Stri Shikshanache Mahatva : मित्रांनो आज आपल्या देशात मुलींचे व स्त्रियांचे शिक्षण काळाची गरज बनलेले आहे. समाजातील स्त्री शिक्षणाचे महत्व भरपूर आहे. आजही देशातील अनेक ठिकाण अशी आहेत जेथे स्त्रियांना शिक्षित केले जात नाही, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही.
पण खरोखर समाजाची प्रगती करून घ्यायची असेल तर स्त्री शिक्षण काळाची गरज आहे (Stri Shikshan Kalachi Garaj) आहे. म्हणूनच या लेखात आपण स्त्री शिक्षणाचे महत्व (Stri Shikshanache Mahatva) व स्त्री शिक्षण काळाची गरज या विषयावर मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया.
स्त्री शिक्षण निबंध |
स्त्री शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Stri Shikshanache Mahatva Nibandh in marathi
एका सभ्य आणि सुशिक्षित समाजाचे निर्माण त्या देशातील शिक्षित नागरिकांमुळे होते. असे मानले जाते की एका पुरुषाला शिक्षित केल्याने एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि एका स्त्री ला शिक्षित केल्याने संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. स्त्री कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. ती आईच्या रूपात आपल्या मुलांना संस्कार देते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही शिक्षित करणे महत्वाचे आहे.
भारतात आज विशेष करून शहरी भागात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. परंतु आजही जर आपण भारताची तुलना इतर विकसित देशांशी केली तर आपल्या लक्षात येईल की महिलांना शिक्षित करण्यात आपण किती मागे आहोत. शिक्षण आयुष्यात खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो आणि सोबतच ज्ञान देखील वाढते. खरे पाहता शिक्षण हेच मुर्खाला विद्वान बनवते.
मागील काही दशकात देशात जी काही महिलांची स्थती सुधारली आहे ती फक्त आणि फक्त स्त्री शिक्षणामुळे शक्य झाली आहे. भारताला विकसनशील देश बनवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही वर्षाआधी महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या साक्षरतेची संख्या अधिक होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा देश प्रजासत्ताक राष्ट्र बनले तेव्हा पासून शासनाने महिला शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली.
जरी आज प्रत्येक गावागावात शिक्षण पोहचले आहे, तरीही देशातील काही ठिकाण असेही आहेत जेथे स्त्रियांना शिकवणे व्यर्थ मानले जाते. त्यांना फक्त चूल आणि मुल सांभाळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशिक्षित महिलेपेक्षा एक शिक्षित महिला जास्त सक्रिय पद्धतीने कुटुंबाला सांभाळते. शिक्षित महिला तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जवाबदार बनवते. ती तिच्या मुलांमध्ये चांगल्या गुणांचा संचार करते. अशा पद्धतीने एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंब आणि समाजाला शिक्षित करते. म्हणून स्त्रीे शिक्षणाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवे.
स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. शिक्षण प्राप्त करून स्त्री मध्ये आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण होतो. याशिवाय महिलांना शिक्षित केल्यावर कुटुंबाला त्याचे फायदे होतात. शिक्षित महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकते. शिकलेले स्त्री आपल्या मुलांना कधीही अशिक्षित राहू देणार नाही. लहानपणापासूनच ती आपल्या बाळामध्ये सद्गुणांचा संचार करील.
आज भारत हा स्त्री शिक्षणात नित्य प्रगती करीत आहे. भारताचा इतिहास अनेक शूरवीर महिलांनी भरलेला आहे. घरातील चुली पासून बाहेर निघून व्यवसाय, साहित्य, प्रशासन, पोलिस, सैन्य, खेळ इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला पुढे आल्या आहेत. आजच्या इंटरनेट च्या युगात तर अनेक महिला घरची कामे सांभाळीत मोबाईल वर ऑनलाइन शिक्षण प्राप्त करीत आहेत. देशाच्या उज्वल भवितव्यासाठी स्त्रियांचे शिक्षण अती महत्त्वाची बाब आहे. म्हणून आपण सर्वांनी स्त्रियांना अतिशय उत्साहाने पुढे करायला हवे. आणि सोबतच जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करून नवनवीन गोष्टी अभ्यासक्रमात सामील करायला हव्यात.
--समाप्त--
तर मित्रहो हा होता स्त्री शिक्षणाचे महत्व (Stri Shikshanache Mahatva) या विषयवार लिहिलेला मराठी निबंध आशा आहे की स्त्री शिक्षाण काळाजी गरज - stri shikshan kalachi garaj हा निबंध तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद..
READ MORE:
खूप छान विचार मांडले सर.
उत्तर द्याहटवा