जल प्रदूषण मराठी माहिती | Jal Pradushan Information Marathi

पृथ्वीवर जल अर्थात पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत आणि पृथ्वीवरील एकूण जागेपैकी 71% जागा पाण्याने व्यापलेली आहे. परंतु यातील फक्त 3% पाणी पिण्यायोग्य आहे. 68% पाणी हे समुद्रातील खारे पाणी आहे. परंतु आज जल प्रदूषणामुळे फक्त 1% पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य उरले आहे. आजच्या या लेखात आपण जल प्रदूषण मराठी माहिती मिळवणार आहोत. ही Jal pradushan information in Marathi आपण आपल्या शाळा कॉलेजमधील प्रोजेक्ट साठी वापरू शकतात. 


jal pradushan mahiti marathi, water pollution in marathi

जल प्रदूषण काय आहे?

ज्यावेळेस स्वच्छ पाण्यात बाहेरील दुषित तत्व प्रवेश करून पाण्याला प्रदूषित करतात तेव्हा या प्रक्रियेला जल प्रदूषण म्हटले जाते. बाहेरून पाण्यात प्रवेश करणाऱ्या या हानिकारक पदार्थांना जल प्रदूषक (water pollutant) म्हटले जाते. 


आज आधुनिकीकरणामुळे जल प्रदूषण वाढले आहे. नदी, तलाव, समुद्र इत्यादीं मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व विषारी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ पाण्यात प्रवेश केल्यावर त्यात मिसळतात किंवा जसेच्या तसे पाण्याखाली जाऊन बसता. विषारी पदार्थांमुळे पाण्याची गुणवत्ता कमी होते व हे प्रदूषित पाणी पिल्याने अनेक रोग वाढायला लागतात.


जल प्रदूषणाचे कारणे

कारखान्याचा कचरा

औद्योगिक कामकाज मध्ये बऱ्याचदा कचरा नदी किंवा गोड पाण्याचा पुरवठ्यात टाकला जातो. विषारी रसायने पाण्यात मिसळल्याने पाण्याच्या रंग बदलतो, पारा, एस्बेस्टा, शिसे, नायट्रेट इत्यादी रसायनांमुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते.

खनन कार्य- खनन कार्यामध्ये दगड फुटणे कोळसा निघणे यासारखे कार्य होतात यामधून हानीकारक पदार्थ बाहेर येतात जे पाण्यात मिसळल्यावर पाणी प्रदूषित करतात. 

जीवाश्म इंधन जाळणे- पेट्रोल-डिझेल यासारखे इंधन जळाल्यावर त्यातून हानिकारक धुके निर्माण होते. ज्यामुळे ढगातील पाणी प्रदूषित होऊन एसिड रेन येणे अश्या समस्या निर्माण होतात. 

वायू प्रदूषण बदल मराठी माहिती वाचा येथे 


शेतीतून निघणारा कचरा

शेतीतून निघणारा कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण करीत असतो. आज-काल शेतकरी पिकावर कीटकनाशके आणि प्राण्यांची विष्ठा खत म्हणून टाकतात. परंतु ज्यावेळी पाऊस येतो तेव्हा पिकावरील कीटकनाशके व जनावरांचा कचरा धुतला जातो आणि पाण्यासोबत वाहत हा कचरा जवळील नदी किंवा इतर पाण्याच्या स्त्रोतांना जाऊन प्रदूषित करतो. 


घरगुती सांडपाणी

मोठ्या प्रमाणात सांडपाणी हे घरातील बाथरूम, शावर व संडास मधून येते. याशिवाय इतर लहान-मोठे व्यवसाय व कारखान्यांमधूनही सांडपाणी निर्माण होते. सांडपाण्यातील जवळपास 80 टक्के पाणी परत वापर न होता स्वच्छ पाण्याच्या स्त्रोतांना जाऊन प्रदूषित करते.


जल प्रदूषणाचे प्रभाव 

भारतात दरवर्षी हजारो लोक दूषित पाणी पिल्याने मृत्युमुखी पडतात. दूषित पाण्यामुळे कोलेरा, डायरिया टायफाईड व पोलिओ इत्यादी रोग होतात. 


प्रदूषित पाण्याच्या निसर्गावरही विपरीत परिणाम होतो. दूषित पाणी मिळाल्याने प्राणी व झाडे नष्ट होतात. संशोधनातून लक्षात आले आहे की दूषित पाण्याने वाढलेली झाडे ऑक्सिजन कमी प्रमाणात निर्माण करतात. 


Jal pradushan mahiti marathi

जल प्रदूषण कमी करण्याचे उपाय

  • कीटकनाशकांच्या उपयोगावर बंदी लावायला हवी. नैसर्गिक कीटकनाशके व फक्त कीटकांचा विनाश करणारे कीटकनाशक वापरायला हवे.
  • कचरा व सांडपाणी पाणी व नदीत सोडण्याऐवजी शहराबाहेर खोल खड्डे करून त्यात टाकायला हवे.
  • मेलेले प्राणी तसेच चीतेची राख नदीत टाकायला नको. 
  • नदी तलाव मध्ये शौच, घरेलु कचरा, मुर्त्या, पूजन सामग्री, मृत शव इत्यादी टाकण्यावर बंदी आणायला हवी. 
  • कारखान्याचे प्रदूषित पाणी कुंडे करून त्यात सोडायला हवे. 
  • घरातील सांडपाण्याचा जास्तीत पुनर्वापर करायला हवा. आंघोळीसाठी शॉवर चा वापर न करता बादली व मग वापरावा.
  • झाडे हे सर्वच प्रकारचे प्रदूषण कमी करण्यात सहाय्य करतात. यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करा.
  • आपल्या घराजवळ असलेल्या नद्या व समुद्र किनारे स्वच्छ करण्यात सहाय्य करा.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने