Maza avadta kavi marathi nibandh: मित्रांनो कवी समाजाचा आरसा असतो. आपल्या काव्यातून समाजातील सुख दुःख जगासमोर ठेवण्याचे सामर्थ्य कवि मध्येच असते. आजच्या या लेखात आपण माझा आवडता कवी मराठी निबंध प्राप्त करणार आहोत.
माझा आवडत कवि चे नाव कृष्णाजी केशव दामले आहे. म्हणून आज आपण कृष्णाजी केशव दामले यांची मराठी माहिती मिळवणार आहोत.
हा maza avadta kavi marathi nibandh तुम्ही शाळा कॉलेज मध्ये सराव म्हणून वापरू शकतात. तर चला निबंधला सुरुवात करूया...
majh a avadta kavi |
माझे आवडते कवी मराठी निबंध केशवसुत - majha avadta kavi nibandh
कवी हा असा व्यक्ती असतो जो आपली कला आणि लेखणीच्या साहाय्याने समाजात परिवर्तन घडवून आणतो. कवीला मानवजातीचा प्रथम शिक्षक म्हटले जाते. प्राचीन काळापासून तर आजपर्यंत मराठी साहित्यात असे अनेक महान कवी होऊन गेलेत.
वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर, मुरलीधर देवीदास आमटे, एकनाथ, राम गणेश गडकरी, बहिणाबाई चौधरी, वामन गोपाळ जोशी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, विनायक दामोदर सावरकर, शांता शेळके इत्यादी एक न अनेक कवींनी मराठी साहित्यात लेखन करून मराठी भाषेला समृद्ध केले आहे. तसे पाहता या सर्वच कवींच्या कविता मला वाचायला आवडतात. परंतु ज्या कवींनी मला सर्वात जास्त प्रभावित केले त्यांचे नाव आहे कृष्णाजी केशव दामले. त्यांना आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणूनही ओळखले जाते.
कृष्णाजी केशव दामले यांनी आपल्या कविता 'केशवसुत' या टोपण नावाने लिहिल्या. आधीच्या काळात मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य हिच परंपरा होती. या परंपरेला मोडून त्यांनी अन्य विषयांवर कविता लिहिल्या. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथमच सर्वांसमोर आणले.
केशवसुत यांचा जन्म 7 ऑक्टोंबर 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी झाला. साधारण कुटुंबात जन्मल्याने त्यांच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था झाली नाही. पंचवीस वर्षाच्या वयात त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण केली. लहानपणापासूनच ते अंतर्मुख स्वभावाचे होते. लोकांच्या गर्दीपासून दूर, एकांत जागी बसून निसर्ग सौंदर्य अनुभवणे त्यांना आवडत असे. मोठे झाल्यावर त्यांनी आपली उपजीविका भागवण्यासाठी मुंबईमध्ये निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. प्लेगची साथ आल्यावर मुंबई सोडून ते खानदेशात आले. येथे त्यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली.
केशवसुत यांना लेखनाची अत्यंत आवड होती मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्माविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणाऱ्या या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा अविष्कार केला. केशवसुतांनी जबाबदारीने लिहिलेल्या कवितांपैकी स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण? आणि प्रतिभा या काही प्रमुख कविता आहेत. केशवसुत निसर्गाच्या सानिध्यात वाढले. त्यांनी सृष्टीतील सौंदर्य आणि निसर्गाविषयी अनेक कविता लिहिल्या. भृग, पुष्पाप्रत, फुलपाखरू इत्यादी त्यांच्या प्रसिद्ध कविता आहेत. त्यांचे क्रांतिकारी आणि बंडखोर विचार तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान या कवितांतून दिसून येतो. गूढ साहित्य म्हणून ओळखली जाणारी 'झपूर्झा' ही त्यांची कविता विशेष गाजली आहे. याशिवाय त्यांच्या इतर गूढ कवितांमध्ये म्हातारी, हरपलेले श्रेय या कवितांचा समावेश आहे.
आपल्या जीवनकाळात केशवसुत यांनी 103 कविता लिहिल्या. परमेश्वराने या महान कविला फार कमी आयुष्य दिले. 1905 साली हुबळी येथे शिक्षकाचे काम करीत असताना त्यांना प्लेग झाला. आणि फक्त 39 वर्षाच्या वयात प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या आठ दिवसातच त्यांच्या पत्नी देखील मरण पावल्या. परंतु मृत्यूच्या जवळपास 115 वर्षांनंतरही ते मराठी कविता प्रेमी आणि कविंसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर शासनाने त्यांच्या घराला एका ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले आहे.
--समाप्त--
तर मित्रांनो हा होता maze avadte kavi मराठी निबंध आशा करतो की तुम्हाला हा निबंध उपयुक्त ठरला असेल. आपले विचार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद....
READ MORE: