मी पाहिलेला चित्रपट, माझा आवडता चित्रपट मराठी निबंध | mi pahilela chitrapat marathi nibandh

mi pahilela chitrapat marathi Nibandh: भारतात दरवर्षी अनेक चित्रपट तयार केले जातात. काही कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाने पहावे असे असतात. आजच्या या लेखात आपण माझा आवडता चित्रपट / मी पाहिलेला चित्रपट या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया.. माझा आवडता चित्रपट मराठी निबंध | Maza avadta chitrapat marathi nibandh

हॉलिवुड नंतर जगातील सर्वात मोठी चित्रपट सृष्टी भारतातील हिंदी चित्रपट सृष्टी आहे. चित्रपट हे मनोरंजनासोबत समाजाच्या विचारांना देखील प्रभावित करतात. भारतात हिंदी चित्रपटासोबतच मराठी, तामिळ, भोजपुरी, पंजाबी अश्या विविध भाषांमध्ये चित्रपट तयार केले जातात. चित्रपटांना समाजाचा आरसा म्हटले जाते. लोक मनोरंजन म्हणून  चित्रपट पाहतात. चित्रपट काही काळासाठी का असेना पण आपले चिंता दूर करण्याचे कार्य करतात. 


मी आजवर अनेक चित्रपट पाहिले आहेत. हिंदी, तामिळ आणि मराठी चित्रपट मला विशेष आवडतात. अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि आमिर खान हे माझे आवडते हिरो आहेत. यांचे चित्रपट पाहायला मला आवडते. 


तसे पाहता मी अनेक चित्रपट पाहिले आहेत परंतु माझा आवडता चित्रपट आमिर खान चा '3 इडियट' आहे. आणि मला वाटते की प्रत्येक विद्यार्थ्याने हा चित्रपट पाहायला हवा. 3 इडियट हा चित्रपट मी 50 पेक्षा जास्त वेळा पाहून टाकला आहे. परंतु तरही जेव्हा केव्हा, टीव्ही वर हा चित्रपट लागतो तेव्हा मी पाहतो. 3 इडियट हा चित्रपट 2009 साली रिलीज झाला होता व रिलीज होण्याच्या अवघ्या 4 दिवसात त्याने 100 करोड ची कमाई करून एक नवीन रेकॉर्ड बनवला. 


या चित्रपटाच्या सुरुवातीलाच रणछोडदास अर्थात आमिर खान हा त्यांच्या शहरातील नंबर 1 कॉलेज मध्ये अँडमिशन घेतो. कॉलेज मधील सर्व विद्यार्थी फक्त परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून पास होण्यासाठी अभ्यास करीत असतात. मर्कांच्या दौड मध्ये सर्वजण लागलेले असतात आणि यात भर म्हणजे त्यांच्या कॉलेज चे प्राचार्य विरू सहस्त्रबुद्धि, त्यांचे मानणे असते की कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना नंबर एक येऊन जॉब प्राप्त करायची आहे. 


रणछोडदास हा या विचारांच्या अगदी उलट विचार करतो. त्याचे मानणे असते की डिग्री परीक्षेच्या मर्कांवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवली जाऊ शकत नाही. पालक विनाकारण विद्यार्थ्यांवर चांगले मार्क प्राप्त करण्यासाठी दबाव टाकतात, असे करणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करीयर निवडू द्यायला हवे. विद्यार्थ्याने आयुष्यात तेच करायला हवे ज्यात त्याला आवड आहे. प्रत्येकाने आपली आवड अर्थात पॅशन फॉलो करायला हवे. रणछोडदास चे मित्र व रूम पार्टनर राजू रस्तोगी आणि फरहान कुरेशी हे असतात. 


फरहान ला एक वाइल्डलाइफ फोटोग्राफर बनायचे असते परंतु वडिलांच्या भीतीने तो कधीही आपली आवड सांगत नाही. दुसरीकडे राजू ची घराची परिस्थिती अतिशय हलाखीची असते त्याला नेहमी भविष्याबद्दल भय वाटत असते. तो अभ्यासाशिवाय पूजापाठ कडे लक्ष घालीत असतो. यामुळेच राजू आणि फरहान अभ्यासात नेहमी मागे राहतात. रणछोडदास हा आपल्या दोघी मित्रांना, यश मिळवण्यासाठी आधी आपली क्षमता वाढवणे किती आवश्यक आहे याबद्दल माहिती देतो. तो त्यांना समजावतो की ज्या गोष्टीत तुमची आवड असेल तेच करा. 


या चित्रपटात सर्वच कलाकारांनी खूप छान अभिनय केला आहे. चित्रपटाची कथा अतिशय प्रेरणादायक असून समाजाला खूप काही शिकवून जाते. "या देशात 30 मिनिटात पिझ्झा येतो, पण ॲम्बुलन्स नाही", "रिंग मास्टर च्या भीतीने सर्कस मधील वाघ देखील खुर्चीवर बसणे शिकून जातो, पण तो वाघ चांगला शिकलेला नसून चांगली ट्रेनिंग मिळवलेला असतो", या सारखे एक ना अनेक डायलॉग चित्रपटाचे संवादला धार प्रदान करतात. इत्यादी अनेक कारणांमुळे '3 इडियट' हा माझा आवडता चित्रपट आहे.


तर मित्रहो हा होता maza avadta chitrapat किंवा mi pahilela chitrapat nibandh marathi आशा करतो की हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून मी bhashan marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने