मूळ संख्या 1 ते 1000 पर्यंतच्या | prime numbers in marathi

मूळ संख्या म्हणजे काय ? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या | prime numbers in marathi  

prime numbers in marathi : आजच्या हा लेखात आपण गणितातील अत्यंत उपयुक्त भाग मूळ संख्या बद्दल माहिती प्राप्त करणार आहोत. मूळ संख्यांना इंग्रजी भाषेत prime number (प्राईम नंबर्स) म्हटले जाते. मूळ संख्या म्हणजे काय आणि मूळ संख्या 1 ते 100 मध्ये कोणत्या आहेत? ही सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. तर चला सुरू करूया.. 


मूळ संख्या म्हणजे काय? (mul sankhya / prime numbers in marathi)

इंग्रजीत prime number म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संख्येला मराठी भाषेत मूळ संख्या म्हटले जाते. ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो अश्या संख्येला 'मूळ संख्या' म्हटले जाते. 

उदाहरणार्थ : 5, पाच या संख्येला फक्त 1 किंवा 5 नेच पूर्ण भाग जातो. म्हणून 5 ही देखील एक मूळ संख्या आहे. 


1 to 100 mul sankhya

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या

1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. या संख्या पुढील प्रमाणे आहेत.

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19,23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97


1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्या | mul sankhya 1 to 1000

2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97, 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199, 211, 223, 227, 229, 233, 239, 241, 251, 257, 263, 269, 271, 277, 281, 283, 293, 307, 311, 313, 317, 331, 337, 347, 349, 353, 359, 367, 373, 379, 383, 389, 397, 401, 409, 419, 421, 431, 433, 439, 443, 449, 457, 461, 463, 467, 479, 487, 491, 499, 503, 509, 521, 523, 541, 547, 557, 563, 569, 571, 577, 587, 593, 599, 601, 607, 613, 617, 619, 631, 641, 643, 647, 653, 659, 661, 673, 677, 683, 691, 701, 709, 719, 727, 733, 739, 743, 751, 757, 761, 769, 773, 787, 797, 809, 811, 821, 823, 827, 829, 839, 853, 857, 859, 863, 877, 881, 883, 887, 907, 911, 919, 929, 937, 941, 947, 953, 967, 971, 977, 983, 991, 997.


जोडमुळ संख्या म्हणजे काय ? 1-100 मधील जोडमुळ संख्या

ज्या दोन मूळ संख्यामध्ये 2 चा फरक असतो. त्यास जोडमूळ संख्या म्हटले जाते. 

1 ते 100 मध्ये 8 जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 1 ते 100 मधील जोड मूळ संख्या पुढील प्रमाणे आहेत.

3 व 5

5 व 7

11 व 13

17 व 19

29 व 31

41 व 43 

59 व 61

71 व 73


सममूळ संख्या म्हणजे काय? सम मूळ संख्या कोणत्या

सम मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जी सम आणि मूळ दोन्ही आहे. गणितात ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो तिला सम संख्या म्हणतात. 

म्हणून संख्या प्रणाली मध्ये 2 हि एकमेव सममूळ संख्या आहे. 


सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे?

2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे.  


1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होते? 

1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची एकूण बेरीज 24133 एवढी होते.


1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती होते? 

1 ते 1000 पर्यंतच्या मूळ संख्यांची एकूण बेरीज 368213 एवढी होते.


तर मित्रहो ही होती मूळ संख्या बद्दल महत्वाची माहिती. आम्ही आशा करतो की prime numbers in marathi किंवा mul sankhya विषयी असणारे आपले सर्व प्रश्न दूर झाले असतील. जर अजूनही आपल्या मनात काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून विचारा आम्ही लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद... 


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने