पंडित नेहरू यांची माहिती | Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती मराठी भाषेत देणार आहोत. मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान होते. Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi या लेखाद्वारे आम्ही पंडित नेहरू यांचे कार्य व संपूर्ण जीवन चरित्र आपल्यासमोर ठेवत आहोत. तर चला सुरू करूया..




पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती - Pandit Jawaharlal Nehru Information in Marathi

पंडीत जवाहरलाल नेहरू यांना धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्तकाचे शिल्पकार मानले जाते.पंडीत जवाहरलाल नेहरुंना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन 'बालदिन' म्हणुन साजरा केला जातो. यामागील कारण म्हणजे, त्यांचे लहान मुलांवर असलेले प्रेम. लहान मुले देखील त्यांना प्रेमाने चाचा नेहरु म्हणत असत.


पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म व‌ कुटुंब

पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी उत्तरप्रदेश मधील अलाहाबाद मध्ये एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरुपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरु होते. पंडीत जवाहरलाल नेहरुंना आणखी तीन भावंडे होती. त्यात दोन मुली होत्या. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरू व मुलींचे नाव इंदिरा गांधी होते. 


पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण

पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले. पण यापुढील शिक्षण त्यांचे अनेक प्रसिद्ध शाळा आणि विद्यापीठांमध्ये झाले.जवाहरलाल नेहरुंचे वय १५ झाल्यानंतर त्यांना इंग्लंड येथील हॅरो स्कुलमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. हॅरो स्कुलमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन येथील काॅलेज मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते १९१२ मध्ये ते भारतात परतले.


पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा विवाह व पत्नी

पंडीत जवाहरलाल नेहरू परदेशातून शिक्षण घेऊन झाल्यानंतर भारतात १९१२ मध्ये परतले आणि त्याच्या चार वर्षांनंतर त्यांचा विवाह १९१६ मध्ये कमला कौर यांच्या सोबत झाला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरू असे होते. लग्नाच्या एका वर्षानंतर जवाहरलाल नेहरू आणि त्यांची पत्नी कमला कौर यांना १९१७ मध्ये मुलगी झाली त्या मुलीचे नाव इंदिरा गांधी असे ठेवण्यात आले. 


पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा राजकीय प्रवास

पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी 1917 मध्ये होमरुल लीगमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर 1919 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरुंचा महात्मा गांधी यांच्याशी संपर्क झाला. महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यानंतर नेहरूंवर त्यांच्या विचारांचा खुप प्रभाव पडला. नेहरूंना राजकीय क्षेत्रातील ज्ञान हे महात्मा गांधींकडूनच मिळाले. आणि याच काळामध्ये नेहरुंनी पहिल्यांदाच प्रवेश केला होता‌.गांधीजींच्या संविनय कायदेभंगाच्या चळवळीचा ही नेहरुंवर खुप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. 

1920-22 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ आयोजित केली होती त्यात देखील नेहरुंनी सहभाग घेतला होता. त्या वेळी जवाहरलाल नेहरुंना पहिल्यांदाच तुरुंगात जावे लागले होते.

1924 मध्ये ते अलाहाबाद महानगरपालिकेचे अध्यक्ष झाले आणि दोन वर्षे कार्यभार सांभाळला.दोन वर्षांनंतर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा दोन वर्षे अखिल भारतीय काँग्रेस चे सरचीटनीस बनून कार्यभार सांभाळला.

1929 साली लाहोर मध्ये काॅंग्रेसचे अधिवेशन नेहरुंच्या अध्यक्षतेखाली भरले. 1936-37 या कालावधी मध्ये नेहरुंची नियुक्ती काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून झाली. 1947 साली नेहरुंनी  भारताच्या स्वातंत्र्यकाळात सरकारच्या वाटाघटींमध्ये महत्त्वपूर्ण भुमिका बजावली. 


देशाचे पंतप्रधान

1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या सांगण्यावरून नेहरूंना भारताचे पंतप्रधान करण्यात आले. यानंतर देखील नेहरुंची तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली होती.पंतप्रधान होऊन त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे व मजबूत राष्ट्राचा पाया रचण्याचे कार्य केले.1955 साली नेहरुंना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. 


पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू

1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता यामध्ये नेहरुंना दुखापत झाली होती. त्यानंतर 27 मे‌ 1964 रोजी नेहरूंचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाले. मृत्यू नंतर पंडित नेहरूंच्या स्मरणार्थ अनेक रस्ते तयार करण्यात आले, अनेक योजना राबविण्यात आल्या. जवाहरलाल नेहरू टेक्नाॅजिकल युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू स्कूल, जवाहरलाल नेहरू कॅन्सर हाॅस्पिटल हे देखील त्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आले.


शेवट

मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत भारताचे प्रथम पंतप्रधान व नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती - pandit jawaharlal nehru information in marathi शेअर केली आहे. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य, आई वडिलांचे नाव, पत्नीचे नाव, देशाचे पंतप्रधान व मृत्यू या गोष्टी प्रामुख्याने सांगण्यात आलेल्या आहेत.

आम्ही आशा करतो की हा लेख आपणास उपयोगाचा ठरला असेल. ही माहिती इतरांसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद..


इतर लेख

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने