राजमाता जिजाऊ जिजामाता मराठी निबंध | Jijabai/Jijamata essay in marathi

जिजामाता निबंध - rajmata jijau nibandh in marathi : वीरांची भूमी असलेल्या आपल्या देशात अनेक वीर घडले. ज्याप्रमाणे पुरुषांनी आपल्या सहासाने पराक्रम घडवले त्याच पद्धतीने देशातील अनेक स्त्रियांनी देखील मोठ्या धैर्याने पराक्रमी साहस दाखवले आहे. 

आपल्या देशातील वीरांगनां मध्ये शिवरायांच्या आई जिजामातांचा देखील समावेश केला जातो. जिजामाता यांनी शिवरायांवर जे संस्कार केले त्याचेच फलस्वरूप शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. 

आजच्या या लेखात आपण Jijamata essay in marathi अर्थात राजमाता जिजाऊ निबंध किंवा जिजामाता मराठी निबंध पाहणार आहोत. तर चला सुरू करूया..


Jijamata essay in marathi

जिजामाता मराठी निबंध - Jijamata essay in marathi

(300 शब्द)

राजमाता जिजाऊ यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले असे होते. जिजाबाई यांना आपण जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मांसाहेब इत्यादि नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. सिंधखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील आणि म्हाळसाबाई या त्यांच्या आई होत्या. 

1605 साली जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्य होती. ज्यात सहा मुली व दोन मुले होती. त्यांनी थोरल्या मुलाचे नाव संभाजी असे ठेवले. तो शहाजी राजांजवळ वाढला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजाबाईंना दूसरा मुलगा झाला, या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. ज्यांना आज आपण छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतो. 

शिवाजी राजांच्या संगोपणाची संपूर्ण जवाबदारी जिजाबाइंवर होती. शिवाजी महाराज 14 वर्षाचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याच्या जहागीरीची जवाबदारी सोपवली. अर्थातच शिवाजी महाराज लहान असल्याने या जहागिरीची जवाबदारी जिजमातांवर आली. जिजबाईंनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि युद्धाच्या गोष्टी सांगणे सुरू केले. जिजामातांनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवराय घडले व त्यांनी आपल्या हातून स्वराज्य घडवले. शिवरायांच्या मनात कर्तुत्वाची जाणीव निर्माण करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीति शिकवली. शेजारी बसवून राजकारणाचे अनेक घडे देखील दिले. 

समान न्याय देण्याची वृत्ती, धाडस, चिकाटी, स्वराज्य प्राप्त करण्याची जिद्द आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांनी शिवरायांना दिले. शिवराय मोठ्या मोहिमेवर असतांना जिजाबाई राज्यकारभार चालवत असत. सिंहासनावर बसून स्वतः तंटे सोडवत असत आणि अन्याय करणाऱ्याला दंड देत असत,  शहाजीराजे बंगळूर ला वास्तव्यास असतांना शहाजीराजांच्या आई व वडिलांची जवाबदारी देखील जिजामातांवर येऊन पडली. ही जवाबदारी देखील त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडली. 

राजाच्या सर्व स्वऱ्यांच्या व लढायांचा तपशील जिजामाता ठेवत असत. शिवाजीराजे आगऱ्यात कैद असतांना राज्याची संपूर्ण जवाबदारी उतारवयातही जिजामातेवर येऊन पडली, ही जवाबदारी देखील त्यांनी पार पाडली.  शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून 17 जून 1674 साली त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी त्यांचे निधन झाले, 

स्वराज्याचे स्वप्न प्रत्येकक्षात साकारन्यासाठी जिजाबाई या छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम आशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होत्या. आशा या मातेस शतशः नमन.

***

जिजामाता संपूर्ण मराठी माहिती << वाचा येथे


वीरमाता जिजाऊ निबंध मराठी विडियो


जिजामाता निबंध : तर मित्रहो हा होता राजमाता जिजाऊ मराठी निबंध (Jijamata essay in marathi). राजमाता जिजाऊ निबंध आपणास उपयोगी ठरला असेल अशी आशा आहे. हा मराठी निबंध आपणास कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने