गुलाब फुलाची मराठी माहिती | Rose Information in Marathi

गुलाबाची मराठी माहिती | Rose Information in Marathi

गुलाब एक सुंदर फुल आहे. गुलाबाला इंग्रजीत Rose (रोज) म्हटले जाते. या फुलाला जगातील सर्वात सुंदर आणि सुगंधित फुल मानले जाते. या फुलाला प्रेमाचे प्रतीक देखील मानतात. आजच्या या लेखात आपण Rose Information in marathi मिळवणार आहोत. गुलाबाच्या फुलात खूप सारे छोटे-छोटे टोकदार काटे असतात. तर चला आज जाणून घेऊ गुलाब फुलाचा इतिहास व गुलाबाची मराठी माहिती.



गुलाब मराठी माहिती

गुलाब Rosaceae कुटुंबाशी संबंधित एक कोमल फुल आहे. याचे वैज्ञानिक नाव Rosa आहे. गुलाब दिसण्यात खूप सुंदर असते. हे फुल अनेक रंगांमध्ये आढळते. ज्यात लाल, गुलाबी आणि काळ्या रंगाचा समावेश आहे. परंतु भारतात लाल गुलाब मोठ्या प्रमाणात आढळते. गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंना उघडलेल्या असतात.


गुलाबाचे फुल व पूर्ण झाड काटेदार असते. गुलाबाचे झाड सदाबहर असतो आणि जास्त करून चार ते सहा मीटर पर्यंत वाढते. जगभरात गुलाबाच्या फुलांच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. गुलाबाच्या फुलांची शेती जगभरात केली जाते. भारतात बरेच लोक आपल्या घराच्या अंगणात गुलाबाचे झाड लावतात. आपल्या देशात 7 फेब्रुवारीला 'रोज डे' म्हणजेच गुलाब दिवस साजरा केला जातो. गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच प्रेमिजोडे एकामेकांना गुलाब भेट देतात.


गुलाबाचे प्रकार

1) पांढरा गुलाब- पांढरे गुलाब खूपच सुंदर दिसते. हे फुल पृथ्वीच्या उत्तरी भागात सापडते. 


2) लाल गुलाब- लहान मुलात सुंदर व सुगंधित फूल असते. हे फुल सर्व देशात मोठ्या प्रमाणात आढळते. या फुलाला प्रेमिप्रेमिका द्वारे वापरले जाते. 


3) काळे गुलाब- काळे गुलाब पूर्णपणे काळे नसते, ते हलक्या काळ्या रंगात असते. काळे गुलाब जास्त करून तुर्की देशात आढळते. 


4) गुलाबी गुलाब- गुलाबी गुलाब है लाल गुलाबाप्रमाणेच दिसण्यात सुंदर असते याशिवाय ते सुगंधित पण असते. या गुलाबाचे उपयोग सुगंधित परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. 


गुलाब फुलाचे उपयोग

सुगंधित फूल असल्याकारणाने गुलाब Rose पूजेसाठी वापरले जाते. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे तसेच, सत्कार करताना अभिनंदन म्हणून गुलाब दिले जाते. काही स्त्रिया आपल्या केसांमध्ये गुलाब लावतात. गुलाब पासून गुलाब जल, गुलकंद, अत्तर, शरबत, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात.


Information about rose in marathi

  • गुलाब Rose च्या फुलाचे झाड काटेदार असते. 
  • गुलाबाचे फुल जगभरात वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळते. जगभरात गुलाबाच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहे.
  • भारतात असलेल्या राजस्थान मधील जयपूर शहराला गुलाबी शहर म्हटले जाते.
  • गुलाबाच्या फुलाला चार विभिन्न विभिन्न भागांमध्ये वाटले आहे- हायब्रीड टी, फ्लोरीबंडा, पॉलीएंथा, मिनिएचर, लता गुलाब.
  • असे मानले जाते की गुलाब Rose पासून तयार होणाऱ्या परफ्यूम चा शोध नूरजहाँ ने इसवी सन 1620 मध्ये आपल्या विवाहाच्या वेळी केला होता.
  • गुलाबाच्या फुलात खूप साधे औषधीय गुण असतात यामुळे हे फुल औषधी बनवण्यात वापरले जाते.
  • गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर पासून गुलकंद बनवले जाते.
  • गुलाब पासून बनणाऱ्या गुलाब जल चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गुलाबजल डोळ्यात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
  • गुलाबाचे फुल मंदिर मंडप आणि पूजेच्या स्थानी जास्त वापरले जाते.
  • गुलाब हा एक फारसी शब्द आहे या फुलाला इंग्रजीत रोज म्हटले जाते.
  • शिवपुराण मध्ये गुलाबाला देव पुष्प म्हटले गेले आहे. 
  • भारतात 7 फेब्रुवारीला रोज डे म्हणजेच गुलाब दिवस साजरा करतात.
  • युरोपमधील काही देशांनी गुलाबाला आपले राष्ट्रीय फूल घोषित केले आहे. 
  • गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. प्रेमी व प्रेमिका एक दुसऱ्याला गुलाब (rose) देऊन प्रेम व्यक्त करतात.
  • आपल्या देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या जॅकेट मध्ये गुलाबाचे फुल लावत असत.
  • गुलाबाला फुलांचा राजा देखील म्हटले जाते.
  • बहरलेल्या गुलाबाच्या फुलावर फुलपाखरू येऊन त्याचे रस शोषतात.
  • भारतात दक्षिण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबाची शेती केली जाते.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने