ध्वनि प्रदूषण मराठी माहिती प्रकल्प Dhwani Pradushan in Marathi Mahiti
आज पृथ्वीवर वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वामध्ये प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. आजच्या या लेखात आपण ध्वनि प्रदूषण मराठी माहिती व ध्वनि प्रदूषण उपाय इत्यादी मिळवणार आहोत.
मनुष्याची आवाज ऐकण्याची क्षमता किती असते ?
एका सामान्य मनुष्याची आवाज ऐकण्याची क्षमता 80 डेसिबल पर्यंत असते. या पेक्षा जास्त आवाज मनुष्य अधिक वेळापर्यंत ऐकू शकत नाही. 80 डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकल्याने डोके दुखणे व स्वास्थ खराब होऊ शकते आणि जर हाच आवाज 130-140 डेसिबल झाला तर कानाचे विकार होऊन कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.
ध्वनी प्रदुषण वाढवणारे साधन
- गाड्या मोटारी मधून निर्माण होणारे प्रदुषण
आज रस्त्यावर चालणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण निर्माण करीत आहेत. गाड्यांच्या इंजिन व हॉर्न च्या आवाजाने कर्कश ध्वनी निघतो. ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. गाड्या मोटारीऐवजी लाऊड स्पीकर, कारखाने व मशीनी मधून निघणार्या आवाजामुळे सुद्धा ध्वनी प्रदुषण होत असते.
- विमानामुळे वाढणारे ध्वनी प्रदुषण
वेगवेगळ्या विमानांमधून वेगवेगळे ध्वनी प्रदूषण निर्माण होते. विमानामुळे सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होते, प्रथम ज्यावेळी विमान उडण्यासाठी तयार होत असते तेव्हा, नंतर जेव्हा विमान आकाशात उडत असते तेव्हा व ज्यावेळी विमान एअरपोर्टवर उतरते असते त्यावेळी त्याच आवाज एअरपोर्टच्या शंभर वर्ग किलोमीटरपर्यंत प्रदूषण पसरवतो.
- मनोरंजनाने होणारे ध्वनी प्रदूषण
आजकाल पाहिले जात आहे की जेव्हाही घरात किंवा समाजात काही आनंदाचा क्षण असेल तेव्हा लोक फटाके फोडून आनंद साजरा करतात. धार्मिक सण जसे दिवाळी, ईद, क्रिसमस, नवीन वर्ष इत्यादी दिवशी ही फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण सोबत वायू प्रदूषण ही वाढत आहे.
ध्वनी प्रदूषणाचे प्रभाव
प्रदूषण मनुष्याला अनेक प्रकारांनी प्रभावित करते. अत्याधिक आवाजामुळे डोकेदुखी, थकवा, अनिद्रा, श्रवण क्षमतेत कमजोरी, चिडचिडेपणा, उत्तेजना, आक्रोश इत्यादी त्रास होऊ शकतात.
अती आवाजामुळे गर्भवती महिलांचा गर्भपात पण होऊ शकतो.
ध्वनी प्रदुषण कमी करण्याचे उपाय मराठी
- सर्वात आधी ध्वनी प्रदूषणाने होणारे नुकसान जास्तीतजास्त लोकांच्या लक्षात आणून द्यायला हवे.
- कर्कश आवाज करणाऱ्या मशीन व उपकरणांच्या निर्माण करण्यावर बंदी लावायला हवी.
- कारखान्यांना शहरी भागापासून दूर स्थापित करायला हवे.
- जास्त आवाज करणाऱ्या मशीनीनां ऍकॉप्रूफ म्हणजेच आवाज रोखून ठेवणाऱ्या खोलीमध्ये ठेवायला हवे.
- वाहनांचे हॉर्न मोठ्या आवाजात वाजवण्यावर बंदी आणायला हवी व वाहनांमध्ये सायलेन्सर चा उपयोग करायला हवा.
- वाहनांची गती कमी करायला हवी. मोठ्या गाड्यांना अधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणावर जाण्यापासून रोखायला हवे.
- औद्योगिक भागात जास्तीत जास्त वृक्षारोपण करायला हवे. झाडे आवाजाला शोषून प्रदूषण कमी करतात.
- अधिक वाचा