Story in Marathi & Marathi Goshta : छान छान सुंदर आशा चांगल्या गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच वाचायला आवडतात. लहान मुलांना जर आई वडिलांनी लहानपणापासून सुंदर गोष्टी व बोधकथा सांगितल्या तर त्याचा चांगला परिणाम त्यांच्या बालमनावर होतो. व अशी मुले भावी आयुष्यात यशस्वी होतात आणि एक चांगली नागरिक बनतात.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही निवडक मराठी गोष्टी (Story in Marathi) घेऊन आलेलो आहोत. या Marathi Goshta आपण वाचू शकतात व यातून उत्तम बोध देखील घेऊ शकतात. कारण या लेखातील सर्व गोष्टी या Story in Marathi with Moral उपलब्ध आहेत.
मराठी गोष्टी व तात्पर्य - Story in Marathi
मराठी भाषेतील काही सुंदर गोष्टी आपणास पुढे देण्यात येत आहेत. Stories in Marathi चा आपण आनंद घ्यावा अशी इच्छा आहे.
मराठी गोष्ट 1) गर्वाचे घर खाली
एके काळी एका गावात एक मूर्तिकार राहत होता. एक उत्तम मूर्तिकार म्हणून त्याची सर्वत्र किर्ती झाली होती. त्याने घडवलेल्या मूर्ती अगदी सजीवच वाटत. त्यामुळे त्याला देशात आणि परदेशातही चांगली मागणी होती. त्याच्या या अद्भुत कामगिरीबद्दल त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. पण जसजसा त्याला नावलौकिक आणि पैसा मिळत गेला तसतसा त्याचा अहंकार वाढत गेला. तो स्वत:ला सर्वोत्तम शिल्पकार मानू लागला.
एके दिवशी, तो एका ज्योतिष्याकडे भविष्य बघायला गेला. त्या ज्योतिष्याने त्याला सांगितले की तुझ्याकडे फक्त ४० दिवसांचे आयुष्य उरले आहे. ४० व्या दिवशी मध्यरात्री तुझा मृत्युयोग आहे.
ही भविष्यवाणी ऐकून मूर्तिकाराला धक्काच बसला. तो खूप अस्वस्थ झाला. आपला मृत्यू कसा टाळता येईल याचा तो विचार करू लागला. त्याने आपल्या कलेच्या जोरावर यमराजालाही फसवण्याची योजना आखली. त्याने आपल्यासारखेच दिसणारे ६ झोपलेले पुतळे तयार केले. हे पुतळे त्याने इतके हुबेहूब घडवले होते की त्यातून त्याला शोधून काढणं शक्यच नव्हतं.
अखेर मूर्तिकाराच्या मरणाची रात्र येऊन ठेपली. मूर्तिकार त्या पुतळ्यांमध्ये जाऊन डोळे मिटून पडून राहिला.
थोड्या वेळातच यमराज प्रकट झाले. आणि ७ मूर्तिकारांना झोपलेले पाहून गोंधळून गेले. अचानक यमराजाला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, “अरे व्वा मूर्तिकारा! तू तुझ्यासारख्या हुबेहूब ६ मूर्ती बनवून मला फसवण्याचा चांगला प्रयत्न केला. पण तुझ्यासारख्या एवढ्या चांगल्या मूर्तिकाराकडून एक छोटीशी चूक झाली.” यमराजाचं बोलणं ऐकून मूर्तिकार ताडकन उठला आणि म्हणाला, “माझ्याकडून चूक होणे शक्यच नाही.” यमराज म्हणाला, “हीच तुझी चूक. मी चूक झाली असं म्हणताच तुझा अहंकार जागा झाला. तुझ्यातला हा अहंकारच तुझी सर्वात मोठी चूक आहे. जर ती चूक तू केली नसती तर तुला ओळखणं खरच फार अवघड होतं.”
एवढे बोलून यमराजाने त्या घमंडी मूर्तिकाराचे प्राण घेतले आणि यमलोकात निघून गेला.
तात्पर्य : अहंकार हा विनाशाचे कारण आहे. त्यामुळे खूप यशस्वी झाल्यानंतरही गर्व करू नये व अहंकाराला कधीही स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नये.
***
- वाचा> लहान मुलांच्या गोष्टी
Story in Marathi
मराठी गोष्ट 2) बुद्धिमान चित्रकार
खूप वर्षांपूर्वी एका राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याला फक्त एक डोळा आणि एक पाय होता. हा कमकुवतपणा असूनही, तो एक कार्यक्षम, दयाळू आणि बुद्धिमान शासक होता. त्याच्या राजवटीत लोक खूप आनंदी जीवन जगत होते.
एके दिवशी राजा आपल्या महालात चालला होता. अचानक त्याची नजर महालाच्या एका भिंतीवरच्या चित्रांवर पडली. ती चित्रे त्याच्या पूर्वजांची होती. त्या भिंतीवर राजाचे चित्र अजून लावलेले नव्हते. त्याच्या शारीरिक व्यंगामुळे त्याला माहित नव्हते की त्याचे चित्र कसे बनेल? पण त्या दिवशी त्या भिंतीवर आपलेही चित्र असावे असे त्याला वाटले.
दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या राज्यातील उत्तम चित्रकारांना दरबारात बोलावले. दरबारात, त्याने जाहीर केले की त्याला त्याचे सुंदर चित्र राजवाड्यात लावायचे आहे. जो चित्रकार त्याचे सुंदर चित्र काढू शकतो, त्याने पुढे यावे. जसे चित्र बनवले जाईल, तसे त्या चित्रकाराला बक्षीस मिळेल.
दरबारात उपस्थित चित्रकार त्यांच्या कलेत तरबेज होते. पण राजाची घोषणा ऐकून त्यांना वाटले की राजा तर आंधळा आणि लंगडा आहे मग त्याचे सुंदर चित्र कसे काढता येईल? जर चित्र सुंदर दिसत नसेल तर राजा रागावून त्यांना शिक्षा करू शकतो. हा विचार कुणालाही पुढे येण्याची हिंमत देऊ शकला नाही. कुठला ना कुठला बहाणा करून सगळे तिथून निघून गेले. फक्त एक तरुण चित्रकार तिथे उभा होता. राजाने त्याला विचारले, "तू माझे चित्र काढण्यास तयार आहेस का?"
तरुण चित्रकाराने होकार दिला. राजाने त्याला स्वतःचे चित्र काढण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवसापासून चित्रकाराने राजाचे चित्र काढण्यास सुरुवात केली.
काही दिवसांनी चित्र तयार झाले. जेव्हा चित्राच्या अनावरणाचा दिवस आला, तेव्हा दरबाऱ्यांसह ते सर्व चित्रकारही दरबारात उपस्थित होते, ज्यांनी राजाचे चित्र काढण्यास नकार दिला होता. चित्राच्या अनावरणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
जेव्हा चित्राचे अनावरण झाले तेव्हा राजासह सर्वजण थक्क झाले. चित्र खूप सुंदर बनले होते. त्या चित्रात राजा एका घोड्यावर बसला होता. घोड्यावर बसलेला असल्यामुळे राजाचा एकच पाय दिसत होता. घोड्यावर बसून राजा एक डोळा बंद करून धनुष्याने लक्ष्य साधत होता, ज्यामुळे त्याचे आंधळेपणही लपले होते.
हे चित्र पाहून राजाला खूप आनंद झाला. चित्रकाराने आपल्या बुद्धिमत्तेने राजाचे व्यंग लपवून अतिशय सुंदर चित्र काढले होते. राजाने त्याला बक्षीस देऊन आपल्या दरबारातील मुख्य चित्रकार बनवले.
तात्पर्य : जीवनात पुढे जायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. कठीण परिस्थितीतही सकारात्मक दिशेने विचार केल्याने कोणतीही समस्या सहज सुटते.
***
- वाचा> ससा आणि कासवाची गोष्ट
मराठी गोष्ट 3) मूर्ख पुजारी
डोंगराळ भागात नदीच्या काठावर एक छोटेसे गाव वसले होते. त्या गावातील लोक स्वभावाने अतिशय धार्मिक होते. गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात सर्व ग्रामस्थ रोज पूजा करत असत. त्या मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी तिथल्या पुजाऱ्यावर होती. जो मंदिराच्या आवारातच राहत असे. सकाळपासून रात्रीपर्यंत ते देवपूजेत मग्न असत.
एके दिवशी मुसळधार पावसाच्या रूपाने गावावर निसर्गाचा कहर झाला, त्यामुळे गावातील नदीला पूर आला. पुराचे पाणी गावात शिरताच गावातील लोकांनी घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी सुरू केली.
एका व्यक्तीचे गाव सोडून जाण्यापूर्वी मंदिराच्या पुजाऱ्याकडे लक्ष गेले आणि तो पळत मंदिरात पोहोचला. आणि पुजाऱ्याला म्हणाला, ''पंडितजी! पुराचे पाणी घरांमध्ये शिरू लागले आहे. हळूहळू तो मंदिरातही पोहोचेल. गाव सोडलं नाही तर पुरात वाहून जाऊ. आम्ही सर्व सुरक्षित ठिकाणी जात आहोत. तुम्ही पण चला आमच्यासोबत."
पण पुजारी त्या व्यक्तीसोबत जाण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, "मी तुमच्यासारखा नास्तिक नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मी आयुष्यभर त्याची पूजा केली आहे. तो मला काहीही होऊ देणार नाही. तुम्हाला जायचे असेल तर जा. मी येणार नाही.
पुजाऱ्याचे म्हणणे ऐकून ती व्यक्ती परत गेली. पुजारी परमेश्वराच्या प्रार्थनेत गढून गेले.
काही वेळातच पुराचे पाणी मंदिरापर्यंत पोहोचले. थोडया वेळाने पुजाऱ्याच्या कमरेपर्यंत पोहोचले. त्याचवेळी एक माणूस बोट घेऊन तिथे आला आणि पुजाऱ्याला म्हणाला, "पंडितजी, गावातल्या एका माणसाने मला सांगितले की तुम्ही अजून इथेच आहात. मी तुम्हाला न्यायला आलो आहे. चला, बोटीवर बसा."
पुजाऱ्याने याही व्यक्तीला तेच सांगितले, जे त्याने पहिल्या व्यक्तीला सांगितले होते आणि जाण्यास नकार दिला होता. बोट आणणारी व्यक्ती निघून गेली.
काही वेळात मंदिराच्या छतापर्यंत पाणी पोहोचले. मदतीसाठी देवाचे स्मरण करत पुजाऱी मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर उभे राहिले. त्यानंतर सुरक्षा दल हेलिकॉप्टरने आले आणि पुजाऱ्याला वाचवण्यासाठी दोरी फेकली. पण पुजाऱ्याने तीच गोष्ट पुन्हा सांगून दोरी धरण्यास नकार दिला. इतरांना वाचवण्यासाठी सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर पुढे निघून गेले.
आता पुराचे पाणी मंदिराच्या माथ्यावर पोहोचले होते. तिथे उभा असलेला पुजाऱी बुडू लागला. बुडण्यापूर्वी त्याने देवाकडे तक्रार केली आणि म्हणाला, "प्रभो! मी माझे संपूर्ण आयुष्य तुम्हाला समर्पित केले आहे. माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तरीही तुम्ही मला वाचवायला आला नाहीत."
पुजाऱ्याची तक्रार ऐकून भगवान प्रकट झाले आणि म्हणाले, "अरे मूर्खा! मी तुला तीनदा वाचवायला आलो. मी पहिल्यांदाच तुझ्याकडे धावत आलो आणि गावकऱ्यांसोबत गाव सोडायला सांगत राहिलो. मग मी बोट आणली आणि शेवटी हेलिकॉप्टर. आता तू मला ओळखलं नाहीस यात माझा काय दोष?”
पुजाऱ्याला आपली चूक लक्षात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
तात्पर्य : हातात आलेली संधी कधीही जाऊ देऊ नये. Story in Marathi
***
तर मित्रहो Story in Marathi या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम मराठी गोष्टी शेअर केल्यात. आशा आहे आपणास या मराठी गोष्टी आवडल्या असतील. लेखातील सर्व marathi goshta हे Story in Marathi with Moral सह उपलब्ध आहेत. पालक आपल्या मुलांना बोधकाथा म्हणून सांगण्यासाठी देखील या गोष्टी उपयोगात घेऊ शकतात.