रक्षाबंधन मराठी निबंध | Raksha Bandhan Essay in Marathi

मित्रांनो आपल्या देशात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. सणांचा उद्देश आपापसातील कौटुंबिक आणि सामाजिक एकता वाढवणे हाच असतो. अश्याच भारतीय सणांपैकी एक आहे रक्षाबंधनाचा सण. 

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण असतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. आजच्या या लेखात आपण रक्षाबंधन या सणाचा मराठी निबंध (Raksha Bandhan Essay in Marathi) पाहणार आहोत. या निबंधाला तुम्ही rakshabandhan nibandh marathi म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया..  




रक्षाबंधन 10 ओळी निबंध - 10 lines on Raksha Bandhan in Marathi

  1. रक्षाबंधन हिंदू धर्मातील एक पवित्र आणि प्रमुख सण आहे.
  2. मराठी कॅलेंडर नुसार रक्षाबंधनाच्या सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला, ऑगस्ट महिन्यात साजरा केला जातो. 
  3. रक्षाबंधन भाऊ बहिणींमधील प्रेमाचे प्रतिक असलेला सण आहे.
  4. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण व आयुष्यभराची सोबत देण्याचे वचन देतो.
  5. रक्षाबंधनाच्या दिवशी विविध व्यंजन आणि मिठाई बनवली जाते व एकामेकांना खाऊ घातली जाते.
  6.  भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधन संबंधी अनेक कथा प्रसिद्ध आहेत.
  7. रक्षाबंधनाचा सण फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ, मॉरिशस व अन्य अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.
  8. या दिवशी लहान पंतप्रधान, राष्ट्रपती व याशिवाय अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या हातावर राखी बांधतात.
  9. आधुनिक काळात भाऊ-बहीण एकमेकांपासून दूर असल्यास बहिणी भावाला कुरिअरद्वारे देखील राखी पाठवतात.
  10. रक्षाबंधन भावाबहिनीतील प्रेम वाढवते. या दिवशी फक्त बहिणीच नव्हे तर बहिणीचे नाते असणाऱ्या इतर मुली देखील भावाला राखी बांधत असतात.

रक्षाबंधन मराठी निबंध - Raksha Bandhan Nibandh in Marathi (200 words)

रक्षाबंधन हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासुत्र, म्हणजेच राखी बांधते आणि भावाची प्रगती व सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाकडून पण बहिणीला संरक्षणाचे वचन व सोबत काही भेटवस्तू दिल्या जातात. राखीच्या या सणाला संपूर्ण भारतात साजरा करतात. भारतासह नेपाळ व अन्य ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माला मानणारे व भारतीय लोक राहतात तेथे साजरे केले जाते.  

रक्षाबंधन या सणाला प्राचीन काळापासून साजरे केले जात आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये रक्षाबंधनाचाउल्लेख केला आहे. आजकाल रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या घरी राखी व मिठाई घेऊन जातात. राखी बांधल्या नंतर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून काही पैसे किंवा भेटवस्तू देतो. अश्या पद्धतीने एक दुसऱ्याला वस्तू दिल्याने भाऊ बहिणी मध्ये प्रेम वाढते.

रक्षाबंधनच्या दिवशी सर्वजण नवे कपडे परिधान करतात. सर्वांचे मन आनंदाने भरून जाते. रक्षाबंधनाच्या काही दिवस आधी बहिणी बाजारात जाऊन चांगल्या प्रकारच्या राख्या भावांसाठी खरेदी करतात. भाऊ सुद्धा बहिणीसाठी काहीतरी भेटवस्तू  विकत आणतात. 

रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे. भारतीय संस्कृतीत असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातीलच एक सुंदर परंपरा आहे. म्हणूनच माझा आवडता सण रक्षाबंधन आहे.

***


हे देखील वाचा : Raksha Bandhan Quotes in Gujarati


रक्षाबंधन मराठी निबंध - Raksha Bandhan essay in Marathi

(200 शब्द)

रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीचे प्रेम आणि कर्तव्याच्या प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात. भाऊ देखील बहिणीला सदैव संरक्षणाचे वचन देतो. रक्षाबंधनाचा हा सण आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे. 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी सकाळी लवकर अंघोळ करून पूजेचे ताट सजवतात, पूजेच्या ताटात कुंकू, राखी, अक्षदा, दिवा, मिठाई इत्यादी वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर घराच्या पूर्व दिशेला भावाला बसवून त्याची आरती ओवाळली जाते, डोक्याला कुंकू व अक्षदा लाऊन बहीण भावाला राखी बांधते. आणि शेवटी गोड मिठाई खाऊ घातली जाते. भाऊ सुद्धा बहिणीला मिठाई खाऊ घालतो व बहिणीसाठी आणलेले भेटवस्तू  तिला भेट देतो. 

पूर्वीच्या वेळी रक्षाबंधन अतिशय सात्विक पूजा पद्धतीने साजरी केली जायची. परंतु आता वेळेच्या अभावाने पूजा पद्धतीत बदल केलेले आहेत. आता लोक पूर्वीपेक्षा या सणात कमी सक्रिय होतात. दूर राहणाऱ्या बऱ्याच बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला कुरियरने राखी पाठवून देतात. याशिवाय मोबाईल वर राखी पाठवून सुद्धा रक्षाबंधनच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात.

स्वतःला मॉर्डन दाखवण्यासाठी आपण आपली संस्कृती विसरत आहोत. आपण आपल्या पूजा पद्धती मध्ये बदल केलेला आहे. जर आपल्याला भारतीय संस्कृतीचे रक्षण करावयाचे तर जुन्या पद्धती अनुसार सण-उत्सव साजरे करायला हवे. रक्षाबंधनच्या पवित्र सणाचे महत्व लक्षात घेऊन त्याला योग्य रीतीने साजरे करायला हवे.

***


वाचा : दिवाळी मराठी निबंध

वाचा: रक्षाबंधन शुभेच्छा संदेश


तर मित्रांनो हा होता रक्षाबंधन मराठी निबंध (Essay on Raksha Bandhan in Marathi) तुम्हाला हा rakshabandhan nibandh marathi कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. व इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध मिळवण्यासाठी आमच्या या वेबसाइट bhashanmarathi.com वर नियमित भेट देत रहा.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने