2024 स्वातंत्र्य दिनाचे भाषण मराठी | 15 august Independence Day Speech in Marathi

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi : मित्रांनो दरवर्षी देशभरात 15 ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वातंत्र्य दिन भाषण द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून घालवायला नको. 

आजच्या 15 august speech in marathi या लेखात आम्ही स्वतंत्र दिनाच्या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे भाषण आपण आपल्या वहीत लिहून घेऊ शकतात आणि यामध्ये आपल्या पद्धतीने योग्य ते बदल करून स्वत चे भाषण तयार करू शकतात.


15 August Speech in Marathi

स्वतंत्र दिन 10 ओळी - 10 lines on Independance Day in Marathi

  1. भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट ला दरवर्षी साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला होता.
  2. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय सुट्टी असते, हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिन आहे.
  3. स्वातंत्र्य दिन भारतातील ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या स्वातंत्र्य युगाची आठवण करून देत असतो.
  4. स्वतंत्रदिनी ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नेत्यांची भाषणे इत्यादी गोष्टी आयोजित केल्या जातात.
  5. भारताच्या स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील लोक एकत्र येतात.
  6. स्वातंत्र्य दिन हा बलशाली भारत व भारताचे उत्तम भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. 
  7. स्वातंत्र्यदिनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशाची अनेकते मधील एकता दिसून येते. 
  8. स्वातंत्र्य दिन हा आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या व स्वतः आणि कुटुंबापेक्षा देशाला सर्वोपरी मानणाऱ्या स्वतंत्र सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना प्रकट करण्याचा दिवस असतो.
  9. आपल्या देशाचे राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत, जनगणमन हा वंदे मातरम यांच्या जयकाराने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
  10. आपला देश भारत स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी, सुभाष चंद्र बॉस, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादि अनेक नेत्यांनी परिश्रम केलेत.

15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 August Speech in Marathi

(250 शब्द)

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो. 

जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तेव्हा कुठे आपण स्वतंत्र झालो. आजच्या या शुभ दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावून भाषण देतात. या दिवशी स्वतंत्र लढ्यात सामील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

आपला देश दिन प्रतिदिन पुढे जात आहे. व लवकरच आपण एक महासत्ता म्हणून जगासमोर उभे राहू. भारताच्या स्वातंत्र्याच्या चार वर्षानंतर आपल्या देशाने राज्यघटना लागू केली. आपल्या राज्यघटनेने देशाला अधिक सक्षम केले. आज आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून तर औद्योगिकी करणापर्यन्त आपण जगातील मोजक्या प्रगत देशाच्या पंक्तीत आहोत. व सतत आपला देश प्रगतीपथावर पुढे जात आहे. 

ज्या पद्धतीने आपण आज देशाच्या महान नेत्यांना आठवण करतो, त्याच पद्धतीने आपण आपल्या महान सैनिकांना न विसरता त्यांनाही धन्यवाद द्यायला हवे. आपल्या देशाचे महान सैनिक दिवस रात्र सीमेवर उभी राहतात. त्यांचे बलिदान लक्षात घेऊन आपण एकजूटतेने देशासाठी कार्य करायला हवे. 

आजचे माझे भाषण येवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकुन घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत

धन्यवाद...


वाचा> स्वतंत्र दिनाचे शुभेच्छा संदेश 


स्वतंत्र दिन मराठी भाषणाचा विडिओ


स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi

(९०० शब्द)

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्रातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकाऱ्यांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि आशापद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकाऱ्यांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्याच्या संघर्षांचा आपल्या विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्रदीन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो.

या शुभदिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने आपले हृदय भरून येते. सरकारी कार्यालयांमध्ये, हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात.

आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. केशरी रंग त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोकचक्र सुद्धा आहे, ज्यात २४ आरे असतात. स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज, शासकीय आणि प्रशासकीय आशा सर्वच ठिकठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो.

याशिवाय, विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी स्वातंत्र्यलढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती देतात.

देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ति आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.

स्वातंत्रदिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो, जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीतासह २१ तोफा डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात येते. सर्व सेना स्वतंत्र दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या महान भारत देशाला वंदन करतात. 

आपला भारत महान का आहे? पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून? की आपल्या देशात सामाजिक समस्या, गरीबी, निरक्षरता, दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे?  तर नाही! आपला देश महान आहे कारण ‘वसुधैव कुटुंबकम’ अर्थात संपूर्ण जग एक कुटुंब आहे. अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया" ही आपल्या देशाची शिकवण आहे.

पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे. एक तो दिवस होता जेव्हा १९६३ मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकली वर आणण्यात आले होते आणि आज तीच Indian Space Research Organization म्हणजेच ISRO जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थापैकी एक आहे.

‘There is no country more diverse than India.’ रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो. आपली कला, संस्कृती, सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की ५००० वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधु सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू, शून्य, संख्याप्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्व कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य, विज्ञान, अभियांत्रिकी, गणित, शेती, व्यवसाय, वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विद्यानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे. विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्णमंदिर जगभरात प्रसिद्ध धर्मीक स्थळ आहे. याठिकाणी जात, धर्म, वर्ग, वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास १ लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते. असा देश जिथे जगातील सर्वाधिक अशा ३ लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत. कुंभमेळयात एकावेळी १५ कोटीपेक्षा जास्त भक्त असतात. भारतात मनाला शांती देणारे बुद्धाचे विचार आहेत. अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल.

 जगातले ७५% वाघ भारतात आहेत. त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानश्या तीरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात मोठी शाळा, सर्वात उंच क्रिकेटचे मैदान, तरंगते पोस्ट कार्यालय, जगातील सर्वात स्वस्त चारचाकी, जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल, जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारताची शोभा वाढवत आहेत. भारतात जेवढे लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. जगभरात जेवढं सोनं आहे त्यातले ११% तर भारतीय महिलांकडे आहे. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत. सर्वांना आपल्या देशात त्यांचे हक्क मिळतात. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत जिथे जगातील २५% डाळींचे उत्पादन केले जाते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे CEO भारतीय आहेत. 

मायक्रोप्रॉसेसर पेंटियम चीप, ऑप्टिक फायबर, रेडियो वायरलेस कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटलाइट भारताने बनवली आहे.  

या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत जिथे जात, धर्म, भाषा, बोली वेगवेगळी आहे तरीही केला जातो सर्वांचा सन्मान, उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान. जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाइल ब्रम्होस आणि न्यूक्लियर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत तर सीमेवर राहतात ज्यांना आपण जवान म्हणतो. जे -५३° सेल्सिअस थंडीत आणि ५२° सेल्सिअस गरमीतही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणाचे बलिदान देतात. ते जवान, ते सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देश नाही तर माता, भारतमाता म्हंटले जाते. अश्या महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. 

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे |

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची |

रामायणे घडावी, येथे पराक्रमाची ||

शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे |

आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||

जय हिंद ! भारत माता की जय !!

***


प्रिय मित्रांनो वरील लेखात आम्ही आपल्यासोबत स्वतंत्र दिनाचे 15 ऑगस्ट चे भाषण मराठी शेअर केले आहे. आम्ही आशा करतो की हे Independence Day Speech in Marathi आपणास उपयोगाचे ठरले असेल. आपण 15 august speech in marathi बद्दलचे आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. आणि जर भाषणात काही चूक अथवा दुरुस्ती असेल तर ते देखील कळवा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने