badminton information in marathi : आजच्या काळात बॅडमिंटन हा भारतासह जगभरात लोकप्रिय होत असलेला एक खेळ आहे. बॅडमिंटन च्या खेळात कमीत कमी दोन खेळाडूंची आवश्यकता असते. बॅडमिंटन आशिया खंडातील बऱ्याच देशांमध्ये खेळला जातो. या खेळाला ओलंपिक मध्येही स्थान देण्यात आले आहे.
बॅडमिंटन ला मराठी भाषेत फूल-बॅट म्हटले जाते. आज आपण बॅडमिंटन खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत. बॅडमिंटन खेळण्याचे नियम व badminton information in Marathi इत्यादी माहिती आपण पाहणार आहोत.
badminton in marathi |
बॅडमिंटन खेळाचे नियम (Badminton Rules in Marathi)
- बॅडमिंटनच्या खेळात दोन व्यक्ती द्वारे शटल कॉक (बॅडमिंटन खेळण्याचे फुल) इकडून तिकडे पाठवले जाते. जर दोघांपैकी कोणीही शटल कॉक ला पाठवण्यात चूक केली तर त्याचा अंक विरुद्ध खेळाडूला मिळतो.
- बॅडमिंटनचा प्रत्येक खेळ 21 अंकांचा असतो. प्रत्येक मॅच तीन भागांमध्ये वाटली जाते. ज्या खेळाडूला अधिक अंक प्राप्त झाले, तो विजयी होतो.
- बॅडमिंटनचा हा खेळ 29 अंकापर्यंत सुरू ठेवला जातो. 29 पॉईंट नंतर गोल्डन पॉईंट असतो. जो खेळाडू या पॉइंटला जिंकतो तो विजेता बनतो.
बॅडमिंटन खेळण्याचे मैदान (Badminton Ground)
बॅडमिंटन खेळण्यासाठी एका आयताकृती मैदानाला वापरले जाते. या मैदानाला मधोमध जाळी लावून दोन भागात विभागले जाते. या मैदानाला कोर्ट म्हटले जाते. कोर्टची रुंदी 6.1 मीटर किंवा 20 फूट असते. सिंगल मॅच च्या वेळेस या मैदानाला 5.18 मीटर केले जाते. जाळी पासून 1.98 मीटर दूर सर्विस लाईन बनवली जाते.
माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध Read Here
रॅकेट व शटल कॉक
बॅडमिंटन खेळण्यासाठी रॅकेट व शटल कॉक ची आवश्यक असते. शटल कॉक ला बॅडमिंटनचे फुल देखील म्हटले जाते. हे फुल कुत्रिम तऱ्हेने बनवले जाते. या फुलामध्ये 16 पंख लावले जातात. याचे वजन फक्त 4-5 ग्रॅम असते.
बॅडमिंटन खेळताना दोन रॅकेट ची आवश्यकता असते. शटल कॉक ला इकडून तिकडे मारण्यासाठी रॅकेट वापरले जाते. रॅकेट ला हलक्या धातूपासून बनवले जाते. रॅकेट ची लांबी 680 मिलीमीटर व रुंदी 230 मिलीमीटर असते. रॅकेटचा आकार अंडाकार असतो. या खाली धरण्यासाठी एक नरम हॅण्डल असते. रॅकेट च्या ज्या भागावर शटल कॉक ठोकले जाते. तेथे मजबूत फायबर पासून बनवलेला दोरा लावला जातो. हा दोरा शटल कॉक ला अधिक गती मिळवून देण्यात मदत करतो.
बॅडमिंटन खेळाबद्दल महत्त्वाची माहिती- Badminton marathi mahiti
- बॅडमिंटन खेळाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पक्के सांगितले जाऊ शकत नाही. परंतु काही इतिहासकारांचे मत आहे की भारतात 1500 बीसी मध्ये बॅडमिंटन खेळले जायचे. त्या काळात या खेळाला 'पुना' म्हटले जायचे. कारण या खेळाची सुरुवात पुणे शहरातून झाली होती.
- सन 1870 मध्ये भारतात कार्यरत असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यां द्वारे या खेळाला भारता बाहेर नेण्यात आले. असे मानतात की DUKE OF BEAUFORT ज्यांना बॅडमिंटन खेळाचे जनक मानले जाते त्यांनी सर्वात आधी आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळला होता.
- रॅकेट च्या मदतीने खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये बॅडमिंटन हा सर्वात गतिशील खेळ आहे. या खेळात शटल कॉक ची गती 300 किलोमीटर प्रति तासा पर्यंत असू शकते.
- जगभरातील सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या खेळामध्ये बॅडमिंटन हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रसिद्ध खेळ आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर फुटबॉल आहे.
- सन 1992 मध्ये बॅडमिंटन ला पहिल्यांदा ओलंपिक मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
- बॅडमिंटन चा प्रथम सामना बार्सिलोना मध्ये खेळण्यात आला होता. ज्या सामन्याला एक अरब पेक्षा जास्त लोकांनी टीव्ही वर पाहिले होते.
- आधीच्या काळात चीनमध्ये पायाने badminton खेळण्याची पद्धत होती. त्या काळात या खेळाला Ti Zian म्हटले जायचे. या खेळात खेळाडू रॅकेट ऐवजी आपल्या पायाने शटल कॉक ला मारायचे.
- आधीच्या काळात तसेच काही ठिकाणी आजही बॅडमिंटन च्या शटल कॉक ला बनवण्यासाठी बदकाचे पंख वापरले जातात.
- बॅडमिंटनच्या रॅकेट चे वजन 4 ग्राम ते 5 ग्रॅमपर्यंत असते .
- आजपर्यंतचे सर्वात लहान बॅडमिंटन सामना सहा मिनिटांचा होता. ज्याला कोरिया आणि इंग्लंड च्या मध्ये खेळण्यात आले होते.
- जगातील सर्वात मोठा बॅडमिंटन सामना डेन्मार्क व चीन मध्ये खेळण्यात आला होता. हा सामना 124 मिनिटे चालला होता.
- बॅडमिंटनच्या खेळात सर्वात जास्त यश मिळवणाऱ्या देशांमध्ये चीन आणि इंडोनेशिया पुढे आहेत.
- विश्व बॅडमिंटन संघाची स्थापना 1934 मध्ये करण्यात आली, त्याकाळी यामध्ये फक्त 9 देश सहभागी होते, परंतु आज जगभरातील 150 देश यात सहभागी आहेत.
बॅडमिंटन खेळण्याचे फायदे Benefits Of Badminton in Marathi
बॅडमिंटन खेळण्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे देखील आहेत:
१) शारीरिक क्षमता वाढवते
२) हृदयरोगाचा धोका कमी होतो
३) मानसिक तणाव कमी होतो
४) शरीराची लवचीकता वाढते
५) डायबिटीज चा धोका कमी होता.
६) मेटाबोलिस्म वाढते.
७) हात व पायांची हाडे मजबूत व बळकट बनतात.
८) विचार करण्याची क्षमता वाढते.
९) वचन कमी करण्यात सहाय्यक आहे.
१०) सामाजिक अस्तित्व निर्माण करते.
तर मित्रांनो या लेखात आपण बॅडमिंटन खेळाची मराठी माहिती मिळवली, मला आशा आहे की ही Badminton marathi mahiti तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ह्या महितीला आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा व तुम्हाला माहिती कशी वाटली कमेन्ट मध्ये सांगा.. धन्यवाद
खूपच महत्त्वाची माहीती मिळाली धन्यावाद.
उत्तर द्याहटवा