शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते - How to Become Teacher in Marathi : देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाचे खूप मोठे योगदान असते. शिक्षक समाजातील एक महत्वपूर्ण व्यक्ति आणि भविष्यातील अपेक्षित बदलांचे प्रणेते आहेत. शिक्षकांचे काम हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित कामापैकी एक म्हणून ओळखले जाते. एक यशस्वी शिक्षक होणे अनेक तरुणांचे स्वप्न असते व म्हणून शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते यासारखे प्रश्न त्यांना काय, सतावत असतात.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी How to Become Teacher in Marathi म्हणजेच शिक्षक कसे व्हावे आणि शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते याविषयी ची माहिती घेऊन आलेलो आहोत.
भारतात शिक्षक होण्यासाठी, डीएड, बीएड ही किमान आवश्यक पात्रता आहे. त्याशिवाय, शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले पाहिजे. प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा जसे की TET, TGT, PGT इत्यादींना बसावे लागते, ज्या पदासाठी त्यांनी विविध सरकारी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
महाराष्ट्रात शिक्षक होण्याचे टप्पे :
- प्राथमिक शिक्षक होण्यासाठी म्हणजेच १ ली ते ५ वी ला शिकवण्यासाठी D. Ed करणे आवश्यक असते. त्याचबरोबर TET (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे. TET चे सुद्धा i) पेपर १ आणि ii) पेपर २ असे दोन पेपर असतात. यांपैकी पेपर १ उत्तीर्ण असणे आवश्यक असते. म्हणजेच १ ली ते ५ वी ला शिकवण्यासाठी TET पेपर १ + D. Ed उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
- उच्च प्राथमिक शिक्षक म्हणजेच ६ वी ते ८ वी या वर्गाचे शिक्षक व्हायचे असल्यास, D. Ed व TET चा पेपर २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- माध्यमिक म्हणजेच ९ वी ते १० वी या वर्गांना शिकवण्यासाठी B. Ed आणि Graduation पूर्ण असायला पाहिजे. ९ वी ते १० वी या वर्गाचे शिक्षक होण्याकरिता सध्या तरी TET पात्र असणे आवश्यक नाही. परंतु शासनाने या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा विचार केला आहे तर भविष्यात या वर्गांकरिताही TET लागू होण्याची शक्यता आहे.
- उच्च माध्यमिक म्हणजेच ११ वी - १२ वी या वर्गांना शिकवण्याकरीता B. Ed + Graduation + Post-Graduation करणे आवश्यक आहे. याठिकाणी तुमचा graduation व post-graduation चा विषय देखील महत्वाचा आहे. तोच विषय तुम्ही शिक्षक म्हणून घेता. तसेच जर तुम्ही खुल्या वर्गात (Open Category) मध्ये येत असाल तर तुम्हाला graduation ला ५०% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असते. जर तुम्ही अनुसूचित जाती-जमाती मध्ये येत असाल तर ४५% पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे असते.
- वाचा: पायलट कसे बनावे
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test) TAIT :
जर तुम्ही D. Ed, B. Ed, Graduation किंवा Post-Graduation पूर्ण केले असेल तर पुढची पायरी म्हणजे तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT Exam द्यावी लागते. ही परीक्षा २०० गुणांची असते व ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. परीक्षेत जवळपास सगळ्याच विषयांचा समावेश असतो.
आजच्या घडीला महाराष्ट्रात ८ ते ९ लाखांच्या दरम्यान D. Ed आणि B. Ed धारक आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) झाल्यानंतर शासनाकडून शिक्षक भरती जाहीर केली जाते. शासनाचे शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’ नावाचे एक पोर्टल आहे. या पवित्र पोर्टल वर प्रत्येक शिक्षक अभियोग्यता
परीक्षा देणाऱ्या कॅन्डीडेट ला रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी करावी लागते. जो तुमचा शिक्षक अभियोग्यता परीक्षेचा सीट नंबर असतो तो पवित्र पोर्टल वर टाकावा लागतो व एक प्रोफाइल बनवावी लागते. त्याचबरोबर तुमची इतर माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, ईमेल, शैक्षणिक योग्यता इत्यादी द्यावी लागते.
त्यानंतर शासन जेव्हा शिक्षक भरती जाहीर करेल तेव्हा त्यासंदर्भातील माहिती पवित्र पोर्टल वर अपलोड केली जाते. यात तुम्ही पाहू शकता की तुम्ही किती जागांसाठी पात्र आहात. पोर्टल वर जिल्हानिहाय जागाही दाखवल्या जातात. ज्या जिल्ह्याला तुमची पसंती आहे तो तुम्ही निवडू शकता.
यानंतर जेवढ्या लोकांनी पवित्र पोर्टल वर नोंदणी केली आहे त्या सर्वांचा पसंतीक्रम नोंदवला जातो. त्यांपैकी जे उमेदवार मेरिट मध्ये येतात त्यांची नावे पोर्टल वर जाहीर केली जातात. यानंतर संबंधीत उमेदवारांना यासंदर्भातील कल्पना दिली जाते. नंतर उमेदवाराला संबंधीत जिल्हयातील प्राथमिक किंवा माध्यमिक जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊन डॉक्युमेंट्स पडताळणी करून घ्यावी लागते. आणि यानंतर काहीच दिवसांत उमेदवाराकडे नियुक्ती पत्र म्हणजेच अपॉईंटमेंट लेटर येते.
शिक्षक होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
शिक्षक होण्यासाठी खाली काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. तुमच्या स्वप्नांमध्ये यश मिळवण्यासाठी फक्त त्यांचे अनुसरण करा.
- निर्णय घेणे: शिक्षक बनण्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे मोठा निर्णय घेणे. तुम्ही कोणता व्यवसाय निवडला हे महत्त्वाचे नाही, तुम्हाला त्या व्यवसायाच्या सर्व गरजा चांगल्याप्रकारे माहित असायला हव्यात आणि मगच तो व्यवसाय निवडावा. शिक्षकाचे करिअर निवडणे हा एक चांगला पर्याय असेल की नाही हे तुमच्या शालेय शिक्षणावर ठरवा. जर होय, तर कोणत्या विषयात स्पेशलायझेशन फायदेशीर ठरेल याचा विचार करा आणि विषय निवडताना योग्य निर्णय घ्या.
- योग्य विषय निवडा: दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवाराने योग्य विषय निवडायला हवा. जर उमेदवारांना इंग्रजी शिक्षक व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या वरिष्ठ माध्यमिक किंवा पदवीमध्ये कला निवडणे आवश्यक आहे. विषय निवडल्यानंतर उमेदवारांना त्या विषयाचा कंटाळा येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
- प्रवेश परीक्षेची तयारी: 10+2 पूर्ण केल्यानंतर उमेदवार शिक्षक म्हणून करिअर करण्यासाठी TET किंवा CTET सारख्या B. Ed प्रवेश परीक्षेची तयारी करू शकतात. पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवार प्रवेश परीक्षेची तयारी देखील करू शकतात.
- योग्य महाविद्यालय निवडणे: सरकारी शाळा/महाविद्यालयात शिक्षक बनण्याचे उद्दिष्ट असलेले उमेदवार B. Ed/M. Ed साठी बसू शकतात. सरकारी संस्था/कॉलेजमधून शिक्षण घेतल्याने उमेदवारांना कॉलेजच्या वातावरणाची माहिती मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर: प्रवेश परीक्षेसाठी पात्र होणे ही शिक्षक होण्याच्या दिशेने पहिली पायरी आहे. पण मुख्य प्रवास हा कोर्स करताना किंवा शिकवताना सुरू होतो. विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी उमेदवार पुढे डॉक्टरेट प्रोग्राम देखील करू शकतात.
- वाचा: वकील कसे बनावे
शिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये:
शिक्षक होण्यासाठी काही आवश्यक कौशल्ये तुमच्याकडे असली पाहिजेत.
क्रिटिकल थिंकिंग
संस्थात्मक कौशल्ये
टीम वर्क
संयम
सर्जनशील विचार करण्याची क्षमता
नेतृत्व कौशल्ये
शिक्षक होण्याचे फायदे:
शिक्षक असणे ही एक खूप उत्तम गोष्ट आहे. शिक्षक अनेकांना प्रेरणा देतात व अनेकांसाठी प्रेरणा बनतात. जर तुम्हाला इतरांना प्रेरित करणे आवडत असेल तर शिक्षक होणे हा एक उत्तम पर्याय आहे.
- शिक्षक होणे हे एक फायद्याचे करिअर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात एक प्रभावशाली भूमिका बजावतात.
- शिक्षक म्हणून करिअर निवडल्याने पुढच्या पिढीला घडवून समाजावर प्रभाव पाडण्याचा विशेषाधिकार तुम्हाला मिळतो. शिक्षक केवळ शैक्षणिक अभ्यासच शिकवत नाहीत तर जीवनाचे धडेही शिकवतात.
- सरकारी शाळा/महाविद्यालयांमध्ये नोकरीत स्थिरता असते. उमेदवारांना त्यांच्या नोकरीच्या पुष्टीकरणाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, एकदा त्यांनी प्रवेश परीक्षेद्वारे स्थान मिळवले की ते जोपर्यंत नोकरी सोडत नाहीत तोपर्यंत नोकरी न जाण्याची हमी असते.
- शिकवण्याच्या नोकरीमुळे उमेदवारांना आजीवन शिकण्याची संधी मिळते. त्यांना त्यांच्या विशेष विषयात सखोल ज्ञान मिळू शकते किंवा ते वेगवेगळे विषयही शिकू शकतात.
- शिक्षकाच्या नोकरीमुळे दीर्घ सुट्ट्या (उन्हाळ्याच्या सुट्या) आणि शिकवण्याचे लवचिक तास मिळतात. शिक्षकाचे करिअर निवडत असताना, उमेदवारांना इतर खाजगी नोकऱ्यांप्रमाणे त्यांच्या सुट्ट्यांची काळजी करण्याची गरज नाही. भारतीय सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांनुसार सुट्ट्या उपलब्ध असतात.
आशा आहे की शिक्षक होण्यासंदर्भातील ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरली असेल. जर शिक्षक होण्यासाठी काय करावे लागते या विषयी आपल्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कमेन्ट मध्ये विचारू शकतात. धन्यवाद..