बारा राशी नावे | नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास | rashi names in marathi

ज्योतिष शास्त्रात बारा राशी सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक राशीची नावे वेगवेगळी आहेत. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत. या सोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास कोणती आहे याबद्दलही माहिती आपणास प्राप्त होईल.


रास / राशी म्हणजे काय

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात.



बारा राशींची नावे 

  • मेष 
  • वृषभ
  • मिथुन
  • कर्क
  • सिंह
  • कन्या
  • तूळ
  • वृश्चिक
  • धनु
  • मकर
  • कुंभ
  • मीन 


नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास

जर एखाद्या व्यक्तीचे जन्म नाव कुंडली व जन्म तारीख आणि वेळ पाहून ठेवण्यात आले असेल. तर त्याच्या जन्म नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवली जाते. पुढे राशी नावे व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत.

विशिष्ट नावाची रास जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पहा :

  • मेष : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
  • वृषभ : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
  • मिथुन : का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
  • कर्क: ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
  • सिंह : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
  • कन्या : ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
  • तूळ : रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
  • वृश्चिक : तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
  • धनु : ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
  • मकर : भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
  • कुंभ : गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
  • मीन : दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


राशी नुसार स्वभाव

आपण नेहमी विचार करतो की आपला स्वभाव, व्यवहार आणि वागणूक इत्यादि कोण निश्चित करते. काही लोकांचा स्वभाव शांत असतो, काही अतिशय चतुर असतात, काहींना एकटेपणा आवडतो तर काही राजाप्रमाणे जगणे पसंद करतात. व्यक्तीचा हा स्वभाव त्याच्या लग्न रास वर अवलंबून असतो. 


प्रत्येक व्यक्तीच्या जन्म कुंडलीत 12 भाव अर्थात घरे असतात. या मध्ये लग्न, सुख, स्त्री आणि व्यापार हे चार प्रमुख आहेत. कुंडली मधील प्रथम भाव हे लग्न असते, जे व्यक्तीची वागणूक अन् व्यवहार नियंत्रित करते. आता आपण जाणुया की तुमची लग्न राशी तुमच्या बद्दल काय म्हणते. 


नोट: जर आपणास आपली लग्न रास माहीत नसेल तर आपण खाली आपली जन्म तारीख आणि जन्म वेळ कमेन्ट करू शकतात. आम्ही तुमची कुंडली काढून तत्काळ तुमची लग्न रास सांगून देऊ. 


मेष लग्न : मेष राशीचे व्यक्ती परिश्रम घेणारे असतात. परंतु धैर्याचा कमतरतेमुळे हे लोक लवकर परिणाम न दिसल्याने कोणतेही कार्य मध्येच अर्धवट सोडून देतात.


वृष लग्न : वृष राशीचे सूचक बैल असते. या राशीचे लोक कठीण कार्यही अतिशय सहजतेने पूर्ण करतात. या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो. 


मिथुन लग्न : मिथुन राशीचे चिन्ह स्त्री पुरुष आहे. मिथुन राशीचे लोक बहुमुखी प्रतिभावान असतात. कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवण्यात त्यांचा कल असतो.


कर्क लग्न : कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा गुंतागुंतीचा असतो. हे लोक आपले काम कोणत्याही पद्धतीने काढून नेताता. सतत करू करणे हा त्यांचा स्वभाव असतो.


सिंह लग्न : सिंह राशीचे राशी चिन्ह सिंह आहे. ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो त्याच पद्धतीने सिंह लग्न असणारे लोक राजाप्रमाने जीवन जगतात. यांचा स्वभाव नरम आणि निडर असतो. व वेळप्रसंगी हे लोकांना मदतही करतात. 


कन्या लग्न: कन्या राशीचे चिन्ह स्त्री आहे. या लोकांचा शांत स्वभाव हा मुख्य गुण असतो. या राशीचे लोक सरळ भोळे आणि जमिनीशी जुळलेले असतात. यांची काम करण्याची गती हळुवार असते परंतु आपल्या कामाच्या प्रति ते अतिशय संवेदनशील असतात. 


तूळ लग्न : तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते. सर्वांसोबत सारखा व्यवहार आणि व्यवस्थित जीवन हेच त्यांचे प्रमुख गुण आहेत. 


वृश्चिक लग्न : कोणासमोरही आपल्या मनातील गोष्टी न सांगणे व स्वतः साठी अनुकल असलेल्या संधीच्या शोधात असणे ह्या लोकांचे मुख्य स्वभाव आहे. यांच्या स्वभावात थोडा कडूपणा असतो. स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्तीही चांगली असते. 


धनु लग्न : धनु लग्न असणारे व्यक्ती आपल्या कार्याला एक ध्येय म्हणून ठेवतात. यांना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही. हे लोक अतिशय श्रेष्ठ आणि ज्ञानी असतात. परंतु आपल्या गुणांमुळे यांचा अहंकार ही बऱ्याचदा वाढून जातो.


मकर लग्न : मकर राशीचे चिन्ह मगर आहे. मकर लग्न असणारे लोक खूप मेहनती असतात. त्यांचा स्वभाव कठोर असतो. कोणाकडे लक्ष देण्याआधी हे स्वतःचे हित पाहतात. जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता लढण्याची हिम्मत यांच्यात असते. 


कुंभ लग्न : स्वच्छ मन आणि नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करणारे कुंभ लग्न असणारे जातक साधी प्रवृत्तीचे असतात. यांचे मन अतिशय स्वच्छ असते आणि कोणाचीही निंदा, चुगली न करणे यांच्या स्वभावातच असते. सदैव समाज आणि सर्वांना हितकारी ठरतील अशी कामे हे लोक करतात.


मीन लग्न : मीन राशीचे चिन्ह दोन माश्यांची जोडी आहे. या लोकांचा स्वभावही माश्या प्रमाणेच असतो. हे लोक सदैव स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक गुणांनी भरलेले मीन राशीचे जातक गुरु समान असतात. बोलण्यात गोडी आणि स्वभावात गंभीरता असल्याने प्रत्येक जण यांची गोष्ट लक्ष देऊन ऐकतात.


तर मित्रांनो ही होती बारा राशी नावे, नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास आणि  राशी नुसार स्वभाव या बद्दलची माहिती. आशा आहे की ही माहिती तुमचे ज्ञान वाढवण्यात उपयुक्त ठरली असेल. धन्यवाद...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या