इन्शुरन्स (विमा) म्हणजे काय आणि प्रकार ? insurance information in marathi

विमा म्हणजे काय ? एलआयसी ची माहिती | insurance information in marathi

आजकाल टीव्ही, वृत्तपत्र व इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विमा जाहिरात केल्या जात आहेत. विमा अर्थात लाईफ इन्शुरन्स व्यक्तीला भविष्यात होणाऱ्या  नुकसानाशी लढण्याचे प्रभावी हत्यार आहे. आजच्या या लेखात विमा अर्थात life insurance information in Marathi देण्यात आली आहे. तर चला सुरू करुया...


life insurance information in marathi

विमा काय आहे ? What is insurance in marathi

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर insurance चा अर्थ आहे - एक अशी व्यवस्था ज्यात एक विमा कंपनी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या आकस्मिक नुकसान, आजार, दुर्घटना व मृत्यू इत्यादी परिस्थितीत तुम्हाला नुकसान भरपाई देते. या बदल्यात तुम्हाला काही रक्कम नियमितपणे दरमहा किंवा वार्षिक पद्धतीने विमा कंपनीला भरत राहावी लागते.


आजच्या या धकाधकीच्या आणि आपराधिक जगात केव्हा काय होईल सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी म्हणून विमा काढणे सर्वांच्याच हिताचे आहे. विमा बद्दल अधिक माहिती पुढे पाहूया.


विमा चे प्रकार

तसे पाहता insurance चे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत परंतु येथे आम्ही काही प्रमुख विमा प्रकार नमूद करीत आहोत.


1) जीवन विमा म्हणजे काय | life insurance in marathi 

नावावरून लक्षात येते की life insurance किंवा जीवन विमा आपल्या जीवनावर केला जातो. जीवन विमा यासाठी काढला जातो की आपल्या मृत्यू नंतर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक दृष्ट्या इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज यायला नको. 


लाइफ इन्शुरन्स त्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे जे घरात एकटे कमावणारे आहेत. व ज्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे. जीवन विमा अधिक माहिती वाचा येथे


2) दुर्घटना विमा योजना | accident insurance in Marathi

दुर्घटना विमा हा देखील काही गोष्टीमध्ये जीवन विमाशी मिळताजुळता आहे. परंतु या मध्ये फक्त विमाधारकाच्या मृत्यूनंतर पैसे न मिळता छोट्या मोठ्या अपघातात होणाऱ्या दवाखान्याच्या खर्चासाठी देखील पैसे मिळतात. 


3) आरोग्य विमा | helath insurance in Marathi

आरोग्य विमा हा मेडिकल ट्रीटमेंट मध्ये येणारा खर्च कव्हर करण्यासाठी केला जातो. या मध्ये वेगवेगळे प्रकार वेगवेगळे रोग आणि आजारांना कव्हर करतात. 


तुम्ही सर्व आजारांना लागू असलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतात किंवा विशिष्ट रोगासाठी असलेली specific policy देखील सुरू करू शकता. हा विमा सुरू करण्यासाठी तुम्ही ठराविक मूल्य दरमहा जमा करून दवाखान्याच्या आर्थिक खर्च आटोक्यात आणू शकता. या विम्यात औषधी, ऑपरेशन आणि regular checkup इत्यादी सर्व खर्च विमा कंपनी करते.


4) वाहन विमा योजना | vehicle insurance in Marathi

जर तुमच्याकडे एखादी कार, मोटर सायकल अथवा इतर कोणते वाहन असेल तर तुम्ही त्याच्या सुरक्षिततेसाठी vehicle insurance हा विमा काढू शकता.


वाहन विमा हा तुमच्या गाडीची दुर्घटना, अपघात, चोरी इत्यादी परिस्थितीत तुम्हाला उपयुक्त ठरतो. हा विमा काढल्यावर आपण आपल्या वाहनाच्या लहान-मोठ्या अपघातावर देखील claim करून नुकसानभरपाई मागू शकता.


5) गृह विमा | home insurance in Marathi

जर तुम्ही नवीन घर बांधले असेल तर आपल्या घरासाठी home insurance बनवणे अत्यंत आवश्यक आहे. होम इन्शुरन्स तुम्हाला नैसर्गिक तसेच मानवी अपत्यांपासून सुरक्षित करतो. चोरी, आग, भूकंप अशा परिस्थितीत गृह विमा तुम्हाला नुकसान भरपाई देते. 


6) पीक विमा | crop insurance  in Marathi

जर आपण एक शेतकरी असाल तर पीक विमा आपल्या साठी अत्यंत उपयुक्त आहे. नुकसान होऊ नये अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी आपल्या पिकाचा विमा काढायला हवा. 


जर विमा काढलेल्या शेतकऱ्याच्या शेतात पाऊस अथवा दुष्काळ इत्यादी कारणांमुळे पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. 


याशिवाय ही विम्याचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत-

  1. पाळीव प्राण्यांचा विमा
  2. राजनीतिक जोखमीचा विमा
  3. विवाहसाठी विमा
  4. कोरोनाव्हायरस विमा
  5. मोबाईल फोन चा विमा
  6. शिक्षण विमा
  7. यात्रा व प्रवास विमा


Insurance विमा claim कसा करावा

जर आपण एखाद्या कंपनीत विमा काढला असेल आणि यादरम्यान आपली संपत्ती अथवा जीवाची हानी झाली असेल तर पुढील पद्धतीने विमा claim करता येतो.


  1. यासाठी सर्वात आधी आपल्या विमा कंपनीत जाऊ. Insurance policya च्या विरुद्ध claim करावे लागते. 
  2. आता तुम्हाला आपल्या नुकसानाविषयी सर्व माहिती द्यावी लागेल. संपत्ती चे bills प्रमाण, नुकसानाचे फोटो, दवाखान्याच्या खर्च इत्यादी सर्व जमा करावे. 
  3. यानंतर तुमचे काम संपते. आता इन्शुरन्स कंपंनी योग्य पद्धतीने तपासणी करून तुमचे claim verify करेल. 
  4. जर तुम्ही केलेला claim योग्य असेल तर तुम्हाला तुमच्या नुकसानानुसार claimed amount मिळुन जाईल. 


तर मित्रहो ही होती विमा बद्दल काही महत्त्वाची माहिती. अशा आहे की ही insurance information in marathi माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. 

ह्या माहितीला आपल्या नातेवाईक व मित्रमंडळीसोबत शेअर करून त्यांनाही विमाचे फायदे व महत्त्व समजावून सांगा. आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद....


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने