[जीवन परिचय] साने गुरुजी माहिती मराठी | Sane Guruji Information in Marathi

sane guruji information in marathi: मराठी भाषेतील महान साहित्यिक, शिक्षक आणि समाजसेवी पांडुरंग सदाशिव साने (pandurang sadashiv sane) अर्थात आपले साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. 

आई विषयी अपार करुणा, देशाविषयीचे प्रेम आणि मानवते विषयीची तळमळ या सर्व गोष्टी साने गुरुजींच्या लेखनातून दिसून येतात. आजच्या या लेखात साने गुरुजींचा संपूर्ण जीवन परिचय व साने गुरुजी माहिती मराठी भाषेतून तुम्हास वाचावयास मिळेल.


Sane guruji information in Marathi sane guruji mahiti
साने गुरुजी माहिती

साने गुरुजी माहिती मराठी - Sane guruji information in marathi

साने गुरुजींच्या वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. सानेगुरुजी हे सदाशिव राव व यशोदाबाई चे तिसरे अपत्य होते. त्यांचे वडील खोताचे म्हणजेच गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देण्याचे काम करायचे, याशिवाय भारतीय स्वातंत्र्य युद्धात त्यांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणून सुद्धा महत्वाची कामगिरी केली. स्वदेशी आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. 

साने गुरुजीच्या आई यशोदाबाई या खूपच दयाळू व सदाचारी स्त्री होत्या, त्यांनी साने गुरूजींना जीवनातील वास्तविक मूल्य शिकवण्यावर भर दिला. जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्याची देवता होती. "आई माझा गुरु आणि आई माझी कल्पतरू" असे आपल्या आईचे वर्णन त्यांनी आपल्या प्रसिद्ध कादंबरी 'श्यामची आई' मध्ये केलेले आहे.


साने गुरुजींचे शिक्षण (sane guruji education)

गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड गावाच्या डोपाली तालुक्यात झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यात असलेल्या त्यांच्या मामांकडे पाठवण्यात आले. परंतु त्यांना पुण्यात आपला मुक्काम आवडला नाही व ते परत पालगडला येऊन गेले आणि पुन्हा डोपाली तालुक्यात ते आपले शिक्षण घेऊ लागले. 


सानेगुरुजी लहानपणापासून बुद्धिमान होते त्यांचे मराठी व संस्कृत वर चांगले प्रभुत्व होते आणि कविता करण्याची सुद्धा त्यांना आवड होती. घराची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले व आपल्या मोठ्या भावाप्रमाणे ते पण सातारा जिल्ह्यात नोकरी करू लागले. काही वर्षात ब्यूबोनिक प्लेग ची साथ आली ज्यामुळे सर्व कामगारांना काम सोडून परत यावे लागले. 


काही काळानंतर त्यांनी पुण्यातील नूतन मराठा विद्यालयातून हायस्कूल चे शिक्षण पूर्ण केले आणि या पुढील शिक्षण न्यू पूना कॉलेज (सर परशुराम कॉलेज,पुणे) येथे केले. त्यांनी संस्कृत आणि मराठी मध्ये बीए आणि एम ए ची पदवी मिळवली. प्रतिभाशाली वक्ते असल्या कारणाने त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली. त्यांना लहान मुलांची खूप आवड होती. मुले त्यांना गुरूजी म्हणून हाक मारत असत.

 

साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते व शेवटपर्यंत असेच राहिले. देशातील राजकीय उलथापालथी मुळे त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत झाली. त्यांनी नियतकालिकातून राष्ट्रवादी लेख लिहिण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी हे त्यांचे आदर्श होते. 


गांधीजींच्या दांडी यात्रेनंतर त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी आपली शिक्षकाची नोकरी सोडली आणि खेड्या खेड्यामध्ये सभा करून लोकांना देशाविषयी जागृती करणे सुरू केले. आपल्या या राजनैतिक कार्यामुळे त्यांना पंधरा महिने नाशिकच्या जेलमध्ये सुद्धा काढावे लागले.


साने गुरुजी ची पुस्तके (sane guruji books)

साने गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले, त्यांनी जवळपास 73 पुस्तके लिहिली. त्यांना निसर्गाबद्दल प्रेम होते ते निसर्गाची पूजा सुद्धा करीत असत. त्यामुळे त्यांनी आकाश, प्रकाश आणि पाण्याबद्दल सुद्धा लिहिले. साने गुरुजींनी लहान मुलांसाठी सुद्धा विपुल साहित्य लिहिले. 


1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.


साने गुरुजींचा मृत्यू कसा झाला। sane guruji death information in marathi

गांधीजींचा हत्येपासून अस्वस्थ आणि निराश साने गुरुजी या महान आत्म्याने 11 जून 1950 रोजी अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु त्यांच्या मृत्युच्या 70 वर्षानंतरही ते भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून लोकांच्या मनात आजही ओळखले जातात.


साने गुरुजींची पुस्तके - Sane guruji books in Marathi

  1. अमोल गोष्टी
  2. आपण सारे भाऊ भाऊ
  3. आस्तिक
  4. इस्लामी संस्कृति
  5. कर्तव्याची हाक
  6. कला आणि इतर निबंध
  7. कला म्हणजे काय?
  8. कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
  9. 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
  10. क्रांति
  11. गीताहृदय
  12. गुरुजींच्या गोष्टी
  13. गोड गोष्टी (कथामाला), भाग १ से १०
  14. भाग १ - खरा मित्र
  15. भाग २ - घामाची फुले
  16. भाग ३ - मनूबाबा
  17. भाग ४ - फुलाचा प्रयोग
  18. भाग ५ - दुःखी
  19. भाग ६ - सोराब आणि रुस्तुम
  20. भाग ७ - बेबी सरोजा
  21. भाग ८ - करुणादेवी
  22. भाग ९ - यती की पती
  23. भाग १० - चित्रा नि चारू
  24. गोड निबंध भाग १, २
  25. गोड शेवट
  26. गोष्टीरूप विनोबाजी
  27. जीवनप्रकाश
  28. तीन मुले
  29. ते आपले घर
  30. त्रिवेणी
  31. दिल्ली डायरी
  32. देशबंधु दास
  33. धडपडणारी मुले
  34. नवा प्रयोग
  35. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
  36. पत्री
  37. भगवान श्रीकृष्ण व इतर चरित्रे
  38. भारतीय संस्कृती
  39. मानवजातीचा इतिहास
  40. मोरी गाय
  41. मृगाजिन
  42. रामाचा शेला
  43. राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता की मूल पुस्तक का अनुवाद)
  44. विनोबाजी भावे
  45. विश्राम
  46. श्याम खंड १, २
  47. श्यामची आई
  48. श्यामची पत्रे
  49. सती
  50. संध्या
  51. समाजधर्म. (लेखक : भगिनी निवेदिता व साने गुरुजी)
  52. साधना (साप्ताहिक) (संस्थापक, संपादक)
  53. सुंदर पत्रे
  54. सोनसाखळी व इतर कथा
  55. सोन्या मारुती
  56. स्त्री जीवन
  57. स्वप्न आणि सत्य
  58. स्वर्गातील माळ
  59. हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे


Download Free साने गुरुजी माहिती Marathi PDF




तर मंडळी ही होती साने गुरुजी मराठी माहिती sane guruji information in marathi. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आमच्या वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद.. 

वाचा
Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने