निमंत्रण पत्र मराठी | वाढदिवस व उद्घाटन | Nimantran patra in marathi

मित्रांनो आज आपण Nimantran patra in marathi पाहणार आहोत हे पत्र मित्राला वाढदिवसाचे निमंत्रण आणि नवीन दुकानाचे उद्घाटन अशा पद्धतीचे आहेत. तर चला सुरू करूया.. 

पत्रलेखणाची माहिती वाचा येथे


invitation letter writing

मित्राला वाढदिवसाचे निमंत्रण पत्र मराठी | letter writing in marathi to friend for birthday invitation 

०९ अल्पबचत कॉलनी,

कृष्णापुर, औरंगाबाद

११ फेब्रुवारी 2021


प्रिय अजय,

भरपूर दिवसांपासून आपली भेट झाली नाही आहे. आणि आता येत्या १५ फेब्रुवारी ला माझा वाढदिवस आहे. माझ्या या वाढदिवशी जर तू येशील तर मला अत्यंत आनंद होईल. वाढदिवसाच्या या दिवशी आम्ही घरातच एका पार्टीचे आयोजन केले आहे. तू माझा आवडता मित्र आहेस आणि तुझ्याशिवाय पार्टी साजरा करण्याचा निर्णय मी स्वप्नात देखील करू शकत नाही. 


मागील 5 वर्षांपासून दरवर्षी तू येत आहेस. आणि तुला तर माहित आहे की दरवर्षी किती मजा येते...! तुझ्याशिवाय आपल्या शाळेतील इतर मित्रांनाही मी आमंत्रण पाठवीत आहे. ते सर्व पण या पार्टी मध्ये येतील. तेव्हा तुझे येणे आणखीनच महत्त्वाचे आहे. येताना तुझ्या लहान ताईला पण सोबत घेऊन ये जो. 

तुझा प्रिय मित्र

मोहित     

birthday invitation letter in marathi

33, महात्मा गांधी उद्यान 
गणपती मंदिर रोड
औरंगाबाद
15 फेब्रुवारी 2021 

प्रिय मित्र महेश,

आशा करतो की तू नेहमी प्रमाणे स्वस्थ आणि आनंदी असशील. जसे की तुला माहीत आहे दरवर्षी माझा वाढदिवस 20 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. 

व दरवर्षाप्रमाणे या वर्षीही मी माझ्या सर्व प्रिय मित्र व नातेवाईकांना, आमच्या घरी वाढदिवसाची पार्टी व मेजवानी देणार आहे. या कार्यक्रमात नृत्य व संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी इतर मित्रांनाही आमंत्रण पाठवले आहे. व मला आशा आहे की तू या समारंभात नक्की येशील. 

काका व काकूंना माझे विनम्र अभिवादन. 

तुझा प्रिय मित्र 
नीलेश     

उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण पत्र | New shop opening / udghatan nimantran patrika in marathi


श्री / श्रीमती

नमस्कार

तुम्हाला तर माहीतच आहे की, परमेश्वर कृपेने शिरसोली नाक्यावर आम्ही एक नवीन हॉटेल सुरू केले आहे. या हॉटेल चे नाव आम्ही हॉटेल समर्थ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व हॉटेल समर्थ चा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला ठेवण्यात आला आहे.


उद्घाटनाच्या या समारंभात सत्यनारायण व महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कृपया आपण आपले संपूर्ण कुटुंब आणि इष्ट मित्रांसाठी समारंभात सहभागी होऊन प्रसादाचा लाभ प्राप्त करावा. ही प्रार्थना..


समर्थ हॉटेल

विनीत मोहित पाटील.


तर मित्रांनो हे होते काही Marathi Nimantran patra & invitation letter marathi sample आशा करतो की हे पत्र तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरले असतील. आपले मत आणि विचार कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने