माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | maza avadta chand dance in marathi

मनोरंजन व आनंद साजरा करण्यासाठी नृत्य जगभरात प्रसिद्ध आहे. पण नृत्य हे फक्त मनोरंजनपर्यंत मर्यादित नसून याचे अनेक शारीरिक लाभ देखील आहेत मला लहानपणापासून नृत्याची आवड आहे व माझा आवडता छंद नृत्य आहे. आजच्या या लेखात आपण maza avadta chand dance in marathi या विषयावरील निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करू...



माझा आवडता छंद | my hobby dance essay in marathi

वेगवेगळ्या लोकांद्वारे वेगवेगळ्या पद्धतीचे छंद जोपासले जातात. परंतु माझा आवडता छंद नृत्य करणे आहे. नृत्य ला इंग्रजी भाषेत डान्स म्हटले जाते. नृत्य ही शरीरांच्या विशिष्ट हालचालींवर आधारित एक कला आहे. नृत्य हे मनोरंजन म्हणून केले जाते व याला करण्यासाठी अधिक प्रमाणात शारीरिक क्षमता लागते. नृत्य म्हणजे शिस्त, चांगला दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि मनोरंजन होय. एक चांगला नृत्य प्रेमी या सर्व गोष्टी आत्मसात करतो. आजच्या काळात जवळपास प्रत्येक तरुण तरुणीला नृत्य करणे आवडते. सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, धार्मिक उत्सव इत्यादी ठिकाणी नृत्य करून आनंद साजरा केला जातो. 


माझ्या आवडत्या छंदापैकी नृत्य हा माझा सर्वात आवडीचा छंद आहे. लहानपणापासूनच मी नृत्याची आवड जोपासली आहे. ज्या पद्धतीने माझे पाय संगीतावर नाचू लागले, ते पाहून माझ्या आई-वडिलांना खात्री पटली की मी जन्मजात एक डान्सर आहे. नृत्य व्यक्तीला पैसा व नाव दोन्ही मिळवून देते. मला आधीपासूनच संगीत आणि नृत्यावर प्रेम आहे. नृत्य शरीराचा व्यायाम घडवून आणते व  गाण्यावर आपले शरीर हलवून आनंद प्रदान करते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की नृत्य हे आनंददायक असण्यासोबतच शारीरिक स्वास्थ्यसाठी उपयुक्त आहे.


आमच्या शाळेत दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात मी नृत्यासाठी पुढाकार घेतो. व बऱ्याचदा मला शाळेकडून उत्कृष्ट नृत्य पुरस्कार मिळाला आहे. जगभरात नृत्याचे अनेक प्रकार आहेत जसे बॅलेट, बॉलरूम, कॉंटेम्पोरी, हिपहॉप इत्यादी परंतु मला आपले भारतीय नृत्य प्रकार जास्त प्रिय आहेत. भारतीय नृत्यात भरतनाट्यम, कथकली, मणीपुरी, कुचीपुडी, ओडिसी इत्यादि प्रत्यक राज्याचे वेगवेगळे नृत्य आहेत. मी जवळपास सर्वच भारतीय नृत्य प्रकार अभ्यासले आहेत व आत मी विदेशी नृत्य शिकत आहे. 


याशिवाय नृत्याने मला प्रत्येक परिस्थितीत दृढ राहून स्वतःला पुढे ढकलण्यात मदत केली आहे. बऱ्याचदा नृत्य करत असताना मला शारीरिक इजा झाली आहे. पण तरीही मी नृत्य करणे थांबवले नाही. मी इयत्ता 6 वी मध्ये असतांना एक नृत्य क्लास लावला. आता मला माझा हा छंद करिअर म्हणून निवडायचा आहे. मनुष्याने पैशाच्या मागे न पडता ज्या गोष्टीत आवड आहे त्या करायला हव्यात. आज प्रत्येकजण पैश्या मागे पडत आहे या दौड मध्ये लोक आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून मी माझी आवड जोपासण्याचा निर्णय घेतला आहे. 


थोडक्यात सांगायचे झाले तर नृत्य मला जिवंत असण्याचा अनुभव करून देते. म्हणून माझे स्वप्न एक प्रोफेशनल नर्तक बनून जास्तीत जास्त लोकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.


माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध वाचा येथे 


तर मित्रांनो हा होता माझा आवडता छंद या वर निबंध हा मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा.  

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने