शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती । Share Market Information in Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय व Share market in marathi : शेअर बाजार हा कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असतो. देशातील उद्योग व्यवसायांना चालवण्यासाठी लागणारा पैसा जमवण्याकरिता कंपन्या शेअर बाजारात येतात. 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट म्हणजे कायशेअर मार्केटची मराठी माहिती आणि share market information in marathi बद्दल माहिती मिळवणार आहोत. या सोबतच जाणूया कि कश्या पद्धतीने तुम्हीपण शेअर बाजारात गुंतवणूक करू शकाल.


share market marathi mahiti share market basics in marathi intraday trading in marathi

शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market Information in Marathi

Share market information in Marathi : शेअर चा अर्थ असतो "भाग", शेअर बाजार किंवा share market मध्ये शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे होय. यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो त्याबदल्यात कंपनी त्याला हिस्सेदारी देते. जर कोण्या एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील 1 शेअर विकत घेतला तर कंपनीत तुमची 1% हिस्सेदारी होऊन जाते आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात, व जर त्या काळात तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला ही नफा मिळतो.

शेअर मार्केट च्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु share market एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय माहीत नाही ते आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना long term ट्रेडिंग करण्याची सल्ला दिली जाते. जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी. 

जर तुम्ही जोखीम घ्यायला तयार नसाल तर आपण म्युचल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. म्युचल फंड मध्ये शेअर बाजार पेक्षा जोखीम कमी असते आणि गुंतवणूक करणे देखील सोपे असते, अधिक माहिती वाचा पुढील लिंक वर>> म्यूचल फंड मराठी माहिती 


शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी | How to invest in share market marathi

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठीच्या काही प्रसिद्ध वेबसाइट आहेत:

  • https://www.moneycontrol.com
  • https://economictimes.indiatimes.com
  • https://www.investing.com


या शिवाय शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक मोबाइल अँप देखील उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात zerodha, upstocks, Groww, angel One (Angel broking), 5 paisa इत्यादि प्रमुख अँप्लिकेशन आहेत. परंतु मी तुम्हाला share market मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Angel One हे ॲप वापरण्याची सल्ला देईल. Angel one चे पूर्वीचे नाव angel broking असे होते.

कारण हे एकमेव ॲप आहे ज्यामध्ये नवीन डिमॅट अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्ज लागत नाहीत. zerodha सारख्या ॲप मध्ये अकाऊंट opening चार्ज हे 600 रुपये आहेत. परंतु Upstox मध्ये नवीन Dmat अकाऊंट opening charge 0 रुपये असून पुढील लिंकहुन app डाउनलोड केल्यास आपणास 100 रुपये Account Opening बोनस देखील मिळेल.

अँप Download केल्यानंतर त्यात अकाउंट उघडून खूपच सोप्या पद्धतीने स्टॉक विकत घेता येतात. Upstox मोबाइल ॲप पुढील लिंक वरून डाउनलोड करता येईल.

Note: कृपया App डाउनलोड केल्याच्या 7 दिवसांच्या आत अकाऊंट उघडून घेणे.



शेअर मार्केट विषयी माहिती - Share market basic information in marathi

भारतात प्रामुख्याने दोन Stock exchange market आहेत. Bombay stock exchange ज्याला BSE देखील म्हटले जाते BSE चा इंडेक्स Sensex असतो ज्यात 30 कंपन्या असतात आणि दुसरे आहे National stock exchange ज्याला NSE पण म्हटले जाते. NSE चा इंडेक्स Nifty असतो ज्यात 50 कंपन्या असतात.

Nifty आणि Sensex मुळे लक्षात येते की ज्या कंपन्या टॉप 50 किंवा टॉप 30 मध्ये आहेत त्या कश्या पद्धतीने कार्य करत आहेत. जर कंपनी चांगले काम करीत असेल तर त्याचा सरळ प्रभाव शेअर्स च्या किमतीवर पडतो.

Share Market मध्ये डायरेक्ट Customer to company (ग्राहक ते कंपनी) व्यवहार होत नाही. जर तुम्हाला शेअर विकत घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी एक 'शेअर ब्रोकर'(शेअरची खरेदी विक्री करणारा दलाल) आवश्यक आहे. शेअर दलाल हा त्याचे कमिशन काढून कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीचे शेअर खरेदी-विक्रीचे काम करतो. शेअर बाजारात ब्रोकर स्टॉक एक्सचेंज चे सदस्य असतात आणि यामुळे फक्त तेच स्टॉक खरेदी-विक्री करू शकतात.

पण आताच्या ऑनलाईन जगात तुम्ही देखील घरी बसल्या आपल्या मोबाईल च्या सहाय्याने Stocks विकत घेऊ शकतात. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि वेबसाइट्स चा वापर करू शकतात. खूप सारे मोबाईल ॲप्लिकेशन सुरुवातीला कोणताही ब्रोकरेज चार्ज न घेता. Share market मध्ये invest करण्याची सुविधा देतात. share market information in marathi मध्ये आता आपण जाणूया की कश्या पद्धतीने आपणही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू शकतात.


वाचा> गुंतवणुकीवर मिळवा 12%खात्रीशीर व्याज


शेअर बाजार ट्रेडिंग चे प्रकार - Types of trading in share market marathi

Share market information in Marathi मध्ये आता आपण शेअर बाजाराचे प्रकार कोणते आहेत या विषयीची माहीत जाणून घेऊया :


  1. इंट्रा डे ट्रेडिंग (Intraday trading in marathi) 
    इंट्रा डे ट्रेडिंग मध्ये एकाच दिवसात शेअर विकत घेऊन त्याच दिवशी मार्केट बंद होईपर्यंत ते विकून दिले जातात. हा प्रकार share market च्या एक्सपर्टस लोकांसाठी असतो. जर तुम्ही नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंग तुमच्यासाठी नाही आहे.


  2. स्कॅल्पर ट्रेडिंग (Scalper Trading)
    स्कॅलपर ट्रेडिंग हा शेअर विकत घेण्याचा असा प्रकार असतो ज्यात शेअर विकत घेतल्याच्या 5-10 मिनिटांच्या आत विकून टाकले जातात. शेअर बाजारातला हा प्रकार सर्वात जोखमीचा प्रकार असतो. या पद्धतीची ट्रेडिंग देशात एखाद्या नवीन कायदा आल्यावर किंवा आर्थिक क्षेत्रात मोठी बातमी आल्यावर केली जाते.


  3. स्विंग ट्रेडिंग (swing trading)/ शॉर्ट टर्म ट्रेडिंग(Short Term) 
    स्विंग ट्रेडिंग ही थोड्या लांब वेळेसाठी केली जाते. यामध्ये शेअर विकत घेऊन त्यांची डिलिव्हरी आपल्या अकाउंट मध्ये केली जाते. यानंतर काही महिने किंवा आठवडे किंमत वाढीची प्रतीक्षा करत शेअर्स आपल्याजवळ ठेवले जातात आणि योग्य किंमत आल्यास Stocks विकून नफा मिळवला जातो. या प्रकारात जोखीम कमी असते.


  4. लाँग टर्म ट्रेडिंग (long term trading)
    शेअर्स विकत घेऊन दीर्घ काळापर्यंत आपल्या जवळ ठेवण्याच्या पद्धतीला long term trading असे म्हणतात. यात गुंतवणूकदार सहा महिन्यांपासून ते दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी शेअर आपल्या जवळ ठेवतो. या कालावधीदरम्यान जर कंपनीच्या व्यवसायात वाढ झाली तर लाँग टर्म ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदाराला चांगला नफा होऊन जातो. लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये जोखीम अतिशय कमी असते. या मुळे नव्या गुंतवणूकदारांना लॉंग टर्म ट्रेडिंग मध्ये पैसे invest करण्याचा सल्ला दिला जातो.

शेअर मार्केट म्हणजे काय मराठी PDF | Share Market Information Marathi PDF

"शेअर मार्केट ची माहिती देणारी मराठी पुस्तके" PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील पोस्ट पहा


शेअर मार्केट पुस्तक पीडीएफ


तर मित्रांनो ही होती शेअर मार्केट म्हणजे काय व stock market/ share market मध्ये ट्रेडिंग करण्याबद्दलची माहिती. मला आशा आहे की या लेखाला वाचल्यानंतर तुमच्या share market basics शंका दूर झाल्या असतील. या लेखात तुम्हाला Share market marathi mahiti दिली आहे. ज्या मुळे Share market basic information in marathi तुम्हाला मिळाली असेल. 


जर share market information in marathi व शेअर बाजार संबंधी तुमच्या अजुनही काही शंका असतील तर खाली कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकतात. धन्यवाद...


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

13 टिप्पण्या

  1. एक वर्षापेक्षा जास्त होल्ड केलेल्या शेअर ला कर(tax) किती द्यावा लागतो.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर जर तुम्ही एक लाखापेक्षा कमी पैसे एका वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवत असाल तर तुम्हाला कोणताही कर लागणार नाही आणि जर लॉन्ग टर्म मध्ये एक लाखापेक्षा जास्त पैसे गुंतवणूक कराल तर १०% कर लागेल.

      हटवा
    2. सर मला हे सांगा कि share market मध्ये share चा भाव कमी किंवा जास्त कोण कोणत्या कारणांवरून होतो ,जसे की एखाद्या share ची मागणी वाढली की भाव वाढतो व विक्री वाढली की भाव कमी होतो , सर आजुन कोण कोणती कारण असतात व share market चे computers system कसे काम करते हा बाज़ार भाव ठरवण्या साठी

      हटवा
  2. सर मला हे सांगा कि share market मध्ये share चा भाव कमी किंवा जास्त कोण कोणत्या कारणांवरून होतो ,जसे की एखाद्या share ची मागणी वाढली की भाव वाढतो व विक्री वाढली की भाव कमी होतो , सर आजुन कोण कोणती कारण असतात व share market चे computers system कसे काम करते हा बाज़ार भाव ठरवण्या साठी

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शेअर चा भाव हा मुख्यतः demand अर्थात शेअर च्या मागणीवरच अवलंबून असतो. जास्तकरून जेव्हा एखादी कंपनी नवीन प्रॉडक्ट लॉंच करते किंवा कंपनी संबंधी एखादी नवीन न्यूजची घोषणा केली जाते, तेव्हा शेअर ची मागणी वाढते व त्यांचा भावही वाढतो.

      या उलट जर जर काही scam, घोटाळे, बंद किंवा कंपनीच्या व्यवस्थापनात काही बदल झाले असतील तर shares चे भाव कमी होतात आणि याचा सरळ प्रभाव शेअर होल्डर्स ला दिसतो.

      share market च्या कम्प्युटर सिस्टम मध्ये रेट डिसाइड करण्यासाठी product ची demad हा factor महत्वाचा असतो. धन्यवाद

      हटवा
  3. सर मला सांगा शेअर माके॔ट मधे भाग घेण्या काय करावे लागते आणि आपल्याला नफा कसा मिळतो आपल्याला नफा मिळाला हे कसे समजते आणि गुंतवणूक किति रुपये करावी लागते नफा मिळाल्यानंतर पैसे काढता येतात का.

    उत्तर द्याहटवा
  4. मोहित पाटील सर आपण बेसिक शेअर मार्केट छान सांगितले

    उत्तर द्याहटवा
  5. फ्लोमिक ग्लोबल कंपनी के बारे में जरा डिटेल में बताओं

    उत्तर द्याहटवा
  6. फ्लोमिक ग्लोबल कंपनी के बारे में जरा डिटेल में बताओं

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने