[निबंध] माझा आवडता खेळ मराठी निबंध | maza avadta khel badminton Marathi Nibandh

maza avadta khel : मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. आपल्या आजच्या या लेखात maza avadta khel या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे. निबंधाचा विषय माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध | Badminton Marathi Nibandh असा आहे. तर चला मग सुरू करू....

बॅडमिंटन खेळाची संपूर्ण महिती वाचा येथे...


Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh.
maza avadta khel

1) माझा आवडता खेळ मराठी निबंध | maza avadta khel Marathi Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन चा खेळ आहे. दररोज संध्याकाळी मी माझ्या मित्रांसोबत बॅडमिंटन चा हा खेळ खेळतो. बॅडमिंटन खेळण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसल्याने आम्ही आमची घराच्या कंपाऊंड मध्ये खेळतो. याशिवाय शाळेतही शारीरिक शिक्षण च्या तासाला आम्ही बॅडमिंटन खेळतो. बॅडमिंटन खेळण्यासाठी जास्त साहित्याची आवश्यकता नसते. मी या खेळातील कुशल खेळाडू आहे. माझे बॅडमिंटन मधील कौशल्य पाहून सर्वजण माझे कौतुक करतात. 


बॅडमिंटन हा चार भिंतीच्या आत खेळला जाणारा खेळ आहे. ह्या खेळाला बंद खोलीत या साठी खेळले जाते कारण खेळामध्ये जे शटलकॉक वापरले जाते, ते खूप हलके असते व हवेच्या वेगाने ते इकडे तिकडे वळू शकते. पण आपण याला मोकळ्या मैदानात पण खेळू शकतात. बॅडमिंटन माझा आवडता खेळ आहे याला खेळण्यात खूप मजा येते. याला खेळल्याने शरीरात रक्तस्त्राव व्यवस्थित होतो. ज्या मुळे हृदय संबंधी रोग दूर होतात. 


बॅडमिंटन खेळण्यासाठी 2 खेळाडूची आवश्यकता असते, या सोबतच दोन रॅकेट आणि एक शटलकॉक पण लागतात. दोघी बाजूंना समान मैदान दिले जाते, मध्ये एक जाळी नेट म्हणून बसविण्यात येते. रॅकेट च्या मदतीने शटलकॉक ला इकडून तिकडे मारले जाते. ज्याच्या मैदानात शटलकॉक पडले त्याची हार होते. बॅडमिंटन माझा आवडता खेळ आहे. याला खेळायला जास्त जागा लागत नाही व यात दुखापत होण्याची शक्यता पण कमीच असते. बॅडमिंटन खेळल्याने माझे शरीर तंदुरुस्त झाले आहे. आभ्यासात सुद्धा एकग्रता वाढत आहे. माझे मानने आहे की सर्वांनीच बॅडमिंटन खेळायला हवे. बॅडमिंटन खेळण्यासाठी लागणारे साहित्य गाव व शहर दोघी ठिकाणी कमी किमतीत उपलब्ध आहे. 


आजकाल बॅडमिंटन भारतात खूप लोकप्रिय होत आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सुद्धा भारतीय महिला वर्गात पी व्ही सिंधू यांनी  2016 साली सिल्व्हर मेडल मिळवले आहे. या खेळाचे भारतात लोकप्रिय होण्याचे अजून एक कारण असे आहे की जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी शहरात जागेची कमी निर्माण होत आहे, आणि कारण बॅडमिंटन खेळायला खूप कमी जागा लागते म्हणून बॅडमिंटन ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.


हे पण वाचा  माझा आवडता खेळ क्रिकेट. 

2) माझा आवडता खेळ | majha avadta khel Badminton nibandh 

बॅडमिंटन हा इंनडोर म्हणजेच बंद खोलीत खेळला जाणारा खेळ आहे या खेळाला खेळण्यासाठी एक रॅकेट आणि शटल कॉक ची आवश्यकता असते. या खेळाला बंद खोलीत खेळले जाण्यामागे कारण असे आहे की यात जे शटल कॉक वापरले जाते ते वजनाने खूप हलके असते व बाहेरच्या हवेमुळे त्याची दिशा बदलू शकते. बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे. मला हा खेळ आवडण्यामागे एक कारण असेही आहे की या खेळाला खेळण्यासाठी जास्त लोकांची आवश्यकता नसते. फक्त दोन लोक सुद्धा याला खेळू शकतात. 


या खेळामध्ये खेळाडू रॅकेट म्हणजेच बॅट हातात धरतात व शटल कॉक म्हणजेच बॅडमिंटनमधील फुल ला त्या रॅकेट ने इकडून तिकडे मारतात. बॅडमिंटन मधील फुल अतिशय कमी वजनाचे असते त्याचे वजन 100 ग्रॅम पर्यंत असू शकते. या खेळात जास्त नियम राहत नाहीत म्हणून कोणीही याला खेळू शकतो.  बॅडमिंटन खेळण्यासाठीचे मैदान दोन भागात विभागले जाते. मैदानाच्या मधोमध एक जाळी लावली जाते.


भारतात बॅडमिंटन हा क्रिकेट नंतर दुसरा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. बॅडमिंटन खेळाची सुरुवात इंग्लंडमधून झाली आहे. वर्तमानात पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, पी. गोपीचंद, श्रीकांत किडांबी, पी कश्यप हे भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत. या खेळाडूंनी भारतासाठी अनेक मेडल्स जिंकलेले आहेत. या खेळाला मुले व मुली दोघी खेळू शकतो व यामध्ये दुखापत होण्याची शक्यता पण खूप कमी असते. 


बॅडमिंटन खेळताना लागते इकडून तिकडे पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, शरीर तंदुरुस्त राहते. बॅडमिंटन खेळला नाही शरीरातील रक्तस्त्राव व्यवस्थित हो लोक प्रतिरोधक क्षमता वाढते. बॅडमिंटन आपल्या शरीर व मनाला नवीन ऊर्जा प्रदान करतो. म्हणून सर्वांनी दररोज थोडा वेळ काढून बॅडमिंटन खेळायला हवे.

Download essay PDF here-

Download Pdf

माझा आवडता खेळ बॅडमिंटन निबंध व्हिडिओ पहा-

  • अधिक वाचा-
  1. माझा आवडता खेळ खोखो.
  2. माझा आवडता खेळ कबड्डी.
  3. माझा आवडत खेळ फुटबॉल 


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने