मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ क्रिकेट (Cricket Nibandh Marathi). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू....
majha avadta khel cricket |
माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध (Maza Avadta Khel Cricket).
खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले.
क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघी टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू दररोज संध्याकाळ होई पर्यन्त असे पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. दोन्ही संघामध्ये 11-11 खेळाडू असतात. क्रिकेट मध्ये दोन अंपायर असतात, अंपायर टॉस करणे तसेच निर्णय देण्याचे काम करतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वानाच आवडतो.
क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोघी टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम ला अतिरिक्त रन दिले जातात. बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू पिच वर थांबतात. व बॉलिंग टाकणाऱ्या संघाचे खेळाडू संपूर्ण मैदानात चारही बाजूनां उभे राहतात. नंतर बॉलिंग करणाऱ्या संघातून एक खेळाडू बॉल समोर बॅट्समन च्या दिशेला फेकतो. बॅटिंग करणारा खेळाडू बॅट ने बॉल ला मारून चौकार किंवा षटकार मारतो. अश्या पद्धतीने रन एक एक करून दोघी टीम बॅटिंग आणि बॉलिंग करतात. व शेवटी ज्याचे रन जास्त तो संघ जिंकतो.
भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत. पण आजही सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चे भगवान म्हणून ओळखले जाते. क्रिकेट प्रेमी साठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो.
समाप्त
क्रिकेट खेळाबद्दल महत्वाची माहिती
- क्रिकेट हा मोकळ्या मैदानात खेळला जाणारा एक खेळ आहे. या खेळाला खेळण्यासाठी बॅट आणि बॉल चा वापर केला जातो. क्रिकेट भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे.
- क्रिकेटची मॅच मोकळ्या मैदानात खेळली जाते. याला खेळण्यासाठी आयताकृती मैदान आवश्यक असते.
- क्रिकेटमध्ये दोन संघ असतात, या दोन्ही संघात 11-11 खेळाडूंचा समावेश असतो. प्रत्येक संघाला बॅटिंग बॉलिंग करण्याची संधी मिळते.
- क्रिकेटची मॅच सुरू होण्याआधी अंपायर टॉस करतो. व टॉस जिंकणारा संघ बॅटिंग करावी की बॉलींग हे ठरवतो.
- बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दोन खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानात प्रवेश दिला जातो. बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतो. तर बॉलिग करणारा संघ जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करतो.
- क्रिकेट सामन्यात दोन अंपायर असतात. अंपायर द्वारे देण्यात आलेला निर्णय प्रत्येक संघाला मान्य करावा लागतो.
- क्रिकेट ची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मध्ये झाली होती.
- भारतात क्रिकेट अतिशय प्रसिद्ध झालेला खेळ आहे. अनेक मुले गल्ली, रस्त्यावर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात.
तर मित्रांनो या लेखात मी तुम्हाला cricket essay in marathi म्हणजेच क्रिकेट मराठी निबंध दिलेला आहे. या शिवाय क्रिकेट खेळाची मराठी माहिती पण देण्यात आली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद..