बारा राशी नावे | तुमची रास काय आहे ? नावावरून रास | Rashi Names in Marathi

Rashi Names in Marathi : ज्योतिष शास्त्रात बारा राशी सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक राशीची नावे वेगवेगळी आहेत व प्रत्येकाच्या जन्म नावावरून रास ही वेगवेगळी असते. 

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी बारा राशींची नावे समाविष्ट केली आहेत. या सोबतच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून रास कोणती आहे याबद्दलही माहिती आपणास प्राप्त होईल. जर आपणास माहीत नसेल की माझी रास काय आहे? तर या लेखाद्वारे तुम्हाला बारा राशी नावे व नावावरून रास ची माहिती मिळून जाईल. 


रास / राशी म्हणजे काय

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात.


माझी रास काय आहे बारा राशी नावे

बारा राशींची नावे - Rashi Names in Marathi

पुढे आपणास बारा राशी नावे देण्यात आलेली आहेत. हे Rashi Names in Marathi त्यांच्या इंग्रजी नावासह पुढीलप्रमाणे- 

  • मेष (Aries)
  • वृषभ (Taurus)
  • मिथुन (Gemini)
  • कर्क (Cancer)
  • सिंह (Leo)
  • कन्या (Virgo)
  • तूळ (Libra)
  • वृश्चिक (Scorpio)
  • धनु (Sagittarius)
  • मकर (Capricorn)
  • कुंभ (Aquarius)
  • मीन (Pisces)

माझी रास काय आहे ? नावावरून रास 

जर एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्याची कुंडली, जन्म तारीख आणि जन्म वेळ पाहून ठेवण्यात आले असेल, तर त्याच्या जन्म नावाच्या पहिल्या अक्षरावरून राशी ठरवली जाते. 

जर आपणास कायम हा प्रश्न पडत असेल की माझी रास काय आहे व नावावरून रास कशी शोधावी तर पुढे राशीची नावे व ती राशी असणाऱ्या लोकांच्या नावाची पहिली अक्षरे देण्यात आली आहेत.

कोणत्याही नावाची रास जाणून घेण्यासाठी पुढील तक्ता पहा :

  • मेष : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
  • वृषभ : ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
  • मिथुन : का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
  • कर्क: ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
  • सिंह : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
  • कन्या : ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
  • तूळ : रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
  • वृश्चिक : तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
  • धनु : ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
  • मकर : भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
  • कुंभ : गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
  • मीन : दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


राशी नुसार स्वभाव

आपण नेहमी विचार करतो की आपला स्वभाव, व्यवहार आणि वागणूक इत्यादि कोण निश्चित करते. काही लोकांचा स्वभाव शांत असतो, काही अतिशय चतुर असतात, काहींना एकटेपणा आवडतो तर काही राजाप्रमाणे जगणे पसंद करतात. व्यक्तीचा हा स्वभाव त्याच्या लग्न रास वर अवलंबून असतो. 


प्रत्येक व्यक्तीच्या जन्म कुंडलीत 12 भाव अर्थात घरे असतात. या मध्ये लग्न, सुख, स्त्री आणि व्यापार हे चार प्रमुख आहेत. कुंडली मधील प्रथम भाव हे लग्न असते, जे व्यक्तीची वागणूक अन् व्यवहार नियंत्रित करते. आता आपण जाणुया की तुमची लग्न राशी तुमच्या बद्दल काय म्हणते. म्हणजेच लग्न राशीवरून तुमचा स्वभाव कसा आहे.


मेष लग्न : मेष राशीचे व्यक्ती परिश्रम घेणारे असतात. परंतु धैर्याचा कमतरतेमुळे हे लोक लवकर परिणाम न दिसल्याने कोणतेही कार्य मध्येच अर्धवट सोडून देतात.


वृष लग्न : वृष राशीचे सूचक बैल असते. या राशीचे लोक कठीण कार्यही अतिशय सहजतेने पूर्ण करतात. या लोकांची उंची थोडी कमी असते परंतु स्वभाव अत्यंत आकर्षक असतो. 


मिथुन लग्न : मिथुन राशीचे चिन्ह स्त्री पुरुष आहे. मिथुन राशीचे लोक बहुमुखी प्रतिभावान असतात. कोणावरही विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवण्यात त्यांचा कल असतो.


कर्क लग्न : कर्क राशीचे चिन्ह खेकडा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा गुंतागुंतीचा असतो. हे लोक आपले काम कोणत्याही पद्धतीने काढून नेताता. सतत करू करणे हा त्यांचा स्वभाव असतो.


सिंह लग्न : सिंह राशीचे राशी चिन्ह सिंह आहे. ज्याप्रमाणे सिंह जंगलाचा राजा असतो त्याच पद्धतीने सिंह लग्न असणारे लोक राजाप्रमाने जीवन जगतात. यांचा स्वभाव नरम आणि निडर असतो. व वेळप्रसंगी हे लोकांना मदतही करतात. 


कन्या लग्न: कन्या राशीचे चिन्ह स्त्री आहे. या लोकांचा शांत स्वभाव हा मुख्य गुण असतो. या राशीचे लोक सरळ भोळे आणि जमिनीशी जुळलेले असतात. यांची काम करण्याची गती हळुवार असते परंतु आपल्या कामाच्या प्रति ते अतिशय संवेदनशील असतात. 


तूळ लग्न : तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. या तूळ लग्न असणाऱ्या लोकांचा स्वभाव गंभीर असतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची तयारी असते. सर्वांसोबत सारखा व्यवहार आणि व्यवस्थित जीवन हेच त्यांचे प्रमुख गुण आहेत. 


वृश्चिक लग्न : कोणासमोरही आपल्या मनातील गोष्टी न सांगणे व स्वतः साठी अनुकल असलेल्या संधीच्या शोधात असणे ह्या लोकांचे मुख्य स्वभाव आहे. यांच्या स्वभावात थोडा कडूपणा असतो. स्वभावात उग्रता असल्याने त्यांची नेतृत्व शक्तीही चांगली असते. 


धनु लग्न : धनु लग्न असणारे व्यक्ती आपल्या कार्याला एक ध्येय म्हणून ठेवतात. यांना आपला वेळ वाया घालवणे अजिबात आवडत नाही. हे लोक अतिशय श्रेष्ठ आणि ज्ञानी असतात. परंतु आपल्या गुणांमुळे यांचा अहंकार ही बऱ्याचदा वाढून जातो.


मकर लग्न : मकर राशीचे चिन्ह मगर आहे. मकर लग्न असणारे लोक खूप मेहनती असतात. त्यांचा स्वभाव कठोर असतो. कोणाकडे लक्ष देण्याआधी हे स्वतःचे हित पाहतात. जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता लढण्याची हिम्मत यांच्यात असते. 


कुंभ लग्न : स्वच्छ मन आणि नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करणारे कुंभ लग्न असणारे जातक साधी प्रवृत्तीचे असतात. यांचे मन अतिशय स्वच्छ असते आणि कोणाचीही निंदा, चुगली न करणे यांच्या स्वभावातच असते. सदैव समाज आणि सर्वांना हितकारी ठरतील अशी कामे हे लोक करतात.


मीन लग्न : मीन राशीचे चिन्ह दोन माश्यांची जोडी आहे. या लोकांचा स्वभावही माश्या प्रमाणेच असतो. हे लोक सदैव स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक गुणांनी भरलेले मीन राशीचे जातक गुरु समान असतात. बोलण्यात गोडी आणि स्वभावात गंभीरता असल्याने प्रत्येक जण यांची गोष्ट लक्ष देऊन ऐकतात.


तर मित्रहो, या लेखात आपण बारा राशी नावे, नावावरून रास व तुमची रास काय आहे हे कसे माहीत करावे या विषयी ची माहिती प्राप्त केली आशा करतो आपणास ही माहिती फारच उपयोगी ठरली असेल. या माहितीला इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा लाभ मिळेल. धन्यवाद...


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

19 टिप्पण्या

  1. आपली राशी सिंह आणि लग्न राशी धनू आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. जन्म तारीख 25-12-2004
    जन्म वेळ पहाटे 4:00

    उत्तर द्याहटवा
  3. माझे ज्ञानेश्वर आहे तर रास कोणती

    उत्तर द्याहटवा
  4. माझे नाव सिध्देश्वर आहे तर रास कोणती

    उत्तर द्याहटवा
  5. माझी रास कन्या आहे मला रास नाव पाहिजे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कन्या राशीवाल्याचे पहीले अक्षर पी नावाने सुरू होत असल्याने नाव प्रियांका असेल

      हटवा
थोडे नवीन जरा जुने