म्युचल फंड मराठी माहिती | Mutual Fund Information In Marathi
आजकाल टीव्ही ads तसेच अनेक लोकांच्या तोंडून तुम्ही Mutual Funds बद्दल ऐकलेच असेल आणि तुमच्या मनात पण हा प्रश्न आला असेलच की म्युचल फंड काय आहे? म्युचल फंड कसे काम करते? म्हणून आजच्या या पोस्टच्या माध्यमाने मी तुमच्या मनात असलेल्या सर्व शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. आज आपण जाणणार आहोत की म्युचल फंड म्हणजे काय आहे (what is mutual funds in marathi) आणि म्यूचुअल फंड मराठी माहिती (mutual fund marathi information).
म्युचल फंड आणि शेअर मार्केट मधील फरक
बऱ्याच लोकांना म्युचल फंड आणि स्टॉक मार्केट (Share Market) सारखे वाटतात. पण याच्यात फरक आहे शेअर मार्केट मध्ये रिस्क जास्त आणि नफा पण जास्त असतो पण जर तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक कराल तर यात तुमचे पैसे गमावण्याची रिस्क कमी असते आणि नफा पण शेअर बाजाराच्या तुलनेत कमी असतो. शेअर बाजार मधील पैसा हा एकाच कंपनीमध्ये गुंतवला जातो तर म्युचल फंड मध्ये फंड मॅनेजर हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे लावतो.
शेअर बाजार बद्दल माहिती तुम्ही पुढील लिंक वर वाचू शकता>> Share market information in Marathi
म्युचल फंड काय आहे? | Mutual Fund Information In Marathi
सोप्या शब्दात सांगायचे झाले तर Mutual Fund हा खूप साऱ्या लोकांच्या पैश्यापासून बनलेला फंड असतो. म्युचल फंड मध्ये लावलेला पैसा त्या कंपनी द्वारे वेगवेगळ्या जागी गुंतवला (invest) जातो आणि प्रयत्न केला जातो की गुंतवणूकदाराला अधिकाधिक फायदा मिळून द्यावा.
कोणत्याही म्युचल फंड ला सांभाळण्याचे काम व्यावसायिक निधी व्यवस्थापक (professional fund manager) करतात. Professional fund manager चे काम त्या विशिष्ठ फंड ची देखरेख करून फंड च्या पैश्याला योग्य ठिकाणी invest करणे असते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर याचे काम लोकांच्या पैशाला गुंतवून जास्तीत जास्त नफा मिळवणे असते. म्युचल फंड चा पैसा हा फक्त कोणत्याही एकाच ठिकाणी न गुंतवता वेग वेगळ्या कंपन्या मध्ये गुंतवला जाता. ज्यामुळे पैसा गमावण्याची शक्यता कमीच असते. कारण जर कोणत्याही एका कंपनी ला नुकसान झाले तरीही बाकीच्या कंपन्या त्या काळात विकास करीत राहतात व त्यामुळे जास्तीचे नुकसान होण्याचा धोका टळतो.
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ? How to invest mutual fund in marathi
आजच्या इंटरनेट युगात घरबसल्या म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. अनेक अँड्रॉइड अँप तसेच वेबसाइट्स च्या माध्यमाने आपण म्युचल फंड मध्ये आपले पैसे गुंतवू शकतात. काही प्रसिद्ध म्युचल फंड ऍप पुढील प्रमाणे आहेत. Groww, My cams, InvesTap, Ktrac mobile app, Paytm money, ET Money इत्यादी.
पण मी तुम्हाला म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Groww ॲप वापरण्याची सल्ला देईल. कारण या ॲपमध्ये तुम्हाला कोणतेही अतिरिक्त चार्ज लागत नाहीत. हे अँप त्यांच्या ग्राहकांकडून कमिशन न मिळवता डायरेक्ट म्युचल फंड मधून कमिशन काढते.
पुढील लिंक वरून आपण Groww ॲप डाऊनलोड करू शकतात. अँप download केल्यानंतर त्यात अकाउंट उघडून खूपच सोप्या पद्धतीने म्युचल फंड विकत घेता येतात. Download Here...
म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धती
गुंतवणूकदार हा म्युचल फंड मध्ये दोन पद्धतींद्वारे पैसे गुंतवू शकतो. यात पहिला आहे लंप सम आणि दुसरे आहे SIP अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic investment Plan).
1) लंप सम (Lump Sum)
लंप सम गुंतवणूक प्रकारात गुंतवणूकदारांकडून एकादाच मोठी रकम गुंतवली जाते. व पुन्हा पुन्हा गुंतवणूकदार त्यात पैसे टाकीत नाही.
जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात पैसा पडलेला असेल व तुम्ही त्याला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असतात तर लंप सम म्युचल फंड प्रकारात तुम्ही त्याला गुंतवू शकतात.
2) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)
एस आय पि ला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हटले जाते. या प्रकारात गुंतवणूकदार नियमितपणे ठराविक रक्कम म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो. गुंतवणुकीचा हा कालावधी प्रती आठवडा, प्रतिमहिना किंवा दर चार महिन्यात असू शकतो.
SIP हा प्रकार त्यांच्यासाठी असतो जे लोक नोकरी वैगरे करीत आहेत, व ज्यांचा पगार प्रती माह मिळतो. असे लोक गुंतवणूक म्हणून दर महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे बाजूला ठेवून म्युचल फंड मध्ये गुंतवू शकतात.
म्युचल फंड चे प्रकार (Mutual Funds types in Marathi)
म्युचल फंडला जोखीम, रिटर्न, आकार आणि गुंतवणूक च्या आधारावर अनेक प्रकारात वाटले आहे. आम्ही पुढे काही प्रकार देत आहोत-
1) इक्विटी म्युच्युअल फंड (Equity mutual fund)
इक्वीटी म्युचल फंड स्कीम डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पैसा लावते. यात कमी कालावधीसाठी पैसा लावला तर नुकसान होण्याची शक्यता पण असते. परंतु जर दीर्घकाळासाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करत असाल तर यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळून जातील.
2) फिक्स इन्कम फंड (Fixed income funds)
याप्रकारचे म्युचल फंड गुंतवणूकदाराला निश्चित रिटर्न मिळवून देतात. बँकेच्या FD प्रमाणे येथे मिळणारे व्याज निश्चित असते. याप्रकारच्या म्युचल फंड मध्ये त्या लोकांना गुंतवणूक करायला हवी जे थोडीसुद्धा जोखीम घ्यायला तयार नाहीत.
3) डेब्ट फंड (Debt Fund)
या प्रकारच्या म्युचल फंड मध्ये देखील जोखीम कमी असते. यात गुंतवणूकदार डिबेंचर, सरकारी बॉण्ड आणि अन्य सरकारी तसेच निश्चित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे डेब्ट फंड एक निश्चित उत्पन्न मिळवून देते.
4) हायब्रीड म्युचल फंड (hybrid mutual fund)
हायब्रीड म्युचल फंड एका पेक्षा जास्त मालमत्तेत गुंतवणूक करतात. हायब्रीड म्युचल फंड हे इक्विटी फंड आणि डेब्ट फंड दोघींचे संयोजन असते.
Download Free Mutual fund Marathi Guide PDF
तर मंडळी ही होती Mutual Funds मध्ये गुंतवणूक करण्याबद्दलची माहिती. मला आशा आहे की या लेखाला वाचल्यानंतर तुमच्या Mutual funds basics शंका दूर झाल्या असतील.
या लेखात तुम्हाला Mutual funds marathi mahiti दिली आहे. ज्या मुळे Mutual Funds basic information तुम्हाला मिळाली असेल. जर म्युचल फंड संबंधी तुमच्या अजुनही काही शंका असतील तर खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकतात..
Kiti paise invest karu shakto
उत्तर द्याहटवाRs.500 itkya kamit kami amount pasun tumhi invest karu shakta
हटवाभाऊ मला ब्लाँग लिहायचे आहे कसे लिहु
उत्तर द्याहटवाMala guntvnuk karaychi aahe pan suruvat kutun karu kashi karu kalat nahi
उत्तर द्याहटवाBro mala pan chalu karyache ahe Kasi survat karavi mala sangu shakta ka koni
उत्तर द्याहटवा👍🏻
उत्तर द्याहटवा