सुखी जीवन जगण्यासाठी श्रमाचे महत्व तेवढेच आहे जेवढे अन्न आणि झोपेचे आहे. परिश्रमाशिवाय जीवन व्यर्थ आहे कारण निसर्गाद्वारे दिलेल्या संसाधनांचा योग्य उपयोग तोच करू शकतो जो मेहनती असतो. आज आपण parishramache mahatv या विषयावर marathi nibandh पाहणार आहोत हा निबंध आपण आपल्या शाळेचा होमवर्क म्हणूनही वापरू शकतात या शिवाय या निबंधातून तुम्हाला कष्टाचे महत्त्व लक्षात येईल.
परिश्रमाचे महत्व मराठी निबंध
भगवान श्री कृष्ण गीते मध्ये म्हणतात की “कर्मण्येवाधिकारस्तू या फलेषु कदाचन:|” या श्लोकाचा अर्थ होतो की परिश्रम अर्थात कार्य किंवा कर्म हीच माणसाची पूजा अर्चना आहे. या पुजेशिवाय मनुष्याचे सुखी आणि समृद्ध होणे कठीण आहे. जो व्यक्ती श्रमापासून दूर राहतो तो आळशी आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहणारा असतो. पूर्वीपासूनच कठीण परिश्रमाचे महत्व सांगितले गेले आहे. कोणतेही कार्य श्रमाशिवाय शक्य नाही. श्रमाच्या शक्तीने जगात काहीही मिळवले जाऊ शकते.
परिश्रमी व्यक्ती आपल्या कर्मंद्वारे सर्व इच्छांची पूर्ती करतात. असे लोक संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जातात. जगात प्रत्येकाला परिश्रम करणे आवश्यक आहे. परिश्रमाने शेतकरी शेतात पीक उगवतो व कोरड्या जमिनीला सोन्याचे रूप देतो. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून आपल्या शेताला सोन्यासारखे बनवतो. श्रम एक असे साधन आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती जीवनातील सर्वच समस्यांपासून सुटका मिळवू शकतो. नियमित केलेले परिश्रम आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहचवते.
आज जगातील सर्वच देश कठीण श्रमाने विकास करीत आहेत. मेहनती व्यक्तीला फक्त जिवंतपणी नाही तर मेल्यानंतरही यश प्राप्त होते. ज्या देशाचे लोक मेहनती असतात तोच देश प्रगती करू शकतो. ज्या देशाचे नागरिक आळशी आणि भाग्यावर अवलंबून असतात तो देश गुलाम बनतो.
ज्या पद्धतीने सूर्य त्याच्या प्रकाशने रात्रीचा अंधकार दूर करतो. त्याच पद्धतीने श्रमाने मनुष्याच्या जीवनातील अज्ञान रुपी अंधकार दूर होऊन व्यक्तीचे भविष्य उज्वल बनते. कठीण परिश्रमा शिवाय उन्नती संभव नाही. कारण जरी समोर स्वादिष्ट व्यंजनांचे ताट सजलेले आहे तरी जर त्याला खाण्यासाठी थोडेही कार्य केले गेले नाही तर भोजन कितीही स्वादिष्ट राहिले तरी त्याचा स्वाद घेता येत नाही. .
मानव परिश्रमाचेच फळ आहे की आज दुर्गम भागात प्रवासाचे योग्य साधन उपलब्ध झाले आहेत. पर्वतांना कापून रस्त्यांचा निर्माण केला गेला आहे. नदी आणि समुद्रवरही पुल बनवण्यात आले आहेत. जगभरात मोठमोठ्या इमारती निर्माण करणे, अंतरीक्ष मध्ये जाणे इत्यादी सर्व गोष्टी परिश्रमाने साध्य झाल्या आहेत. म्हणून मानवी जीवनात परिश्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जो व्यक्ती नेहमी कार्यरत असतो यश त्याच्या चरणात असते.
तर मित्रांनो हा होता shramache mahatva marathi nibandh तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा.
या शिवाय 500 पेक्षा जास्त Marathi nibandh आपल्याला आमच्या या bhashanmarathi.com वेबसाइट वर पाहायला मिळतील. कोणत्याही विषयावरील निबंध शोधण्यासाठी वर दिलेल्या serach box मध्ये टाइप करा.
Khupch chaan👍🏻👍🏻💯💯
उत्तर द्याहटवा