[झाडे लावा झाडे जगवा निबंध] | Jhade lava Jhade Jagva Nibandh Marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी । zade lava zade jagva essay in marathi.

"वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें" संत तुकारामांनी आपल्या या अभंगात वृक्षापासून आपल्याला होत असलेले फायदे सांगितले आहेत. 

झाडे हि निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अमूल्य भेट आहेत, म्हणून आपण सर्वानी झाडांचे संरक्षण आपले कर्तव्य समजायला हवे. आजच्या या लेखात आपण झाडे लावा झाडे जगवा (Jhade lava Jhade Jagva Nibandh) या विषयावर मराठी भाषण किंवा निबंध मिळवणार आहोत.


झाडे लावा झाडे जगवा निबंध

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध (Jhade lava Jhade Jagva Nibandh Marathi)

झाडे ही आपल्या पृथ्वीतलावर असलेली आणि निसर्गाने मनुष्याला दिलेली अमूल्य भेट आहे. मनुष्याला जीवन जगण्यासाठी झाड अतिशय महत्त्वपूर्ण साधन आहेत. मनुष्यच नाही तर पृथ्वीवरील सर्वच जीवजंतूना जीवन जगण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडे मनुष्य प्राण्यांना अनेक साऱ्या नैसर्गिक संकटांपासून वाचवत असतात. एका तऱ्हेने ते आपले पालन पोषण करत असतात. झाडे आपली पृथ्वी आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. म्हणून आपल्याला देखील झाडांच्या संरक्षणासाठी पूर्ण जवाबदार आणि जागरूक बनायला हवे. 

लहान आकाराच्या झाडांपेक्षा लांब आणि परिपक्व वाढणारी झाडे अधिक उपयोगाचे असतात. कारण घनदाट झाडे कार्बन डायऑक्साइड जास्त प्रमाणात शोषतात, पावसापासून संरक्षण देतात, मोठी सावली उपलब्ध करवून देतात आणि उष्णतेचा ताप कमी करतात. संशोधनातून लक्षात आले आहे की 'एक एकर' जागेत लावलेली झाडे 20 लोकांसाठी एक वर्षाचा ऑक्सिजन तयार करतात. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात तेथे हिवाळा आणि उन्हाळा दोघेही ऋतु नियंत्रित राहतात, अतिवृष्टी आणि अती उष्णता देखील झाडांमुळे टाळता येते. 

झाडे ही सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोकतात. ज्या ठिकाणी जास्त झाडे असतात तेथील ओझोन लेयर चांगल्या प्रमाणात असतो. या शिवाय झाडे आपल्याला अन्न जसे फळ भाज्या, लाकूड, औषधी इत्यादी अनेक गोष्टी देत असतात. झाडे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण कमी करण्यात उपयुक्त आहेत.

झाडांचे अनेक फायदे असल्याने आपण त्यांचे मूल्य समजून घ्यायला हवे. मनुष्याने झाडे तसेच जंगल तोंड करायला नको व कोणी असे करत असेल तर त्याला रोखायला हवे. शासनाने वृक्षांचे व जंगलांचे संरक्षण करण्यासाठी योग्य कायदे अमलात आणायला हवेत. व अधिकाधिक लोकांना झाडे लावण्यासाठी आणि वृक्षतोंड रोखण्यासाठी प्रेरित करायला हवे.

***



झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध | Jhade lava Jhade Jagva Nibandh Marathi

सुरुवातीपासूनच झाडांनी मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन इत्यादी गोष्टी दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व झाडांमुळेच अस्तित्वात आहे. मनुष्याला जीवनावश्यक वस्तू जसे अन्न, हवा, पाणी, दवा औषधी या झाडांकडूनच मिळतात. म्हणून म्हटले जाते की झाडे लावा झाडे जगवा. आज झाडे वाचवा झाडे जगवा हि गोष्ट यासाठी करावी लागत आहे कारण मनुष्य अन्य नैसर्गिक संसाधनाप्रमाणेच झाडांनाही नष्ट करत आहे. जगभरात वाढत्या लोकसंख्या मुळे अन्नपाणी राहण्यासाठी घरे आणि जागेची मागणी वाढीत आहे. ज्यामुळे जगभरात अंधाधुंद वृक्षतोड सुरू आहे. 

झाडेझुडपे ही समाजाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतात. आपल्या आसपासचा परिसर जसे गल्ल्या, मैदाने, बाग-बगीचे इत्यादी ठिकाणी झाडे स्वच्छ हवा देण्याचे काम करतात. वातावरणाला हिरवे आणि शांत ठेवण्यात ते मदत करतात. झाडे कार्बन डाय-ऑक्साइड वायूला वातावरणातून शोषून घेतात, व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. हाच ऑक्सिजन मनुष्याला श्वासोश्वास करण्यासाठी महत्त्वाचा असतो. 

आपल्या देशात झाडांची पूजा केली जाते त्यांना देवाचे स्थान दिले जाते. वड, पिंपळ यासारखे झाडांना आपल्या देशात पूजले जाते. परंतु आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक ठिकाणी शहरीकरण होत आहे. ज्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. याशिवाय आजसुद्धा बऱ्याच घरात अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो. 

पर्यावरणाचे संतुलन टिकून ठेवण्यासाठी झाडांना वाचवणे खूप आवश्यक आहे. शहरी भागात झाडांच्या कमी मुळे गाड्यांमधून निघणारा धूर आकाशात राहून जातो ज्यामुळे श्र्वासोश्वासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. जर अश्याच पद्धतीने वृक्षतोड सुरू राहिली तर लवकरच वृक्षांत सोबत मनुष्यजातीचा देखील अंत होईल. म्हणून आपण वृक्षतोड करायला नको व जर कोणी वृक्षतोड करीत असेल तर त्याला सुद्धा थांबायला हवे. जास्तीत जास्त लोकांमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोहोचवायला हवा.

***


मित्रांनो या लेखात आपल्यासोबत झाडे लावा झाडे जगवा या विषयावरील सुंदर निबंध शेअर केले आहेत. हे निबंध आपण व्यवस्थित अभ्यासावेत व यातून प्रेरणा घेण आपल्या पद्धतीने परीक्षेत छान निबंध लिहावा. वरील लेखात देण्यात आलेले Zade Lava Zade Jagva essay in Marathi आपणास कसे वाटले आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा. धन्यवाद..!


इतर निबंध

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने