Andhashraddha in marathi: मित्रहो आज आपण आपल्या देशातील एक समस्या अंधश्रद्धा बद्दल माहिती प्राप्त करणार आहोत. ह्या माहितीला आपण अंधश्रद्धा मराठी निबंध (andhashraddha essay in marathi) म्हणूनही वापरू शकतात. तर चला सुरू करूया..
अंधश्रद्धा एक शाप निबंध मराठी | Andhashraddha in marathi
आज 21 व्या शतकातही अनेक लोक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून आहेत. अंधविश्वासी लोक नकली साधू बाबा, तांत्रिक इत्यादींच्या जाळ्यात अडकुन आपले धन, वेळ आणि इज्जत नष्ट करून घेतात. आज आपल्या देशातील लोक विशेष करून ग्रामीण भागातील स्त्रिया अंधश्रध्देच्या शिकार आहेत.
अंधश्रद्धा म्हणजे काय?
कोणत्याही गोष्टी अथवा व्यक्तीवर विचार न करता विश्वास ठेवणे म्हणजेच अंधश्रद्धा होय. कोणावरही अंधाधुंद विश्वास अंधविश्वास म्हणून ओळखला जातो. भारतातील मोठ्या प्रमाणात लोक अंधविश्वास मानतात. नकली बाबा, मौलवी यांच्यावर विचार न करता विश्वास ठेवतात. हे पाखंडी बाबा लोक त्यांच्या मनात काहीतरी भय निर्माण करून त्या समस्येचे निराकरण म्हणून काहीतरी साधना आणि जादूटोणा करायला सांगतात.
अंधश्रद्धेची कारणे
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही न काही समस्या असतात. व या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तो काहीतरी पर्याय शोधत असतो. अश्यावेळी अनेक बाबा लोक धर्माच्या नावावर लोकांना लुटण्यासाठी पुढे येतात.
या बाबांचे दावे असतात की ते तंत्र शक्तीने प्रेम विवाह, जमीन संबंधी समस्या, संतान सुख इत्यादी समस्यांपासून लोकांना मुक्ती देतात. आणि याच मुळे शिक्षित-अशिक्षित दोन्ही वर्गातील लोक अंधश्रद्धेचे शिकार होतात.
अंधश्रद्धेचे नुकसान
अंधश्रध्देचे अनेक नुकसान आहेत. अंधविश्वासाने जीव, धन संपत्ती आणि सन्मानाची हानी होते. पाखंडी तांत्रिक लोक जादू टोना करण्यासाठी लोकांकडून हजारो व लाखो रुपये मागतात. याशिवाय बऱ्याचदा प्राणी तसेच लहान मुलांची बळी देखील मागितली जाते. आपल्या तंत्राच्या नावावर काही तांत्रिक व मौलवी स्त्रियांचा छळ करतात. अंधविश्वासाने फायदे नव्हता नुकसानच होतात.
अंधश्रद्धा रोखण्यासाठी कायदे
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासनाने अनेक कायदे बनवले आहेत. काळा जादू व मनुष्यबळी वर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. तंत्र मंत्राने प्रेत आणि आत्मा बोलावणे कायद्याने गुन्हा आहे. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आपले कार्य
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नागरिकांचे कार्य महत्वाचे आहे. जर आपल्या आजूबाजूला कोणी तंत्र मंत्र साधना करीत असेल तर त्याची माहिती पोलिस स्टेशन ला द्यायला हवी.
समाजात तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेने होणारे दुष्परिणाम समजावून सांगायला हवेत. प्रत्येक व्यक्तीने विज्ञान आणि तर्क बुद्धीने विचार करायला हवा. फक्त परमेश्वरावर श्रद्धा ठेवायला हवे. श्रध्देला अंधश्रध्देच्या रूप देता कामा नये.
तर मित्रांनो ही होती अंधश्रद्धेबद्दल महत्वाची माहिती (Andhashraddha information marathi) आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल. ह्या माहितीला इतरांसोबत शेयर करून जगरुकता निर्माण करा. धन्यवाद.
READ MORE:
👍👍👍
उत्तर द्याहटवा