आदर्श नागरिक [खरा नागरिक] मराठी निबंध | Adarsh nagrik marathi nibandh

मित्रहो आजच्या या लेखात आपण आदर्श नागरिक / खरा नागरिक या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया.. 



आदर्श नागरिक मराठी निबंध | Adarsh nagrik marathi nibandh

कोणत्याही देशाचे नागरिक हेच त्या देशाची संपत्ती असतात. जर देशाचे नागरिक आदर्श, मेहनती आणि सज्जन असतील तरच देश प्रगती करतो. एक आदर्श नागरिक सर्वात आधी एक आदर्श व्यक्ती असतो. तो नेहमी देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत असतो. असा व्यक्ती आपल्या देशाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. आपल्या भारत देशात अनेक प्रसिद्ध असे आदर्श नागरिक होऊन गेले आहेत. 


जसे महात्मा गांधी, भगत सिंह, लोकमान्य टिळक, डॉ एपीजे अब्दुल कलाम इत्यादी. या महापुरुषांनी इमानदारी च्या मार्गावर चालत देशाच्या प्रगतीत सहकार्य केले. सोबतच भारतच नव्हे तर जगभरातील लोकांसमोर आदर्श निर्माण केला. 


आदर्श नागरिकाचे अनेक गुण असतात. एक आदर्श नागरिक इमानदार, कर्तव्यनिष्ठ आणि सत्य मार्गावर चालणारा असतो. तो आपल्या देशाची संस्कृती, इतिहास आणि भुमिशी प्रेम करतो. आदर्श नागरिकाच्या मनात देशप्रेम भरलेले असते. तो देशाविषयी आपल्या कर्तव्यांना पुरेपूर बजावतो आणि नेहमी आपल्या कर्तत्व्या प्रति जागरूक असतो. असा नागरिक वेळप्रसंगी देशासाठी आपले प्राण देण्यासही तयार असतो. 


एक चांगला नागरिक स्वच्छेने नियमांचे पालन करतो. तो राष्ट्राच्या उन्नतीसाठी सकारात्मक योगदान देतो. आदर्श नागरिक राष्ट्र उत्थानाच्या कार्यक्रमात उत्साहाने सामील होतो. तो समाजाच्या आदर्श मूल्यांना सन्मान देतो आणि समाजात असलेल्या कुरिती समाप्त करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करतो. 


आदर्श नागरिकाचे संपूर्ण जीवन समाजासाठी आणि देशासाठी अर्पित असते. परंतु दुसरी कडे काही असेही नागरिक असतात जे स्वताच्या स्वार्थासाठी देश आणि समाजाचा बळी देण्यासाठी देखील मागे पुढे पाहत नाही. आज आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत जे धोकेबाजी करून देशाला नुकसान पोहचवतात. हे लोक आपल्या देशासाठी हानिकारक असतात. 


एक आदर्श नागरिक हाच देशाची शान असतो. तो सर्वांशी प्रेम करतो आणि समाजात असलेले वाईट लोकांचे सत्य सर्वांसमोर आणतो. म्हणून आपण सर्वांचे कर्तव्य आहे की आपण देशाचे आदर्श नागरिक बनायला हवे आणि देशाविषयी आपली जवाबदारी समजून देश सेवेचे कार्य करायला हवे. आपली संस्कृती आणि इतिहास कायम ठेवण्यासाठी एकमेकांशी प्रेम आणि बंधुकिने राहायला हवे. स्वच्छता, अहिंसा, प्रेम, भाऊ बंधुकी, राष्ट्रप्रेम आणि दयाळू हृदय हे एका आदर्श नागरिकाचे प्रमुख गुण आहेत. आणि जेव्हा देशातील नागरिक या गुणांना आत्मसात करतील तेव्हा देशाला महासत्ता बनण्याहुन कोणीही रोखू शकत नाही.

समाप्त

आदर्श विद्यार्थी निबंध पहा येथे 

मी मुख्यमंत्री झालो तर 

आशा करतो khara nagrik / adarsh nagrik हा marathi nibandh सर्वांना आवडला असेल. या निबंधला आपल्या मित्रांसोबत नक्की शेयर करा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने