असे जगावे स्वाध्याय | Ase Jagave Kavita Swadhyay in Marathi

पुढील लेखात इयत्ता सातवी मराठी चा 15 वा धडा असे जगावे चा स्वाध्याय - Ase Jagave Kavita Swadhyay in Marathi देण्यात आलेला आहे.  

हा स्वाध्याय आपण अभ्यासू शकतात आणि याद्वारे परीक्षेची योग्य तयारी करू शकतात. तर चला सुरू करूया.. 


असे जगावे कविता स्वाध्याय


असे जगावे कविता स्वाध्याय | Ase Jagave Swadhyay in Marathi 

प्र. १. जोड्या लावा.

  1. कवेत अंबर घेताना       -   (ई) पाय जमिनीवर असावेत.
  2. काळीज काढून देताना  -  (इ) ओठांवर हसू असावे.
  3. शेवटचा निरोप देताना   -  (अ) जगाला गहिवर यावा.
  4. इच्छा दांडगी असेल तर  -  (आ) अनेक मार्गमिळतात.

प्र. २. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

उत्तर: “असे जगावे” या कवितेत कवि म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान, भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यू नंतर शेवटचा निरोप देत असतांना सर्वांना गहिवरून यायला हवे. आशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते.


प्र. ३. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा

उत्तर: प्रत्येक संकटाला ठणकावून सांगावे की मी तुला अजिबात घाबरत नाही. येणारे प्रत्येक संकट अत्तराप्रमाणे छातीवर घ्यावे. नजरेत नजर म्हणजेच डोळ्याला डोळा भिडवून आयुष्याला व आयुष्यातील संकटांना उत्तर द्यावे. थोडक्यात संकटाला कधीही घाबरू नये व येणाऱ्या प्रत्येक संकटाचा निडरपणे सामना कराव हे कवितेद्वारे सांगितलेले आहे.


प्र. ४. ‘संकटांना न घाबरता तोंड द्यावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. 

उत्तर: संकटांना कशा पद्धतीने न घाबरता तोंड दिले जाते याविषयी माझ्या वाचनात आलेला शिवाजी महाराजांच्या काळातील बाजी प्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचा प्रसंग पुढील प्रमाणे आहे;

स्वराज्याच्या शत्रू पक्षातील सरदार सिद्दी जौहरने पन्हाळ गडाला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे हे विशालगडाकडे निघाले होते. रायाजी बांदल,फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते. त्या वेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन सिद्धी जोहरचे सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्दीच्या सैन्यासाठी त्यांचा मृत्यू म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. 


प्र. ५. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.

कवितेद्वारे कवि म्हणतात की संकटांना न घाबरता डोळ्यात डोळा भिडवून सामोरे जावे. कुठल्याही अंधश्रद्धा मानू नये. ज्याची काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते त्याला मार्ग नक्की सापडतो. याशिवाय आयुष्यात आपल्याला कितीही यश प्राप्त झाले तरी यशप्राप्तीचा अहंकार करू नये. कवितेच्या शेवटच्या ओळीत कवि म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान, भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यू नंतर शेवटचा निरोप देत असतांना सर्वांना गहिवरून यायला हवे. आशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते.


(अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.

(१) नजर रोखणे.                      -                (इ) निर्भयपणे पाहणे. 

(२) पाय जमिनीवर असणे .       -                (अ) वास्तवाचे भान ठेवणे. 

(३) गगन ठेंगणे होणे .              -                (ई) खूप आनंद होणे.

(४) कवेत अंबर घेणे .              -                (उ) अशक्य गोष्ट शक्य करणे.

(५) काळीज काढून देणे .         -                (आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. 


(आ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१) अत्तर                                -                उत्तर

(२) ताऱ्यांची                           -                स्वप्नांची

(३) जाताना                            -                देताना


(इ) खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.

(१) पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.

उत्तर: पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना.

(२) असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर

उत्तर: असे जगावे, छाताडावर संकटांचे लावून अत्तर

(३) असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.

उत्तर: असे दांडगी इच्छा ज्याची, रस्ते तयाला मिळती सत्तर.

(४) नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.

उत्तर: नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला द्यावे उत्तर.

(५) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर.

उत्तर: स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कापरा कापरा.


तुम्हांला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा. 
विचार करा. सांगा.

(१) तुम्हांला मोबाईल/संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात?

उत्तर: मला मोबाइल मधील व्हाटसप्प, फेसबूक, इनस्टाग्राम, ऑक्सफोर्ड डिक्शनरी, माइंड मास्टर इत्यादि ॲप्स वापरायला आवडतात.

(2) अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.

उत्तर: अभ्यास करण्यासाठी मी प्रामुख्याने गूगल आणि यूट्यूब या दोन अप्प्स चा उपयोग करीत असतो. अनेकदा मला एखाद्या विषयाचे शिक्षकांनी शिकवलेले आठवत नसल्यास मी यूट्यूब वर त्या विषयाच्या धड्याचे विडियो पाहतो व याशिवाय मी गूगल सर्च करूनही अभ्यासविषयी च्या अनेक समस्या सोडवीत असतो. 

(3) या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास/नसल्यास का ते सांगा.

उत्तर: प्रत्येक ॲप हे काही न काही महत्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठीच बनवले जाते. व म्हणून जर आपल्याला आपले एखादे कार्य लवकर पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी या अप्प्स चा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु प्रमाणाबाहेर व गरज नसतांना मोबाइल ॲप्स चा उपयोग करणे चुकीचे आहे.

(4) मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल ?

उत्तर: आजकालच्या आधुनिक युगात अनेक वाईट बुद्धीची लोक ऑनलाइन ठगी करण्याच्या उद्देशाने ॲप्स बनवत असतात. म्हणून कुठलेही ॲप इंस्टॉल करायचे असल्यास ते फक्त प्लेस्टोर वरूनच करावे. व कुठल्याही ॲप मध्ये आपल्या बँक अकाऊंट ची माहिती भरू नये. 


तुम्हांला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात? त्यासाठी कोणती  ॲप्स तयार व्हावीत असे तुम्हांला वाटते?

उत्तर : मराठी भाषेचा अभ्यास करीत असतांना मला मराठी व्याकरण विषयी अनेकदा समस्या येतात. परंतु मराठी व्याकरण दुरुस्ती करणारे अथवा व्याकरण शिकवणारे एकही ॲप इंटरनेट वर उपलब्ध नाही. म्हणून माझी इच्छा आहे की मराठी भाषेत व्याकरण शिकवणारे व मराठी व्याकरणाच्या चुका दुरुस्त करून देणारे एखादे ॲप बनवायला हवे.


तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी असे जगावे स्वाध्याय - Ase Jagave Kavita Swadhyay in Marathi या इयत्ता सातवी च्या मराठी कवितेचा स्वाध्याय दिलेला आहे. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल आणि हा लेख आपला शालेय अभ्यास पूर्ण करतांना व परीक्षेची योग्य तयारी करीत असतांना आपल्याला नक्कीच उपयोगी ठरेल.  

इतर धडे

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने