गंगुबाई काठियावाड़ी यांची खरी गोष्ट मराठी | Gangubai Kathiawadi real story in marathi

गंगुबाई काठियावाड़ी कोण होती? गंगुबाई काठियावाड़ी खरी गोष्ट काय आहे (Gangubai Kathiawadi real story in marathi) गंगुबाई ची मराठी माहिती या विषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात.. 

अलीकडच्या काळात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजायला लागले आहेत. चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांचा आपोआप प्रतिसाद मिळतो. पण जाहिरात बाजीवर अमाप खर्च करूनही अनेकदा चित्रपटांना प्रतिसाद मिळेल याची हमी नसते. त्याऐवजी कशावरून तरी वाद निर्माण करून, चित्रपटाची मोफत प्रसिद्धी करण्याचा ट्रेण्डही आता जुना झाला आहे. यापूर्वी ही ऐतिहासिक चित्रपटांवरून वाद झाले होते आणि आता त्यात गंगुबाई काठियावाडी ची भर पडली आहे. 


संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रसिद्ध पूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 



गंगुबाई काठियावाड़ी खरी गोष्ट

गंगुबाई काठीयावाडी यांना मुंबईच्या इतिहासात काहीएक स्थान आहे. त्यांचे वास्तव्य मुंबईतील कामाठीपुऱ्यात होते. दक्षिण मुंबईतली छोट्या घराच्या दाटीवाटीने बनवलेल्या चाळींचे काही भाग, त्यातील कामाठीपुरा बदनाम बस्ती अशी ओळख असलेला, दलालांनी भुलवून देहविक्री साठी येथे आणून टाकलेल्या मुली, त्यांचे शोषण या जगाचे वास्तव. देहविक्रीसाठी बाजारात उभ्या केल्या गेलेला या स्त्रियांसाठी गंगुबाईने मोठे सामाजिक कार्य उभे केले. त्यांनी देह विक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला. कामाठीपुर्यातील 12 गल्लीतील रेशम वाली चाळीत त्यांचा दरबार भरायचा. त्यांच्यावरच्या चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता उच्च न्यायालयात गेला असला तरी गंगुबाई बद्दल एक सुरस कथा आहे.


कामाठीपुरा येथील मुलींना काही अडचण आली की गंगुबाई पोलिस ठाण्यात जाऊन त्यांना सोडवत असे. सांगितले जाते की गंगु हीरोइन बनण्यासाठी मुंबईत आली होती. परंतु येथील दलदलीत ती अडकली आणि तिच्या जगण्याला नवीन, वेगळेच वळण लागले. नववी पर्यंत शिकलेल्या गंगूला वाटले, माझे आयुष्य खराब झाले आहे, पण आता मी सर्वांसाठी जगेल!


याच भावनेतून तिने अनाथांसाठी काम सुरू केले. वेश्या व्यवसायातील काही मुलींची लग्ने लावून दिली. रेड लाईट एरियातील सर्व मुलींची ती आई बनली. करीम लालाच्या टोळीतील लोक कामाठीपुरातील मुलींची छेड काढत असल्याची तक्रार घेऊन ती करीम लाला ला भेटली होती. लाला ने गंगुबाई ना आपली बहीण मानले. 


त्यावेळेस कामाठीपुरा मधील वेश्याव्यवसाय हटवण्यासाठी आंदोलने देखील झाली होती. सर्व मुली गंगुबाईकडे आल्या. त्या वेळेस सांगू बाई यांनी आझाद मैदानावर भाषण केले. परिसरातील मुलींसाठी लाल दिवा उभा राहिला. गंगुबाई अनेक मुलींसोबत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेल्या. असे सांगतात की पंडितजी त्यांना म्हणाले, लग्न करा आणि या जगातून दूर जाऊन सुखी राहा. त्यावर तात्काळ गंगुबाई म्हणाल्या, आपण मला पत्करता का? मी लग्नाला तयार आहे! हे ऐकून नेहरू स्तब्ध झाले आणि त्यांनी गंगुबाईच्या विधानाशी असहमती दर्शवली. तेव्हा गंगुबाई म्हणाल्या, पंडित जी तुम्ही रागावू नका मला फक्त माझा मुद्दा सिद्ध करायचा होता. उपदेश करणे सोपे आहे, परंतु स्वीकारणं कठीण आहे. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगुबाई ना वचन दिले, की ते त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देतील. खुद्द पंतप्रधानांनी मध्यस्थी केल्यावर कामाठीपुरा येथील वस्ती वाचली. 


असे सांगितले जाते की आगामी चित्रपटात गंगुबाईची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने रंगवल्या चा त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोप आहे. बबीता गंगुबाई यांची कथित मुलगी सांगितली जाते. बबीता म्हणते, माझी आई समाजसेवक होती संपूर्ण आयुष्यभर तिने कामाठीपुरा येथे लोकांसाठी काम केले. या चित्रपटाचे काम सुरू झाल्यापासून कुटुंब अडचणीत आले आहे! गंगुबाईची दत्तक नाथ भारती सांगते, चित्रपटाची चर्चा सुरू होताच या आम्हाला सतत घर बदलावे लागत आहे. आम्ही समारंभांना जाऊ शकत नाही. हा कुठला न्याय?


गंगुबाईची दुसरी दत्तक मुलगी सुशीला शिवराम रेड्डी, मुलगा बाबुरावजी शहा त्यांच्या मते, "निर्मात्यांनी चित्रपट बनवण्या आधी गंगुबाई च्या घरच्यांची संमती घेतलेली नाही. आमच्या आईने 1949 मध्ये चार मुले दत्तक घेतली होती. लोक आता त्यांना वैश्याची मुले म्हणू लागले आहेत. 


चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 25 फेब्रुवारी आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट हिने गंगुबाईची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये आलिया आझाद मैदानावर उभे राहून भाषण देताना दिसते. एक मात्र खरे आहे, की गंगुबाई मोठ्याची जिद्दीची बाई होती तिचे जगणे आणि तिचा काळ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

लेखन : राही भिडे (मुक्त पत्रकार)


या लेखाद्वारे आपण गंगुबाई काठियावाड़ी खरी गोष्ट (Gangubai Kathiawadi real story in marathi) पहिली. आशा आहे ही माहिती आपल्या ज्ञानात वृद्धी करण्यासाठी उपयोगी ठरली असेल. या माहितीला आपले मित्र परिवारासोबत खाली देण्यात आलेल्या शेअर बटन द्वारे नक्की शेअर करा

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने