बिनभांडवली व्यवसाय आणि महिला गृह उद्योग यादी | Gharguti Gruh udyog list in Marathi
बिनभांडवली व्यवसाय - Home business ideas in Marathi : नमस्कार, जेव्हा कधी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचार येतो तेव्हा आपल्या समोर अनेक समस्या उभ्या राहतात जसे- शहरातील रहदारी असलेल्या ठिकाणी दुकान भाड्याने घेणे, खूप सारे पैसे गुंतवून माल विकत आणणे, अनेक कर्मचारी कामावर ठेवणे इत्यादी. आणि हा खर्चीक विचार करूनच अनेक लोक स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय फेटाळून लावता.
परंतु देशातील वाढत्या गृह उद्योगांमुळे अनेक लोक आता आपल्या घरूनच बिनभांडवली व्यवसाय सुरू करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवीत आहेत. आजच्या आधुनिक युगात गृहउद्योग सुरू करणे अधिकच सोपे झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आपल्या वस्तूंची जाहिरात देखील करू शकता.
आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी गृह उद्योग सुरू करण्याकरिता 10 उत्तम बिनभांडवली व्यवसाय व बिनभांडवली गृह उद्योग यादी - gharguti udyog list in marathi घेऊन आलो आहोत. हे gruh udyog in marathi पुरूषांसोबतच महिला गृह उद्योग म्हणूनही उपयुक्त आहेत तर चला पाहूया या बिनभांडवली लघु उद्योग लिस्ट मराठी.
महिला गृह उद्योग, बिनभांडवली व्यवसाय लिस्ट | business ideas in marathi
1) होलसेल वस्तू खरेदी करून ऑनलाईन विकणे (online product selling)
या छोट्याश्या संकल्पनेवर आज अनेक गृहउद्योग यशस्वी कार्य करीत आहेत. या मध्ये तुम्ही एखाद्या होलसेल विक्रेत्याकडे जाऊन कोणतीही एक वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिला फ्लिपकार्ट, अमेझॉन या सारख्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म वर लिस्ट करू शकतात.
खरेदी दरामध्ये थोडी वाढ करून आपण या वस्तू ऑनलाईन विकू शकतात. आज अनेकजण पुस्तके, खेळणी, व्यायामाचे साहित्य तसेच स्वतः घरी बनवलेल्या वस्तू अमेझॉन द्वारे संपूर्ण भारतात पोहचवित आहे. म्हणून तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.
2) स्वतःची जिम व फिटनेस सेंटर
आज अनेक लोक आपल्या फिटनेस च्या प्रती सजग झाले आहेत. म्हणून जर तुम्ही सुरुवातीला थोडी गुंतवणूक करून जिम चे साहित्य खरेदी करीत असाल तर तुम्ही आपल्या घरीच जिम सुरू करू शकता.
3) यूट्यूब चैनल (Youtube channel)
वाढत्या इंटरनेट वापरामुळे आपल्या देशातील डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. आशा मध्ये अनेक लोक यूट्यूब व्हिडिओ च्या माध्यमाने लोकांना माहिती देऊन खूप पैसे कमावत आहेत.
जर तुम्हाला कोणत्याही विषयाबद्दल चांगली माहिती असेल तर आपण एक यूट्यूब चैनल उघडून लोकांना ती माहिती देऊ शकता. यूट्यूब वर पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत. व सुरुवातीला यूट्यूब चैनल उघडण्यासाठी कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही.
4) फास्ट फूड चा व्यवसाय
फास्ट फूड एक असा व्यवसाय आहे जो शहर व गाव प्रत्येक ठिकाणी केला जाऊ शकतो. आजकाल प्रत्येक ठिकाणी फास्ट फूड खाण्याचे चलन वाढत आहे. याचा फायदा घेऊन आपण एक छोटेसे फास्ट फूड स्टोअर उघडू शकता. परंतु दुकान सुरू करण्याआधी तुम्हाला स्वादिष्ट पदार्थ बनवणे शिकावे लागेल. यूट्यूब व गुगलच्या मदतीने तुम्ही अनेक रेसिपी शिकू शकतात. महिला आपल्या किचन मधून हा व्यवसाय सुरू करू शकता.
5) सायबर कॅफे (cyber cafe)
आजकाल आपल्या देशातील प्रत्येक काम ऑनलाइन होत आहे. परीक्षेचे फॉर्म भरणे, कॉलेज मध्ये एडमिशन, ऑनलाइन दाखले काढणे, परीक्षा, फी व इतर जवळपास सर्वच ऑफिसियल कामे ऑनलाईन होत आहेत.
हळूहळू कॉम्प्युटरचा वापर वाढत आहे व येणारा काळ संगणकाचाच राहील. अशा मध्ये आपण एक सायबर कॅफे उघडून नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त एक कॉम्प्युटर व इंटरनेट ची आवश्यकता आहे. घरात किंवा मार्केट मध्ये बाहेर कुठेही एक छोटासा रूम भाड्याने घेऊन आपण हा व्यवसाय सुरु करू शकतात.
6) गाडी भाड्याने देणे (car on rent)
जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम आहे. गाडी च्या मदतीने पैसे कमवण्यासाठी तुम्हाला आपली कार भाड्याने द्यावी लागेल. इंटरनेटच्या मदतीने हे काम आणखीनच सोपे होईल. गूगल वर आपली लोकेशन टाकून तुम्ही advertise देऊ शकता.
7) फुल सजावटीचा व्यवसाय
आपल्या देशात धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, वाढदिवस इत्यादी कार्यक्रम होत असतात. अशा ठिकाणी डेकोरेशन करण्यासाठी एका डेकोरेटर ची आवश्यकता असते. अश्यात आपण फुल सजावटीचा व्यवसाय सुरू करू शकतात. सण उत्सव तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमात तुम्हाला सजावटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळून जातील. आपल्या सजावटीचे व्हिडिओ युट्युब ला टाकून तुम्ही आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकतात.
8) व्हॉईस ओवर आर्टिस्ट (voice over artist)
कार्टून तसेच हॉलिवूड किंवा साऊथ च्या चित्रपटांना डबिंग करीत असताना व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट ची आवश्यकता असते. जर तुम्हाला वेगवेगळे आवाज काढत येत असतील तर तुम्ही आपल्या टॅलेंट चा उपयोग पैसे कमवण्यासाठी करू शकतात.
जर आपल्या वाटले तर या साठी सुरुवातीला तुम्ही काही कोर्सेस देखील करू शकतात. या व्यवसायात मध्ये कोणताही पैसा न गुंतवता आपले कौशल्य संपूर्ण जगाला दाखवता येऊ शकते.
9) लहान मुलांची काळजी (baby care center)
आजकाल शहरांमध्ये एका कुटुंबातील मम्मी व पप्पा दोघांनाही कामानिमित्त घराबाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी एका केअर टेकर ची आवश्यकता असते.
या संधीला तुम्ही एका व्यवसायाच्या रूपाने सुरू करू शकता. यासाठी तुम्ही आपल्या घराला लहान मुलांसाठी योग्य पद्धतीने सजवू शकता. वेगवेगळी खेळणी आपल्या घरात आणून एक रूम तयार करा. जेणेकरून पालक आपल्या बाळाला तुमच्या विश्वासावर टाकून जातील.
10) गाडी व मोटार सायकल धुणे
हा व्यवसाय गाव व शहर दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू शकतो. यासाठी कोणतेही पैसे गुंतवण्याची आवश्यकता नसते किबहूना कोणतीही ट्रेनिंग घ्यावी लागत नाही. खूप कमी साहित्यात आपण आपल्या घरीच कार तसेच बाईक धुण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.
शेवटचे शब्द
प्रिय वाचकांनो, कोणतेही कार्य सुरू करून त्याला यशस्वी करण्यासाठी योग्य निर्णयासोबतच प्रेरणेची आवश्यकता असते, ही प्रेरणा बाह्य असण्यापेक्षा अंतर्गत असली तर परिणाम अधिक चांगले येतात.
वर दिलेल्या बिनभांडवली व्यवसाय व gharguti udyog list in marathi मधून कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्याची कल्पना आपले मित्र व कुटुंबीयांना नक्की द्या. कठीण परिस्थितीत त्यांचे मत आणि मदत नक्की घ्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले काम फक्त काम म्हणून न करता त्याला आपली आवड बनवून मनोरंजनाच्या रूपाने करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद
Best Ahe Tumachi Site
उत्तर द्याहटवासर तुमची साईट वर पेपर बाग विश्यीकाही माहिती नाही या संदद्र्भाया त काही माहिती
उत्तर द्याहटवा