मदर टेरेसा मराठी निबंध | Mother teresa essay in marathi

या लेखात मदर टेरेसा यांच्यावर लिहिलेला मराठी निबंध देण्यात आला आहे. हा Mother teresa marathi essay/nibandh शाळा कॉलेज व सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. समाजसेवी मदर टेरेसा मराठी निबंध | Mother teresa essay in marathi

आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या सेवेसाठी खर्च करणाऱ्या मानवतावादी समाजसेविका मदर तेरेसा, या महिलेला दयेची देवी आणि मानवतेची मूर्ती म्हटले जाते. मदर तेरेसा या एक संत महिला होत्या. त्या जन्माने भारतीय नव्हत्या परंतु गरजवंताच्या सेवेसाठी भारतात आल्या होत्या.


मदर तेरेसा यांचे खरे नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 ला युरोपातील मॅसेडोनिया या देशात झाला होता. मदर तेरेसा यांच्या आई वडिलांना तीन अपत्य होती. मदर तेरेसा या सर्वात लहान होत्या. त्यांचे वडील एक साधारण व्यवसायिक होते. मदर तेरेसा आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 


मदर तेरेसा या एका ख्रिश्चन कुटुंबात जन्म आल्या होत्या. त्यांना ख्रिश्चन धार्मिक कार्य करण्याची आवड होती. 21 वर्षाच्या वयात त्यांनी चर्चमधील नन बनण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यावेळी त्यांचे नाव मदर तेरेसा करण्यात आले. नन बनल्यानंतर त्यांनी अनेक देशाची यात्रा करून लोकांमध्ये धार्मिक विश्वास वाढवला. त्या भारतातली कोलकाता शहरात आल्या व लोरेट कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये मुलांना शिकवू लागल्या.  त्या अतिशय शिस्तप्रिय शिक्षिका होत्या. 


कोलकत्याच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे दुःख व पीडा पाहून मदर तेरेसा यांचे मन अस्वस्थ होत असे. 10 सप्टेंबर 1946 मध्ये हे त्यांनी कॉन्व्हेंट स्कूल सोडले. व अतिनिर्धन लोकांच्या सेवेसाठी कार्य करणे सुरू केले. यानंतर त्यांनी कोलकत्याच्या गल्या-गल्ल्यांमध्ये फिरून लोकांना दया व प्रेम शिकवले. त्यांनी कलकत्ता निगमाकडून जमिनीचा एक तुकडा मागितला व या जमिनीवर धर्मशाळा स्थापित केली. या छोट्याश्या सुरुवातीनंतर त्यांनी जी प्रगती केली ती खरोखर महान होती. त्यांनी 98 स्कूटर, 425 मोबाईल डीस्पेंसरीज, 102 कुष्ठरोगी दवाखाना, 48 अनाथालय आणि 62 असे घर बनवले जेथे गरीब लोक विनामूल्य राहू शकतील.


त्यागाच्या जिवंत मूर्ती मदर तेरेसा या होत्या. त्या अतिशय छोट्या रुमात राहत असत आणि तेथेच भेटायला येणाऱ्या लोकांशी चर्चा करीत असत. मदर तेरेसा त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वार्तालाप करीत असत. त्या अतिशय विनम्र स्वभावाच्या स्त्री होत्या. सज्जनता आणि विनम्रता त्यांच्या हास्यातुन दिसत असे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्या दीन दुखीतांच्या सेवेत लागलेल्या असत. 


मदर टेरेसा यांनी प्रेम व शांतीचा संदेश दिला. प्रेम हे प्रत्येक ऋतूत येणारे फळ आहे आणि प्रत्येक व्यक्ती याला प्राप्त करू शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. मदर टेरेसा सांगत असत की शांतता ही चेहऱ्यावरील एका हास्याने सुरू होते. त्यांचा संदेश होता की ज्या पद्धतीने परमेश्वर आपल्याला प्रेम करतात त्याच पद्धतीने आपण एकमेकांना प्रेम करायला हवे. जर आपण या गोष्टी अनुसरू तरच विश्वामध्ये, देशामध्ये, घरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये शांती प्रस्थापित करू शकू. अशा या महान आत्मा मदर तेरेसा यांच्या वाढत्या वयामुळे 73 वर्षाच्या वयात  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मदर टेरेसा जीवन चरित्र वाचा येथे 


Read More:


सर्व प्रकारचे मराठी निबंध वाचा येथे 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने