माझे आवडते पुस्तक निबंध | my favourite book essay in marathi
माझे आवडते पुस्तक श्यामची आई | Maze avadte pustak shyamchi aai
मला पुस्तके वाचायला खूप आवडते, पुस्तक वाचन हा माझा छंद आहे. तसे पाहता आज पर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यातील काही पुस्तके मला खूपच आवडली आहेत. मला आवडणाऱ्या अश्याच पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे 'श्यामची आई'. या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपल्या साने गुरुजींनी लिहिले आहे. श्यामची आई ही सानेगुरुजींचे आत्मकथा आहे. या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता मांडली आहे. या पुस्तकाच्या आजपर्यंत तीन लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
स्वातंत्र्य युद्धातील साने गुरुजींच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. साने गुरुजी यांनी आपले बरेच लेखन तुरुंगात असताना केले. श्यामची आई हा कथासंग्रह त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपवला. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी 'ममतेचा महिमा' गायला आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रणही यात केले. साने गुरुजी साठी त्यांची आई गुरु आणि कल्पतरू होती. "गाईगुरांवर, फुलपाखरांवर, झाडांमाडावर प्रेम करायला तिने त्यांना शिकवले.
आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला चांगली माहीत होती. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकात केले आहे. गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीची भावना त्यांच्यात व त्यांच्या भावंडात निर्माण केली. या संस्कारामुळे चंद्र सूर्यासारखी तेजस्वी फुले साने गुरुजीच्या रुपाने उमलली.
श्यामची आई पुस्तकातील एक एक शब्द स्फूर्तीमय आहे तो मनाला उभारी देऊन जातो. साने गुरुजींचा श्याम आणि त्यांची आई हे घराघरात आदर्श मानले गेले आहेत. आज जरी श्यामची आई मधील श्याम पडद्याआड गेला असेल तरी या पुस्तकाला वाचून नवीन श्याम तयार होत आहेत. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आपल्या आयुष्यात एकदा तरी श्यामची आई वाचण्याचा सल्ला देतों.
--समाप्त--
माझे आवडते पुस्तक अग्निपंख | my favourite book essay in Marathi
मी वाचलेल्या व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव अग्निपंख आहे. हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे. अग्निपंख ही एपीजे अब्दुल कलाम यांची आत्मकथा आहे. या पुस्तकात अब्दुल कलाम यांच्या बालपणापासून तर राष्ट्रपति पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास रचण्यात आला आहे. डॉक्टर अब्दुल कलाम भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञापैकी एक आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये महत्त्वाचे योगदान दिले. भारताची सैन्य क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी अनुचाचणी घेतली म्हणूनच त्यांना मिसाईल मेन म्हणूनही संबोधले जाते. 2002 सालापर्यंत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते. म्हणूनच त्यांना भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवडण्यात आले.
अग्निपंख या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यांचे बालपणाचे जीवन ते राष्ट्रपती पदासाठी करण्यात आलेली निवड पर्यंतचा संपूर्ण जीवन परिचय रेखाटला आहे. या चारित्र्याची सुरुवात एका लहान मुलापासून होते जो नंतर इन्स्त्रो चा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती बनतो. मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्तीच आवडले कारण या धड्यांमध्ये भारताच्या 1930-1950 या कालखंडातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म धार्मिक नगरी रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. भारताच्या विभाजनापूर्वी असलेली देशातील धार्मिक एकता आणि एकत्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे.
अब्दुल कलाम यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की लहान असताना त्यांचे स्वप्न पायलट बनण्याचे होते. परंतु पायलट साठी असलेली इंटरव्यू परीक्षा ते अनुत्तीर्ण झाले. परंतु निराश न होता त्यांनी दुसऱ्या क्षेत्रात आपले करियर सुरू केले. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरवातीला विमान बनवण्याचे क्षेत्रात कार्य केले. नंतर ते भारतीय अंतरीक्ष संस्था इस्त्रो कडे वळले. अग्निपंख पुस्तकात अब्दुल कलाम यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेले सॅटॅलाइट आणि मिसाइल कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.
अग्निपंख पुस्तकात फक्त स्वतःचे चरित्र न मांडता, अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांचा देखील समावेश केला आहे. हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख पुस्तक वाचायला हवे. या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे आहेत.
जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो.
***
श्यामची आई पुस्तक खरेदी करा पुढील लिंक वर-