स्वामी विवेकानंद जयंती स्पीच। स्वामी विवेकानंद भाषण मराठी। Swami Vivekananda Jayanti Speech bhashan in marathi.
swami vivekananda Yuva Din bhashan Marathi : स्वामी विवेकानंद एक महान संत, विचारवंत आणि आध्यात्मिक गुरु आहेत. विवेकानंदांनी ध्यान व योग च्या माध्यमाने भारतीय संस्कृति चे पुनरुत्थान केले. त्यांनी जगभरात भारतीय संस्कृतिचा प्रसार केला. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी स्वामी विवेकानंद जयंती चे स्वामी विवेकानंद भाषण मराठी घेऊन आलेलो आहोत.
12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंदांचा वाढदिवस हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या शुभप्रसंगी शाळा कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांवर मराठी भाषण देण्यास सांगितले जाते. येथे आम्ही आपल्यासाठी swami vivekananda speech in marathi दिलेले आहे ज्याचा उपयोग आपण करू शकतात.
स्वामी विवेकानंद जयंती भाषण मराठी - Swami Vivekananda Jayanti Speech in Marathi
आज प्रत्येक भारतीय स्वामी विवेकानंदांना त्यांचे व्यक्तिमत्व व महान अध्यात्मिक विचारांमुळे ओळखतो. स्वामी विवेकानंद यांनी विश्वभरात सनातन धर्म आणि भारतीय संस्कृति चा प्रचार प्रसारा करून जगाला भारतीयांची ओळख करून दिली. त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना सुद्धा केली. आज मी तुम्हाला महान व्यक्तिमत्व असलेल्या स्वामी विवेकानंदाबद्दल दोन शब्द सांगणार आहे.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 ला कोलकत्यात झाला. तो दिवस मकरसंक्रांतीचा होता. त्यांचे जन्म नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त हे कोलकत्यातील प्रसिद्ध व नामांकित वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही बुद्धी मती आणि सात्विक स्त्री होती. नरेंद्राची आई, कथा खूप छान सांगत असे. रामायण महाभारत या महाकाव्यातील कथा आणि पुराणातील कथा नरेंद्रना आईकडूनच समजल्या.
नरेंद्रानी आईच्या इतर गुणासोबत तिच्या उत्तम स्मरणशक्तीच्या वारसाही घेतला होता. नरेंद्र लहानपणापासून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. ते सुंदर गात असत, विविध खेळांमध्ये ते प्रवीण होते, शीघ्र विनोदबुद्धी त्यांच्याजवळ होती, त्यांचे ज्ञान चौफेर होते. त्यांच्यात नेतृत्वाचे गुण नैसर्गिकपणे वसत होते आणि विविध विषयात त्यांचे नैपुण्य असल्याने लोकांना ते फार भावत असत.
मेट्रोपोलिटिअन इन्स्टिट्यूटमधून त्यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि जनरल असेंबली इन्स्टिट्यूशन मधून एफ ए आणि बीए च्या परीक्षा पास केल्या. अभ्यासात तत्वज्ञान या विषयाला त्यांचे प्रथम प्राधान्य होते.
तत्वज्ञानाचे विद्यार्थी असल्याकारणाने त्यांच्या मनात ईश्वर विषयक प्रश्न सतत उठत असत. देव आहे का? देव असेल तर मग कसा असेल? माणसाचे आणि ईश्वराचे परस्पर संबंध कशा प्रकारचे असतील? ज्या सृष्टीत इतका विरोधाभास जाणवत असतो की खरोखर ईश्वराने निर्माण केली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न नरेंद्र यांच्या मनात येऊ लागले. एकदा त्यांच्या एका नातेवाईकांनी नरेंद्र यांना सुचवले की त्यांनी दक्षिणेश्वराला असणाऱ्या श्रीराम कृष्णाची भेट घ्यावी तेथेच त्यांच्या धर्मविषयक सर्व शंकांचे निरसन होईल. यानंतर एक दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वराला गेले आणि त्यांनी 'आपण ईश्वर बघितला आहे का?' असा सरळ प्रश्न श्रीरामकृष्णांना विचारला. त्यावर श्रीराम कृष्ण म्हणाले की त्यांनी ईश्वराला बघितले आहे आणि नरेंद्राची इच्छा असेल तर त्यालाही ते ईश्वरदर्शन घडवू शकतात.
श्रीरामकृष्णांची सरलता आणि ईश्वरी अनुराग बघून नरेंद्र प्रभावित झाले. आतापर्यंत त्यांनी जितकी माणसे पाहिली होती त्यात श्रीरामकृष्ण हे एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांनी स्वतःला जिंकले होते. नरेंद्रणी यथावकाश भगवान श्रीरामकृष्ण यांचा गुरु या नात्याने स्वीकार केला.
1886 साली श्रीरामकृष्णना घशाचा कर्करोग झाला आणि यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. यानंतर नरेंद्र संन्यास धारण करून भ्रमंतीसाठी यात्रा करू लागले. नरेंद्रनाथांनी संन्यास ग्रहण करून स्वामी विवेकानंद हे नाव धारण केले.
स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण भारत देशात भ्रमण केले. त्यांनी खेड्यापाड्यातील अडाणी लोक बघितले, त्यांच्या अंधश्रद्धा पाहिल्या, ते लोक अर्धपोटी असत व जातिभेदाच्या जुलमाचे बळी होते. त्यांची ही अवस्था पाहून स्वामीजींना धक्का बसला. समाजाला हलवून जागे करणे किती आवश्यक आहे ही गोष्ट स्वामीजीच्या मनावर ठसून गेली. त्यांनी समाज शिक्षणाची गरज जाणली. म्हैसूरच्या राजाने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत केले. शेतकऱ्यांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावे व जास्तीत जास्त लोक शिक्षित व्हावे अशी स्वामीजींची इच्छा होती.
बुद्धीची वर्गातील अनेक लोक स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊ लागले. मद्रासच्या काही तरुणांनी स्वामीजींच्या आदर्शासाठी आपले जीवन अर्पण केले आणि स्वामीजींच्या यशात या तरुणांचा सहभाग फार मोठा होता. त्या काळात भारतीय पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करुन त्याला महत्त्व देऊ लागले. सुशिक्षित भारतीय तरुण पाश्चिमात्त्य पेहराव घालून मिरवत असत, इंग्रजांनी प्रमाणे शिष्टाचार पाडीत असत आणि पाश्चिमात्य असल्याप्रमाणे वागत असत. या गोष्टीचे स्वामीजींना फार दुःख झाले नंतरच्या काळात आपल्या देशाला संबोधून स्वामीजी म्हणाले होते.
भारतीयांनी पश्चिमात्य कडून विज्ञान व तंत्रज्ञान शिकावे, त्यांचे संघटन शिकावे आणि व्यावहारिक दृष्टी पण घ्यावी पण हे सर्व करताना आपली उच्च मूल्य आणि अध्यात्मिक आदर्शांचा विसर पडू देऊ नका.
मद्रास मध्ये असताना अमेरिकेत होत असलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामीजींनी जावे, व तेथे हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करावे अशी विनंती मद्रासमधील तरुणांनी केली. या कार्यासाठी तरुणांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. स्वामीजींनी प्रथम अमेरिकेतील शिकागो आणि नंतर इंग्लंडच्या जनतेवर प्रचंड प्रभाव निर्माण केला.
'भारताच्या प्राचीन नीतिमूल्यांचा उद्गाता' म्हणून वृत्तपत्रानी त्यांना उच्च मानवंदना दिली. एका रात्रीतच ते भारताचे राष्ट्रीय नेता म्हणून प्रसिद्ध झाले. यानंतर हळूहळू भारतीय सुशिक्षितांचे आपल्या भारताबाबत आणि आपल्या संस्कृतीबद्दल मत परिवर्तन होण्यास सुरुवात झाली. आपण भारतीय लोक धर्म क्षेत्रात, तत्त्वज्ञानात,कलेत आणि साहित्यात मागासलेले तर नव्हतेच उलट विदेशी लोकांपेक्षा जास्त प्रगत आहोत असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण झाला. भारतीय अस्मितेच्या जागृतीचा तो एक क्षण होता.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून त्यानंतर अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी स्वामी विवेकानंदन पासून स्फूर्ती प्राप्त केली. दीनदुबळ्या गरीब समाजाची भारताने केलेली उपेक्षा हे भारतीयांचे राष्ट्रीय पाप आहे असे स्वामीजी म्हणत असत. महिला वर्गाची उपेक्षा आणि अवहेलना हे दुसरे राष्ट्रीय पाप आहे. जातिव्यवस्थेला आज प्राप्त झालेले रूप हे सुद्धा पापच होय.
स्वामीजींना समाजवादाचे भारतातील आगमन जाणवले होते. त्यांनी जगातील इतर देशांप्रमाणे त्याचे स्वागतही केले. स्वामीजींनी ब्राह्मणांना सांगितले की भारतीय संस्कृतीच्या आणखी पतन होऊ नये म्हणून देश अध्यात्मिक विचारांनी भारला जाणे आवश्यक आहे. भारतात नवीन सामाजिक रचना आणि नूतन सभ्यता निर्माण होईल ही स्वामीजींना अशा होती.
स्वामीजींनी त्यांच्या जीवनाचे अखेरचे दिवस बेलूर मठात घालवले. महासमाधी पूर्वी तीन दिवस ते प्रेमानंदांबरोबर फिरत होते. एका जागे कडे बोट दाखवून स्वामीजी त्यांना म्हणाले, "माझ्या देहत्यागानंतर माझ्यावर येथे संस्कार करा." त्याच जागेवर आज विवेकानंदांचे मंदिर उभे आहे.
4 जुलै 1902 अखेरचा दिवस उजाडला. ते सकाळीच मंदिरात गेले. मंदिराच्या सर्व खिडक्या व दारे लावून घेतली. सुमारे तीन तास त्यांनी आत मध्ये ध्यान केले. त्यानंतर त्यांनी जगन मातेचे एक भजन गायले. खाली येऊन थोडावेळ फेऱ्या मारल्या. दिवसभर आपले रोजचे कार्य केले यानंतर त्यांनी साधूंशी काही वेळ चर्चा केली. संध्याकाळी ते बिछान्यावर जाऊन पडले. शिष्याने थोडा वेळ वारा घातला आणि मग तो त्यांचे पाय चेपू लागला.
स्वामीजी झोपले आहेत असे त्याला वाटले. एकदा त्यांचा हात किंचित हलला. दोनदा त्यांनी दीर्घ श्वास घेतला. शिष्याला काहीतरी चमत्कारिक वाटू लागले. त्याने धावत जाऊन एका साधूला बोलावले. साधू येऊन पाहू लागला त्याला स्वामीजींची नाडी लागेना. श्वासही थांबल्याचे जाणवले. स्वामीजींची महासमाधी झाली घड्याळात नऊ वाजून काहीतरी मिनिटे झालेली होती. swami
***
स्वामी विवेकानंद भाषण मराठी विडियो
वाचा> स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन चरित्र
तर मित्रांनो आपणास स्वामी विवेकानंद भाषण मराठी (speech on swami vivekananda in marathi) कसे वाटले, आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद..
उत्कृष्ट प्रयत्न
उत्तर द्याहटवा