जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती | Hibiscus Flower Information in Marathi

जास्वंद फुलाची माहितीHibiscus Information in Marathi : नमस्कार मित्रांनो आपल्या सभवतीच्या परिसरात अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुले पाहायला मिळतात. काही फुले ही दिसण्यात सुंदर व वेगवेगळ्या रंगाची असतात तर काही पांढरी असूनही त्यांचा सुगंध मोहित करणारा असतो. 

आजच्या या लेखात आपण अश्याच एक सुंदर दिसणाऱ्या फुलाबद्दल माहिती पाहणार आहोत आणि या फुलाचे नाव आहे जास्वंदाचे फुल. जास्वंद फुलाची माहिती | Hibiscus Flower Information in Marathi

जास्वंदीच्या फुलाला इंग्रजीत हिबिस्कस आणि शु फ्लॉवर म्हटले जाते. हिंदी भाषेत याला गुडहल म्हणतात. जगभरात जास्वंदीच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती वेगवेगळ्या रंगामध्ये आढळतात. या फुलाचे झाड मोठ मोठ्या झुडपां चे असते व हे झाड 15 फूट पर्यंत वाढते. जास्वंदीची फुल दीर्घ कालावधी पर्यंत जिवंत राहू शकतात. या फुलाला भगवान गणपतीच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात वाहिले जाते. या शिवाय यांच्यात अनेक औषधीय गुण देखील आहेत. 


जास्वंद फुलाचे फायदे व उपयोग Jaswand information in Marathi

 • जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्यांना कुटून रस बनवला जातो व या रसाला शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी पिले जाते. 
 • दररोज जास्वंदीच्या दोन पाकळ्या खाल्याने चेहऱ्यावर तेज येतो आणि केस काळे राखण्यात मदत मिळते. 
 • अतिउष्णता, मूळव्याध, केस गळती या समस्या मध्ये जास्वंद उपयोगात येते. 
 • उन्हाळ्यात 1 ग्लास पाण्यात जास्वंदीचे पाने बुडवून ठेवावीत व रोज संध्याकाळी या पाण्याचे सेवन करावे. असे केल्याने उन्हामुळे होणारा उष्णतेचा त्रास कमी होतो.
 • जखम किंवा मुक्का मार लागल्यावर जास्वंदीच्या फुलांचा रस लावल्याने जखम लवकर बरी होते. 
 • टक्कल पडली असल्यास जास्वंदीच्या फुलांचा रस खोबरेल तेलात मिसळून दररोज डोक्यावर लावावे या मुळे नवीन केस उगणे सुरू होईल.
 • जर केस वया आधीच पांढरे होत असतील तर जास्वंदी चा रस केसांना लावावा.
 • पचन क्रियेत बिघाड झाल्यावर पांढर्या जास्वंदीच्या फुलांना कुटून त्यांना खडी सखरच्या पाण्यात टाकून प्या असे केल्याने पोटा संबंधी विकार दूर होतात.


गुलाब फुलाची माहिती <<वाचा येथे 

जास्वंदाच्या फुला बद्दल महत्वाची माहिती Jaswand flower information in Marathi

 • जास्वंदीचे फुल दाट झाडीमध्ये लागते. हे एक सुंदर परंतु सुगंधरहित फुल असते. या फुलात पाच किंवा त्यापेक्षा जास्त पाकळ्या असतात. 
 • जास्वंदीची फुले लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी इत्यादी रंगामध्ये असते. या फुलाची चौडाई 5 सेंटिमीटर पर्यंत असते. 
 • या फुलात पिस्टल (महिला) व स्टेमैन (पुरुष) या दोघांचेही प्रजनन अवयव असतात. 
 • जास्वंदी चे फुल जगभरात आढळते. लाल जास्वंदीच्या फुलाला पुजेमध्ये गणपतीला वाहिले जाते. तंदुरुस्त राहण्यासाठी जगभरात या फुलाची चहा देखील पिली जाते.
 • जास्वंदीच्या झाडाचे पान हिरवे व अंडाकार असतात. या पानांची किनार दातांप्रमाने असते. या झाडाची सरासरी उंची 15 फूट पर्यंत असते. 
 • जास्वंदीच्या फुलाचा मुख्य उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो. या फुलाचे ते केसांसाठी खूप उपयुक्त असते. 
 • जास्वंदीच्या फुलाचा उपयोग आहार म्हणूनही केला जातो. सूप,चटणी, सलाद, कढी, जेली, ज्याम इत्यादी बनवण्यासाठी जास्वंद वापरतात.
 • संपूर्ण जगात चीन व थायलंड मध्ये जास्वंद मोठ्या प्रमाणात आढळते.
 • जास्वंदीचे फूल मलेशिया आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय फूल आहे.
 • जास्वंदीच्या फुलाला इंग्रजीत हिबिस्कस, हिंदी मध्ये गुडहल, संस्कृत मध्ये जपा, गुजराती मध्ये जासूद व बंगाली मध्ये जुबा असे म्हटले जाते.


तर मित्रांनो ह्या लेखात आपण जास्वंद फुलाची संपूर्ण माहिती मिळवली. मला आशा आहे की ही Hibiscus Flower Information in Marathi  आपल्याला फार उपयुक्त ठरली असेल. ह्या माहितीला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व मला कमेन्ट करून आपले विचार कळवा.  

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने