळलाच असेल. खो खो या खेळाला पारंपारिक खेळ म्हणूनही ओळखले जाते. हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जात आहे व म्हणून खूप लोकप्रिय देखील आहे. 

खो खो हा एक मैदानी खेळ असून या खेळाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासोबत खो खो खेळाची माहिती मराठी भाषेतून शेअर करीत आहोत. या लेखात आपल्या खो खो खेळाची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये खो खो चे खेळाडू, इतिहास, मैदान, नियम, कौशल्य इत्यादि विषयांची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर चला सुरू करूया.


खो खो खेळाची माहिती मराठी

खो खो खेळाची माहिती मराठी - Kho Kho Information in Marathi

खो खो खेळाची माहिती व खो खो चे नियम, इतिहास, खेळाडू संख्या, मैदान व खो खो चा खेळ कसा खेळावा इत्यादि सर्व विषयांची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.


खो खो खेळाचा इतिहास - Kho Kho History in Marathi

खो खो हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात आहे. या खेळाची सुरुवात भारतातील महाराष्ट्र या राज्यातून पकडण्याच्या खेळापासून झाली. सर्वात आधी १९ व्या शतकामध्ये खो खो हा खेळ महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये खेळला जाऊ लागला. १९१४ मध्ये पूणे येथील जीमखान्यामध्ये खो खो खेळाचे नियम बनविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. १९२४ मध्ये बडोदा येथील जीमखान्याने खो खो चे नियम प्रकाशित केले. आणि अशा प्रकारे खो खो हा खेळ खेळायला सुरुवात झाली. यानंतर १९६० च्या दरम्यान आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे भारत सरकारने खो खो खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा पार पाडली. 


खो खो साठी आवश्यक खेळाडू संख्या - Players in Kho Kho Marathi

खोखो हा दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे. हा खेळ खेळण्यासाठी एका  संघामध्ये १२ खेळाडू असणे आवश्यक असते. १२ खेळाडूंमधील ९ खेळाडू खो खो खेळतात आणि तीन खेळाडू हे राखीव असतात. जेव्हा मैदानावर कोणत्या खेळाडू ला दूखापत होते किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे खेळाडू खो खो खेळू शकत नसेल तर त्या वेळी राखीव खेळाडूंना त्यांच्या जागी खो खो खेळण्याची संधी दिली जाते. खो खो हा खेळ खुप सोपा आहे पण हा खेळ वेगाने खेळला जातो. हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूंच्या अंगात चपळता असणे आवश्यक असते.


खो खो खेळाचे मैदान माहिती - Kho Kho Ground in Marathi

खो खो खेळासाठी मैदान हे आयताकृती आकाराचे असते. खो खो खेळासाठी मैदानाचा आकार २७ बाय १६ मीटर असणे आवश्यक असते. खो खो खेळण्यासाठी मैदानाच्या दोन्ही बाजूला दोन लाकडाचे खांब उभे केले जातात.या दोन खांबांना एक लेन असते. आणि या देशाचे परिमाण २४ मीटर बाय ३० सेंटीमीटर असणे आवश्यक असते. खो खो खेळाच्या मैदानात धरणे मध्यवर्ती लेन ओलांडून ८ क्राॅस असतात. याचे परिमाण १६ मीटर बाय ३५ सेंटी मीटर असते. मध्यभागी लहान चौरस असतात. त्यांचा आकार १६ मीटर बाय २.३ मीटर असते.


खो खो खेळाचे नियम - Rules of Playing Kho Kho in Marathi

खो खो खेळाची माहिती मराठी - kho kho information in marathi मध्ये आता आपण खो खो खेळण्याचे नियम काय आहेत या विषयी ची माहिती प्राप्त करून घेऊया.

 • खो खो हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ असणे गरजेचे असते. 
 • प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असणे आवश्यक आहे.
 • १२ खेळाडूंमधील ९ खेळाडू मैदानामध्ये खेळू शकतात. बाकीचे ३ खेळाडू हे राखीव असतात. ९ खेळाडूंमधील कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे खो खो न खेळू शकल्यास ३ राखीव मधील १ राखीव खेळाडू खो खो खेळू शकतो. 
 • बचाव करणाऱ्या संघातील ३ खेळाडूच एका वेळेला मैदानात पळू शकतात. 
 • खो खो खेळामध्ये संवरक्षक आणि आक्रमक हे दोन संघ असतात. या दोन्ही संघांना ९ मिनिटांच्या दोन भागांमध्ये खो खो खेळायचे असते. 
 • बचाव करणारा खेळाडू दोन खांबांमधील रेषा ओलांडून पळू शकतो पण पाठलाग करणारा खेळाडू दोन खांबांमधील रेषा ओळांडू शकत नाही. 
 • जेव्हा बचाव गटातील तीन खेळाडू खेळामधून बाद होतात त्याच्या नंतर पुढील तीन खेळाडू खो खो खेळण्यासाठी मैदानात घेतले जातात. 
 •  जेव्हा पाठलाग करणारा खेळाडू पाठलाग करण्यासाठी कोणतीही एक दिशा पकडतो त्याच्या नंतर पाठलाग करणारा खेळाडू दिशा बदलू शकत नाही. 
 • पाठलाग करणाऱ्या खेळाडूने पाठीवर थाप मारून खो बोलणे आवश्यक असते आणि त्यानंतर ज्या खेळाडू चर्या पाठीवर थाप मारली आहे त्याने उठून पाठलाग करायला सुरुवात करायची असते.
 • पाठलाग करणारा खेळाडू ज्या दिशेला पाठलाग करत असेल त्या दिशेला पाठ करून बसलेल्या खेळाडूला खो देऊ शकतो.
 • जर पाठलाग करणाऱ्या खेळाडूला पळण्याची दिशा बदलायची गरज असेल तर पाठलाग करणारा खेळाडू बसलेल्या खेळाडूला खो देऊन दिशा बदलू शकतो.
 • खो खो च्या खेळामध्ये दोन पंच , एक सरपंच आणि एक गुण लेखक असणे आवश्यक असते. खो खो खेळाचा निकाल सर्व‌ गुणांची बेरीज करून देणे आवश्यक असते. 


खो खो खेळ कसा खेळला जातो ? - How to Play Kho Kho in Marathi

खो खो खेळामध्ये बचाव करणारे खेळाडू आणि पाठलाग करणारे खेळाडू असे दोन संघ असतात. मैदानामध्ये पाठलाग करणाऱ्या संघाचे ९ खेळाडू मैदानामध्ये असतात आणि बचाव करणार्या खेळाडूंच्या संघामधील ३ खेळाडू मैदानामध्ये असतात. मैदानामध्ये ८ चौरस असतात. या चौरसांमध्ये प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला‌ असतो. ९ वा खेळाडू ने बचाव करणाऱ्या खेळाडूंचा पाठलाग करण्यासाठी खांबाजवळ उभे राहायचे असते. 

खो खो खेळ सुरू झाल्यानंतर पाठलाग करणाऱ्या खेळाडूने बचाव करणाऱ्या खेळाडूचा पाठलाग करायचा असतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूने बचाव करणाऱ्या खेळाडूला पकडून आउट करायचे असते. जर पाठलाग करणाऱ्या खेळाडूला बचाव करणाऱ्या खेळाडूला पकडणे शक्य नसेल तर बसलेल्या खेळाडूंना खो देऊन त्याच्या जागी बसायचे असते. अशा प्रकारे खो खो हा खेळ खेळला जातो. खो खो खेळाची माहिती मराठी मध्ये खो खो खेळ कसा खेळला जातो हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.


खो खो खेळण्यासाठी कौशल्य - Skills for Playing Kho Kho

खो खो हा खेळ खेळण्यासाठी सोपा आहे. परंतु खो खो खेळामध्ये जिंकण्यासाठी कौशल्य असणे महत्त्वाचे असते. खो खो खेळ खेळण्यासाठी खेळाडू मध्ये चकवा देण्याचे कौशल्य असणे महत्त्वाचे असते. ज्या खेळाडूला चांगला चकवा देता येत असेल तो खेळाडू खो खो या खेळामध्ये चांगले यश प्राप्त करू शकतो. खो खो खेळामध्ये यश मिळविण्यासाठी खेळाडू मध्ये वेगवान धावण्याचे , योग्य पकड करण्याचे त्याचप्रमाणे बचावकर्त्याला पाहून बसलेल्या खेळाडूंना योग्य खो देण्याचे कौशल्य असले पाहिजे. हा खेळ खेळण्यासाठी अंगामध्ये चपळता असणे आवश्यक आहे.


खो खो चे प्रसिद्ध  खेळाडू - Famous Kho Kho Player in Marathi

kho kho information in marathi मध्ये आता खो खो चे प्रसिद्ध खेळाडू कोणते आहेत याविषयीची माहिती प्राप्त करणार आहोत. 

सारीका‌ काळे

सारीका काळे ही मराठावाडा मधील उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर गावामध्ये राहणारी प्रसिद्ध खो खो खेळाडू आहे. सारीका काळे हीची कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. तिचे वडील अपंग होते. आई आणि आजीच्या मेहनतीमुळे तीने आपले शिक्षण पुर्ण केले. इयत्ता पाचवी मध्ये असतानाच तिने खो खो खेळून यश मिळविण्याची सुरुवात केली. 2006-2007 मध्ये सारीका काळे हीची प्रथमच खो खो खेळण्यासाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. त्यानंतर तिची सलग 20 राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. खो खो खेळामध्ये तिने 12 सुवर्ण , 4 रौप्य व 4 कांस्य पदे मिळवली. 2010-11 मध्ये सारीका काळे हीची प्रथमच महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड झाली. तिला छत्तीसगढ मध्ये सुवर्ण पदक मिळाले. सारीका काळे ही तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून होती. 

2015-16 मध्ये सारीका काळे ची प्रथमच भारतीय संघात निवड झाली व तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. 2016 मध्ये तिची आसाम गोहाटी येथे कर्णधारपदी निवड झाली . तिथे देखील तिने सुवर्णपदक मिळविले. अशाप्रकारे सारीका काळे हिने खो खो या खेळासाठी खुप मेहनत केली. उपाशी राहून ही तिने या खेळाचा सराव केला व भारताचे नाव उंच करून खुप यश प्राप्त केले. 


वरील पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासोबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध खेळ खो खो खेळाची माहिती मराठी - (Kho Kho Information in Marathi) मध्ये शेअर केली आहे. आशा आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि आपल्या अभ्यासात ही माहिती उपयोगी ठरली असेल. ही खो खो खेळाची माहिती आपण आपल्या मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. 


इतर लेख 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने