अनाम वीरा स्वाध्याय कविता इयत्ता सातवी | Anaam Veera Swadhyay Question Answer Marathi

अनाम वीरा कविता स्वाध्याय प्रश्न उत्तरे आणि PDF - Anaam Veera Swadhyay Kavita Question Answer Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण इयत्ता सातवी मराठी विषयाचा 13 वा पाठ अनाम वीरा.. या कवितेचा चा स्वाध्याय व त्याची उत्तरे प्राप्त करणार आहोत. या लेखात देण्यात आलेला अनाम वीरा स्वाध्याय (Anaam Veera Swadhyay Question Answer Marathi) आपण अभ्यासू शकतात व याद्वारे परीक्षेची योग्य तयारी करू शकता. 




अनाम वीरा कविता 

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !

धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशीं

जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी!

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा-

मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव

रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुशें यशोगान!

सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान!

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा

प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युुंजय वीरा !


अनाम वीरा स्वाध्याय - Anaam Veera Swadhyay Marathi

प्र. १. कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते?

(अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !

उत्तर: देशाच्या रक्षणासाठी युद्धकाळात आपल्या प्राणांची परवा न करतात शत्रूशी लढता लढता अनेक सैनिकांना वीर मरण येते. शहीद झालेले अनेक अज्ञात सैनिक देखील असतात. अशा अज्ञात सैनिकांसाठी कवी कुसुमाग्रज म्हणतात की, देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी, ज्या ठिकाणी प्राण सोडला तेथे कोणी त्यांचे स्मारक बांधले नाही किंवा एक ज्योतही प्रज्वलित केली नाही. 

(आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

उत्तर: सैनिकाच्या जीवनात कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. आज हसत हसत रवाने झालेले सैनिक केव्हा तिरंग्यात लपेटुन येतील याची देखील शाश्वती नसते. म्हणून कवी कुसुमाग्रज म्हणतात की अग्नि कुंडात जाण्यासाठी, आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तू संसाराच्या तयार करून तत्पर्तने जात आहेस.

(इ) सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !

उत्तर: या ओळीतून कवी म्हणतात की सैनिकाला प्रसिद्धीची गरज नसते. देशासाठी लढता लढता वीर मरण पत्करणे हेच त्याचे व्रत असते म्हणून सैनिकाचे हे बलिदान कधीच वाया जात नाही.


प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.

देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक ‘अनाम’ राहिला आहे, असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा..

  • त्याच्या स्मरणार्थ कोणी दिवा पेटवला नाही.
  • अनाम विराचे कोणी स्मारक बनवले नाही.
  • कुठल्याही रियासतीवर अनामवीराचे नाव नोंदलेले नाही.
  • कुठल्याही भाटांनी वीराचे यश गायले नाही.
  • जनसेवा करूनही सैनिकांवर जनभक्ती उधाणली नाही.


अनाम वीरा स्वाध्याय व्हिडिओ - Anam Veera Swadhyay Video

अनाम वीरा स्वाध्यायाची प्रश्न उत्तरे पुढील विडियो मध्ये देण्यात आलेली आहेत. आपण विडियो द्वारे देखील  Anam Veera Swadhyay अभ्यासू शकतात.



प्र. ३. खालील जोड्या जुळवा

  1. धगधगतां समराच्या ज्वाला
    (ई) महाभयंकर युद्ध

  2. मरणामध्येविलीन 
    (अ) शांतपणे मरण स्वीकारणे

  3. ना भय ना आशा
    आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता

  4. नच उधाणले भाव
    (इ) भावना व्यक्त न करणे


प्र. ४. खालील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

  1. अनाम वीरा
    अज्ञात वीर, ज्याला कोणीही ओळखत नाही असा वीर

  2. संध्येच्या रेषा   
    जीवनाचा अंत, मृत्यू

  3. ना भय ना आशा
    संध्याकाळची वेळ

  4. मृत्युंजय वीर
    मृत्यूवर विजय मिळवणार, मरणाला न घाबरणार


तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा.

उत्तर: प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही न काही बनण्याची स्वप्ने रचून ठेवतो. त्याला आयुष्यामध्ये काय काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे आणि काय बनायचे आहे इत्यादी गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थी विचार करीत असतो. काहींचे स्वप्न इंजिनियर बनायचे असते, काही लेखक तर काही पोलिस व शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहत असतात. परंतु मी माझ्या आयुष्यात मोठे झाल्यावर एक यशस्वी डॉक्टर व्हायचे ठरवले आहे. मला डॉक्टर होऊन अनेकांचे प्राण वाचवून त्यांना नवीन जीवन द्यायचे आहे. 

माझ्या आई वडिलांची एकच इच्छा आहे की मी मोठे झाल्यावर असे काही करावे ज्याने मी माझे आणि समाजाचे भले करू शकेल. व मला तरी वाटते की एक डॉक्टर होऊन मी समाजाचे योग्यपणे कल्याण करू शकतो. कारण जरी डॉक्टर देव नसतो तरी त्याच्या हातात जीवन मृत्यूचा निर्णय असतो. जरी डॉक्टर मृत व्यक्तीला जिवंत करू शकत नाही तरी तो कठीण परिस्थितीतून रुग्णांना काढू शकतो. म्हणून मी लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहत आहे. 

डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो असे मी ऐकले आहे. व म्हणूनच मी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टरांसाठी महत्त्वाचे विषय मी आतापासूनच अध्ययन करीत आहे. डॉक्टर झाल्यावर मेडिकलच्या औषधी देण्याऐवजी माझा भर आयुर्वेदिक पद्धतीने रोग चांगले करण्यावर अधिक राहील. मी माझ्या रुग्णांना व्यायाम आणि आयुर्वेदिक औषधी द्वारे आजार कसे चांगले करावे याविषयीची माहिती देईल. 

भविष्यात डॉक्टर झाल्यावर माझे पुढील प्रयत्न जे राहतील त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी गरीब आणि गरजू रुग्णांना कमी दरात आणि शक्य झाल्यास मोफत उपचार उपलब्ध करून देईल. ज्यामुळे जे लोक महागड्या उपचाराचा खर्च करू शकत नाही त्यांचे देखील प्राण वाचू शकतील.

अनाम वीरा स्वाध्याय - Anaam Veera Swadhyay

खालील वाक्ये वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.

  • गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना : असतील शिते तर जमतील भुते


  • रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिले; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना काखेत कळसा नि गावाला वळसा


  • पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना तहान लागली की विहीर खोदायचे


  • फर्नांडिस खूप बुद्‌धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, बाप तसा बेटा

खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.

उतारा :

         मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्गहाच आपला खरा मित्र आहे.


उत्तर:

         मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले, सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्गहाच आपला खरा मित्र आहे!


तुम्हांला काय करायला आवडते ते सांगा. त्यासंबंधी खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांवर विचार करा व लिहा.

(अ) तुमचा आवडता छंद कोणता? त्यासाठी तुम्ही दिवसभरात किती वेळ देता?

उत्तर: माझा आवडता छंद हा पुस्तके वाचन आहे. पुस्तके म्हणजे शाळेची नव्हे, मला अवांतर वाचनाची जास्त आवड आहे. मी अनेक गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबरी इत्यादींचे वाचन केले आहे. दिवसभरात जवळपास कमीतकमी 2 तास मी पुस्तकांचे वाचन करीत असतो. रात्री झोपण्याआधी मला कमीत कमी पुस्तकाची 4-5 पाने वाचण्याची सवय आहे.


(अ) तुमच्या आवडत्या छंदाबाबत तुमच्या घरातील व्यक्ती तुम्हांला कोणती मदत करतात?

उत्तर: पुस्तक वाचन हा माझा छंद आहे व माझ्या आईवडिलांनी माझा छंद जोपासण्यासाठी मला खूप सहाय्य केले आहे. माझे वडील दर महिन्याला 2-3 नवीन पुस्तके आणून देतात आणि मी देखील महिनाभरात त्या पुस्तकांचे वाचन संपवतो. याशिवाय माझ्या आईने देखील मला सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व घेऊन दिले आहे. म्हणून मी नियमितपणे वाचनालयाला देखील भेट देत असतो.


Anaam Veera Swadhyay: तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी अनाम वीरा कवितेचा स्वाध्याय व anam veera question answer  देखील समाविष्ट केले आहेत. आशा आहे आपणास हा लेख उपयोगी ठरला असेल. व अनाम वीरा स्वाध्याय द्वारे आपणास अभ्यासात योग्य मदत झाली असेल. आपणास हा लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. bhashanmarathi वेबसाइट वरील anamveera kavita swadhyay ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद..


Read More:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने