लोकमान्य टिळकांचे भाषण। lokmanya tilak bhashan Marathi। lokmanya tilak marathi speech

लोकमान्य टिळक माहिती भाषण|lokmanya tilak bhashan marathi. speech on lokmanya tilak in marathi.


नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांचे भाषण मराठीतून देत आहे. लोकमान्य टिळकांची माहिती व लोकमान्य टिळकांचे जीवनातील प्रसंग शालेय विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे आहे. लोकमान्य टिळक मराठी भाषण तुम्हाला याखाली मिळेल. (lokmanya tilak Bhashan marathi)


लोकमान्य टिळकांचे भाषण (lokmanya tilak marathi bhashan)-

       अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांन बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 

      स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलाई 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे लहान पणाचे नाव केशव असे होते. केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती म्हणून केशव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती. टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ची पदवी मिळवली. टिळक लहानपणापासून बुद्धिमान होते त्यांची स्मरणशक्ती ही चांगली होती. टिळक लहान असतानाच त्यांचा आई वारल्या व सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते. डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. या मैत्रीच्या मदतीनेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणताही पगार न घेत ते काम करू लागले.

       देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारवर टीका करू लागले. याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरा करणे सुरू केले.

       साल 1896 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी सर्व शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले, त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले आणि केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हक्काची जाणीव करून दिली.

       1897 साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारले. आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांवर टीका करणे सुरू केले. यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली. मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

       अशा पद्धतीने इंग्रजांशी लढत असताना, इसवी सन 1920 साली दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले. पंडित नेहरू व महात्मा गांधींना ही बातमी कळताच. नेहरूंनी "भारतातील एक तेजस्वी सुर्याचा अस्त झाला" असे उद्गार काढले. त्यांच्या मृत्यूने दुःखी होऊन गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता अशी उपाधी दिली. टिळकांच्या अंत्ययात्रेसाठी दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते

       भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते. असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. अशा या थोर नेत्याला प्रणाम करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद..


Tags: Lokmanya Tilak information in Marathi speech, Lokmanya Tilak Bhashan Marathi madhe, Lokmanya Tilak Marathi, Lokmanya Tilak punyatithi.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने