रशिया युक्रेन वादाचे कारण व माहिती | Russia Ukraine war reason in Marathi

Russia Ukraine war reason in Marathi व रशिया युक्रेन वादाचे कारण

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया व यूक्रेन युद्धाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या शहरांवर अचानक हल्ले सुरू केले. ज्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संपत्तीचे नुकसान व जीवित हानी होत आहे.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी रशिया युक्रेन वादाचे कारण व रशिया युक्रेन चा वाद काय आहे या विषयीची माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्या ज्ञानात वृद्धी करेल आणि रशिया युक्रेन युद्धाचे कारण समजून घेण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त करतो.


रशिया युक्रेन वाद काय आहे

रशिया युक्रेन यांचा पहिला वाद - russia ukraine war reason in marathi 

युक्रेन देशाच्या सीमेचा पश्चिमेकडील भाग हा युरोपशी तर पूर्वेकडील भाग रशियाशी जुळलेला आहे. 1991 पर्यंत युक्रेन हे देखील सोवियत संघाचा भाग होते. म्हणजेच युक्रेन देखील रशियाचाच एक भाग होता. 

रुस आणि युक्रेनमधील तणाव नोव्हेंबर 2013 पासून सुरु झाला. त्यावेळी युक्रेन चे तत्कालीन राष्ट्रपती विक्टर यानुकोविच यांचा कीव शहरात विरोध सुरू झाला. या विरोधामुळे त्यांना सत्तेमधून बेदखल व्हावे लागले. व त्यांनी देश सोडून देखील पडावे लागले. याचा फायदा घेत रशियाने युक्रेन मधील क्रिमिया या प्रांताला जबरदस्ती आपल्या ताब्यात घेतले. युक्रेन कमजोर स्थितीत होते त्याच्याजवळ कोणतेही शासन नव्हते. यानंतर अलगाववादी संघटनांनी युक्रेनच्या डोनबास क्षेत्रावर देखील अधिकार प्राप्त केला. यादरम्यान युक्रेनच्या सैनिक आणि रूस समर्थित अलगाववादी संघटनांमध्ये झालेल्या युद्धात 14 हजार पेक्षा अधिक लोक मारले गेले. परंतु हे सर्व असतांनाही रूस ने या मुद्यांपासून अलिप्तता दर्शवली. 


रशिया युक्रेन वाद काय आहे व रशिया युक्रेन युद्धाचे तत्कालीन कारण

युक्रेन रशिया पासून वेगळा झालेला स्वतंत्र देश आहे. परंतु युक्रेन जवळ रशिया च्या मानाने सैन्य क्षमता फार कमी आहे. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या रशिया सोबतच च्या युद्धात टिकून राहण्यासाठी युक्रेन कडे इतर युरोपीय देशांचे समर्थन असणे आवश्यक आहे. यासाठी 2019 मध्ये पदभार ग्रहण करणारे युक्रेन चे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेस्की यांनी, युक्रेन 2024 मध्ये युरोपीय संघ (नाटो) ची सदस्यता घेणार आहे अशी घोषणा केली. 

आज अमेरिका आणि इंग्लंड सह जगभरातील 30 देश नाटो चे सदस्य आहेत. जर नाटो चे सदस्य असणाऱ्या एखाद्या देशावर दुसर्‍या एखाद्या देशाने आक्रमण केले तर नाटो मधील सर्व देश एकजूट होऊन त्या देशाविरुद्ध लढतात आणि सदस्य देशाचे रक्षण करतात. याच भावनेतून युक्रेन ने रशिया विरुद्धचे सैन्यबळ मिळवण्यासाठी नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्याची इच्छा दर्शवली. 

परंतु रशिया चे मानाने आहे की युक्रेन ने नाटो चे सदस्यत्व घ्यायला नको. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांची ही मागणी घेऊन युक्रेन आणि पश्चिमी देशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि शेवटी कोणत्याही पश्‍चिमी देशाची पर्वा न करता रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. आणि हेच कारण आहे की रशिया ने युक्रेन च्या अनेक शहरांवर मोठे सैन्य हमले करून खूप सारी संपत्ती नष्ट केली आहे. यासोबतच अनेक नागरिक व सैनिकांची या हल्ल्यात मृत्यू झाली आहे. 

रशिया द्वारे होत असलेल्या युक्रेन वरील या युद्धामध्ये अजून तरी एकही पश्चिमी देश रशिया विरोधात उभा राहिलेला नाही. युक्रेन चे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेस्की यांना अनेकदा आपल्या भाषणातून पश्चिमी देशांना रशिया विरोधात युक्रेनची सहायता करण्यासाठी मदत म्हणून मागणी केली आहे. परंतु इतर देशांनी रशियावर आर्थिक प्रतिबंध लावण्याशिवाय इतर कोणतेही महत्त्वपूर्ण पाऊल उचलले नाही आहे.


निष्कर्ष

युद्धाने कोणत्याही देशाचे भले होत नाही. युद्ध संपल्यावर जेवढे नुकसान युद्धात पराजित झालेल्या देशाला होते तेवढे किंवा त्यापेक्षा थोड्या फार कमी प्रमाणात नुकसान हे युद्ध जिंकणार्या देशाला देखील भोगावे लागते. दोन देशांमधील वादाचे परिणाम त्या देशांमधील सामान्य जनतेला भोगावे लागतात. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणत जीवित व मालमत्तेची हानी होत असते. म्हणून जगात युद्धाचा नव्हे तर शांततेचे विचार पसरवण्याचे कार्य करायला.


रशिया युक्रेन वाद काय आहे व रशिया युक्रेन वादाचे कारण या लेखाद्वारे आपणास रशिया आणि युक्रेन मध्ये होत असलेलें युद्धाचे कारण (Russia Ukraine war reason in Marathi) समजून घेण्यास मदत मिळाली असेल. ही माहिती आपणास कशी वाटली आणि युद्धा विषयी चे आपले मत काय आहे या बद्दल आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने