स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण | Swami Vivekananda Speech in Chicago in Marathi

महान संत आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांनी आपले विचार आणि भाषणातून भारतीय संस्कृती जगभरात पोहोचवली. विवेकानंदांनी अध्यात्मिक विकासाद्वारे मनुष्याची प्रगती कशी होईल याबद्दलची माहिती समाजाला दिलेली आहे. स्वामी विवेकानंदांचे शिकागो मधील भाषण जगप्रसिद्ध आहे. 

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण - Swami Vivekananda Speech in Chicago in Marathi मराठी भाषेत घेऊन आलेलो आहोत.

 


स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण | Swami Vivekananda Speech in Chicago in Marathi

1) अमेरिकेच्या सर्व भाऊ बहिणींनो, आजच्या या समारंभात आपण सर्वांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले ते पाहून माझे मन भरून आले. मी जगातील सर्वात जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची जननी कळून तुम्हाला धन्यवाद करतो. सर्व जाती व पंथांच्या लाखो करोडो हिंदूंकडून तुमचे आभार व्यक्त करतो.


2) मी या रंगमंचावर बोलणाऱ्या काही वक्त्यांना देखील धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी आज हे सिद्ध केले की जगात सहनशीलता पूर्वेकडील देशांकडून पसरत आहे. 


3) मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या धर्मातून आहे ज्याने जगाला सहिष्णुता व वैश्विक स्विकृतीचा धडा शिकवला आहे. आम्ही फक्त वैश्विक सहनशीलतेवर विश्वास करीत नाही तर सर्व धर्मांना सत्य व एक मानतो. 


4) मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्या देशाचा रहिवासी आहे ज्याने त्या सर्व लोकांना आश्रय दिला ज्यांना इतर सर्व देशांनी त्रास दिला. मला अभिमान आहे की आमच्या देशाने इतरांद्वारे प्रताडीत झालेल्या इस्रायली यहुदीनां आश्रय दिला. 


5) मला अभिमान आहे की मी त्या धर्माचा नाही ज्याने पारशी लोकांना शरण दिली व अजुनही देत आहे. 


6) आजच्या या शुभमुहूर्तावर मला लहानपणी वाचलेला एक श्लोक आठवण येत आहे. या श्लोकाची करोड लोक पुनरावृत्ती करतात. स्वामी विवेकानंद यांच्या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे होता. ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून निघालेल्या नद्या एक होऊन समुद्राला मिळून जातात. त्याचपद्धतीने मनुष्य आपल्या इच्छा मधून वेगवेगळे मार्ग निवडतो जरी दिसण्यात हे मार्ग वेगवेगळे वाटत असले तरी ते सर्व ईश्वराकडे जाणारे आहेत. 


7) सांप्रदायिकता, कट्टरता आणि धार्मिक हठाने दीर्घ काळापासून या धरतीला जकडून ठेवले आहे. ज्यामुळे आपली धरती हिंसा व रक्ताने लाल झाली आहे. धार्मिक कट्टरतेमुळे कितीतरी सभ्यता व देश नष्ट झाले आहेत. 


8) जर कट्टरता पसरवणारे हे राक्षस आजच्या समाजात  नसते तर तर मानव समाज कितीतरी चांगला राहिला असता. परंतु आता ही कट्टरता अधिक वेळ राहणार नाही. मला आशा आहे की या संमेलनाचे बिगुल सर्व तऱ्हेची कट्टरता, धार्मिक हठ आणि दुःखाचा विनाश करेल. मग ते तलवाराने असो वा पेनाने.

तर मित्रहो हे होते स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील भाषण - Swami Vivekananda Speech in Chicago in Marathi. आशा आहे आपणास हे भाषण उपयोगी ठरले असेल. हा लेख इतरांसोबतही शेअर करा.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने