निसर्ग माझा मित्र मराठी निबंध | nisarg maza mitra marathi nibandh
या लेखामध्ये सर्व मित्रांसाठी निसर्ग आपला सोबती (nisarg maza sobati nibandh) या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे आशा करतो की हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तर चला निबंधाला सुरूवात करूया.
निसर्ग माझा सोबती निबंध मराठी - (nisarg maza sobati nibandh in marathi)
आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला साधारण आणि तुच्छ समजत आहे. कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे. आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नाही. परंतु खरे पाहता निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ट मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो. ज्या पद्धतीने एक खरा मित्र नेहमी, प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतो त्याच पद्धतीने निसर्गही आपला सोबती आहे.
आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेक प्रसिद्ध कवी, लेखक, चित्रकार व कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक सुंदर रचना केल्या आहेत. आपल्या सभोवताली असलेले पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी गोष्टींपासून निसर्ग बनतो. निसर्ग अनंत रंगांनी भरलेला आहे ज्याने आपल्या कुशीत सजीव निर्जीव सर्व जीवांना सामावून घेतले आहे.
खरे पाहता निसर्ग हा आपला मित्र आहे. कारण निसर्ग हीच ती शक्ती आहे की आपल्याला विश्वात सर्वकाही देते. मग ते आपले अन्न असो वा जीवन. निसर्गामध्ये ती शक्ती आहे जी शरीरातील सर्व रोगांना दूर करते. वृक्षांची हिरवळ पाहून मानसिक ताणतणाव कमी होतो. म्हणून जर कधीही तुम्हाला मानसिक तणाव निर्माण झाला असेल तर बागेत जाऊन फिरून या. बागेतील निसर्ग सौंदर्य पाहून मनाला मानसिक शांती लाभेल. निसर्ग आपल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांना सहज पूर्ण करतो.
निसर्गाने आपल्याला सुंदर हिरवळ दिली आहे. निसर्गाने आपल्याला प्राणवायू दिला आहे. हा प्राणवायू आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. ऑक्सिजन या प्राणवायू शिवाय आपण फक्त काही क्षण जीवंत राहू शकतो. मनुष्याला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्याला अन्नातून प्राप्त होते, व हे अन्न देखील निसर्गच उपलब्ध करून देतो. आपल्याला राहण्यासाठी जमीन निसर्गाने दिली आहे. या धरतीवर बनवलेले घर सुद्धा निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तूं पासून बनवण्यात आले आहे.
निसर्ग हा फक्त मनुष्याचाच मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ट मित्र आहे. कारण तो मनुष्या सोबत पशू पक्ष्यांची देखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो. आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करवून घ्यायला हवा. निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी.
मनुष्याने कधीही निसर्ग या मित्रांसोबत छेडछाड करायला नको. आजच्या मनुष्याला वाटते की निसर्ग त्यांच्या अनुसार चालायला हवा. परंतु असा विचार करणे मुळात फारच चुकीचे आहे. आपण मनुष्य निसर्गाच्या अनुसार जिवंत राहण्यासाठी बनलो आहोत. या निसर्गात बदल करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. आजकाल सभवताली वाढत्या प्रदूषणामुळे निसर्ग मित्राचा ह्रास होत आहे. जल, वायु, पानी आणि मृदा प्रदूषणामुळे निसर्ग नष्ट होत आहे. याचे दुष्परिणामही मनुष्याला भोगावे लागत आहेत.
निसर्ग संवर्धन करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै ला विश्व निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरात निसर्ग संवर्धन आणि निसर्गाचे महत्व या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात येतात. या दिवशी जगभरातील लोक निसर्ग सोबतींचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतात. आज आपणही संकल्प करायला हवा की निसर्गाला संरक्षित करण्यासाठी आपण सर्वजण एक होऊन प्रयत्न करूया.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज वाचा येथे
तर मित्रांनो हा होता nature is our friend essay in marathi अर्थात निसर्ग आपला सोबती या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की निबंध तुम्हाला आवडला असेल या निबंधाला इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा.
READ MORE: