माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध। Pavsala nibandh marathi। Majha avadta rutu

माझा आवडता ऋतू पावसाळा। पाऊस निबंध मराठी। Majha avadta rutu

मित्रांनो, आपल्या देशात वर्षभरात तीन प्रमुख ऋतु येतात यात पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा यांचा समावेश आहे. प्रत्येक ऋतूचे आपापले महत्व आहे. परंतु majha avadta rutu पावसाळा आहे. 

म्हणूनच आजच्या या लेखात मी तुम्हाला माझा आवडता ऋतु पावसाळा या विषयावर मराठी निबंध देणार आहे. तर चला निबंधला सुरू करूया.. 


Pavsala nibhand in Marathi, pavsala essay in marathi, majha avadta rutu

1) पाऊस निबंध मराठी। Majha avadta rutu (300 words)

आपल्या देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. परंतु या तिन्ही ऋतू मधून मला पावसाळा हा ऋतू अतिप्रिय आहे. उन्हाळ्यात भयंकर उष्णता आणि गर्मी होते. पावसाळा आपली या उष्णतेपासून सुटका करतो आणि सुखद गारवा देतो. दक्षिणेकडून येणारे थंड वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात. या वाऱ्यांना मान्सून वारे म्हटले जाते. भारतात पावसाळा pavsala जुलै महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत राहतो. यादरम्यान काही भागात जोरदार अतिवृष्टी होते तर काही भागात खूप कमी प्रमाणात पाऊस येतो.


पावसामुळे जमीन थंड आणि हिरवी बनते. हा बदल मला खूप आवडतो. यादरम्यान शेतकरी नांगरणी व पेरणीच्या कामात व्यस्त होतात आणि काही दिवसातच निसर्गाचे रूप सुखद होऊन जाते. गाईगुरे जमिनीवर चरायला लागतात. थंडगार वारे वाहायला लागतात आणि पावसाचे संगीत कानांना शांती प्रदान करते. गडद काळे आणि जाड ढग आकाशात फिरायला लागतात. ढगांचे हे दृश्य पाहून व आवाज ऐकून मोर आनंदाने नाचायला लागतो. अश्या या सुंदर ऋतूचे आम्ही आनंदाने स्वागत करतो.


पण बऱ्याचदा पावसामुळे नुकसान सुद्धा होतात. रस्ते चिखलाने भरून जातात. कित्येकदा नदी नाल्यांना पुरही येतो. वाहतुकीत येणाऱ्या अडचणीमुळे व्यापारही मंद होतो. गरिबांची घरे गळायला लागतात आणि बऱ्याचदा तर अतिवृष्टी मुळे कोसळून पण येतात. अश्यात बरेच गरीब व भिकार्‍यांना निवारा राहत नाही. खूप सारे किडे मुंग्या, नाकतोडे, साप आणि गांडूळ या ऋतूत जन्म घेतात. पण काहीही असो हे सत्य आहे की पावसाळा आपल्या देशातील सर्व ऋतून पेक्षा चांगला आहे. या पावसाला pavsala पाहून मनात अनेक कविता येतात, त्यातीलच एक कविता.


विशेष करून शेतकरी पावसाळ्याचे स्वागत करतात. कारण त्याची पिके पावसावरच अवलंबून असतात. जर एखाद्या वर्षी पावसाळा चुकला तर त्यांची पिके उद्ध्वस्त होतात. पावसाळा (pavsala) आपल्यासाठी अन्न आणि भाजीपाला उपलब्ध करून देतो. जंगले टवटवीत आणि हिरवी होतात. नदी आणि धबधबे जे उन्हाळ्यात कोरडे झालेले असतात ते पावसामुळे पुन्हा एकदा वाहू लागतात.


टिप टिप पाऊस झो झो वारा,
गीत गाऊ पाहतो आसमंत सारा

कडाडणारी वीज गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा ताला सुरांची जत्रा

2) पाऊस निबंध मराठी। pavsala essay in marathi (200 words)

पावसाळा हा उन्हामुळे वाढलेल्या उष्णतेपासून सुटका करून थंडावा प्रदान करतो. दरवर्षी जून व जुलै महिन्यात पावसाचे आगमन होते. पावसाळा हा सुंदर ऋतु आहे माझा आवडता ऋतु देखील पावसाळा आहे. पाऊस पडायला लागला की लोकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. खासकरून शेतकाऱ्यामध्ये आनंदाची लाठ वाहू लागते. 


पावसाळा फक्त उष्णतेपासूनच मुक्ती देत नाही तर हा ऋतु शेतासाठी पण वरदान सिद्ध होतो. भारतात बऱ्याच शेतकऱ्याची शेती पावसावर अवलंबून आहे आणि जर चांगला पाऊस पडला नाही तर शेतात चांगले उत्पन्न येत नाही. ज्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्याला कमी किमतीत धान्य विकावे लागते. विपुल प्रमाणात आलेल्या पावसामुळे पाण्याची कमतरता होत नाही, आणि शेतातील पिकही चांगले येते. 


भारतात पावसाळा बऱ्याच ठिकाणी पाण्याची समस्या दूर करतो.  भारतात बरेच लोक हे पाण्याच्या समस्याने त्रस्त असतात. पाऊस पडल्याने तलाव, विहीर व नद्यामध्ये पानी भरून जाते आणि लोकाना मोकळे पानी मिळते. पावसामुळे चारही दिशाना हिरवळ होऊन जाते. झाडे झुडपे पटापट वाढायला लागतात, व वातावरण आनंदित होऊन जाते. 


जास्त प्रमाणात येणार पाऊस नेहमी आंनद निर्माण करतो असेही नाही, बऱ्याचदा अति पावसामुळे नद्याना महापुर येतो. काही काही ठिकाणी जास्त पावसामुळे गांव शहर पाण्यात बुडून जातात व आर्थिक नुकसान पण होते. जास्त प्रमाणात येणाऱ्या पावसामुळे pavsala शेतातील पिके नष्ट होतात. जोरदार येणाऱ्या वाऱ्यामुळे लहान घरे व झोपडे नष्ट होऊन जातात. जोरदार पावसाचा परिणाम वाहतुकीवर होतो. 


पावसाच्या या ऋतूमध्ये वेगवेगळे कीटक जन्म घेतात या मुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो. म्हणून या ऋतुत सावधगिरी बाळगायला हवी. व पावसाच्या पाण्याला संग्रहित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.     


माझा आवडता ऋतू पावसाळा व्हिडिओ पहा-



तर मित्रांनो हा होता माझा आवडता ऋतू पावसाळा (pavsala nibandh marathi) या विषयावर लिहिलेला मराठी निबंध. आमच्या या website वर तुम्हाला मराठी भाषणे व मराठी निबंध मिळतील, म्हणून जेव्हा कधी तुम्हाला निबंध किंवा भाषण तयार करायचे असेल तेव्हा भेट द्या https://www.bhashanmarathi.com/ ला


  • अधिक वाचा- 

  1. उन्हाळा मराठी निबंध।
  2. हिवाळा मराठी निबंध।
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने