गणपतीची आरती सुखकर्ता दुखहर्ता | Sukhkarta Dukhharta Aarti in Marathi

गणपती बाप्पाची मराठी आरती व सुखकर्ता दुखहर्ता गणपतीची आरती | Sukhkarta Dukhharta Aarti Lyrics in Marathi & Ganpati aarti lyrics marathi

भगवान श्री गणेशांना विद्येचे दैवत मानले जाते. भारतासह जगभरात श्री गणेशांची आराधना केली जाते. भगवान गणेश महाराष्ट्रीयन जनतेचे तर आरध्यच आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते. 

ज्यावेळी सर्वकडे गणपती बाप्पा बसलेले असतात तेव्हा सुखकर्ता दुखहर्ता  ही गणपती ची मराठी आरती देखील मोठ्या प्रमाणात सर्च केली जाते. जर आपल्याला गणपती आरती येत नसेल अथवा लक्षात नसेल तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी सुखकर्ता दुखहर्ता ही गणपतीची आरती - sukhkarta dukhharta aarti lyrics in marathi घेऊन आलेलो आहोत. 

 

सुखकर्ता दुखहर्ता आरती - Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti Lyrics in Marathi


सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥


सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव, जय देव

जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती

जय देव, जय देव


रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।

चंदनाची उटी कुंकुम केशरा।

हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥

जय देव, जय देव

दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती, जय देव, जय देव


लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।

सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।

संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥

जय देव, जय देव,

जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती

जय देव, जय देव

गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया

***तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत श्री गणेश यांची सुखकर्ता दुखहर्ता आरती - Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti Lyrics in Marathi शेअर केली. अशा आहे की गणपती ची आराधना करतांना आपणास ही आरती उपयोगी ठरली असेल. भगवान गणेशांची कृपया आपल्यावर कायम असो हीच आमची इच्छा आपणास गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने