होळी सणाची माहिती मराठी : होळीचा सण रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो. होळी हा वसंत ऋतूत येणारा एक महत्त्वपूर्ण भारतीय सण आहे. होळीचा सण मराठी कॅलेंडर नुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
भारत, नेपाळ सह विश्र्वभरात साजरा केला जाणारा होळी सणाची माहिती (Holi Festival Information in Marathi) आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
होळी चा सण कसा साजरा केला जातो?
रंगांचा सण म्हणून ओळखला जाणारा होळी हा सण दोन दिवसांचा असतो. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. या दिवशी रात्री लोक आपल्या परिसरातील एका मोकळ्या जागी एकत्रित होतात आणि एकमेकांवर लाकडे रचून त्यांची होळी तयार करतात. या होळीची पूजा करून त्यात अग्नी लावली जाते. याच अग्नीत धान्य जसे गहू, तांदूळ इत्यादी टाकले जाते व शेतातील पिकांच्या वाढीसाठी शेतकरी द्वारे प्रार्थना केली जाते.
होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो, यालाच धुलेंडी देखील म्हटले जाते. हा दिवस रंगांचा दिवस असतो. या दिवशी लोक एकमेकांवर रंग व पाणी टाकतात व आनंद साजरा करतात. मित्र मंडळी घरोघरी जाऊन एकमेकांना रंग लावतात याशिवाय पिचकारी आणि पाण्याचे भरलेले फुगे देखील एकमेकांवर टाकले जातात. अशा पद्धतीने रंगपंचमी खेळली जाते. यादिवशी एकमेकांमध्ये असलेली कटुता विसरून पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले जातात.
होळीचा इतिहास व होळी का साजरी केली जाते?
होळीच्या सणाविषयी अनेक कथा इतिहासात प्रसिद्ध आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे प्राचीन काळातील होलिका दहन शी जुळलेली कथा होय. या कथेनुसार प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक बलशाली व अत्याचारी दैत्य राजा होता. हिरण्यकश्यपाचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णुभक्त होता व तो कायम विष्णू भक्तीत लीन असायचा. राक्षस कुळातील असताना भगवान विष्णूंची आराधना करणे हिरण्यकश्यप ला मान्य नव्हते व म्हणून त्याने आपल्या मुलाला विष्णू भक्तीपासून प्रवृत्त करण्याचे अनेक प्रयत्न केले.
परंतु शेवटी जेव्हा अनेक प्रयत्न करूनही प्रल्हाद ने विष्णू भक्ती सोडली नाही, तेव्हा मात्र हिरण्यकश्यप ने त्याला जीवे मारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्याने आपली बहिण होलिका ची मदत मागितली. होलिका राक्षस कुळातील असल्याने तिला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. प्रल्हाद ला मारण्यासाठी ती त्याला घेऊन अग्नीत जाऊन बसली. परंतु भगवान विष्णू यांच्या कृपेमुळे प्रल्हाद जिवंत वाचला व होलिका त्या अग्नीत जळाली.
यानंतर हिरण्यकश्यपला समाप्त करण्यासाठी भगवान विष्णू यांनी नरसिंग अवतार घेतला आणि क्रूर दैत्य राजा हिरण्यकश्यप याचा नाश केला. होळी च्या दिवशी दृष्ट स्वरूपातील होलिका राक्षसीचा वध केल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी रंग लावून रंगपंचमी खेळण्याची प्रथा सुरू झाली.
२०२४ साली होळी केव्हा आहे?
2024 यावर्षी होळीचा सण हा 24 मार्च ला येत आहे. व धुलीवंदन(रंगपंचमी) याच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला 25 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
FAQ
होळी का बनवले जाते?
होळीच्या दिवशी लाकडांची होळी बनवून त्याला अग्नि दिली जाते. प्राचीन काळातील कथेनुसार होलिका नावाची एक रक्षसीणी, विष्णु भक्त प्रल्हाद ला मारण्यासाठी त्याला सोबत घेऊन अग्नीत प्रवेश करते, परंतु भगवान विष्णु यांचे कृपेने भक्त प्रल्हाद वाचतो व होलिका त्या अग्नीत जळून भस्म होते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळी बनवली व पेटवली जाते.
होळी हा सण किती तारखेला आहे?
2024 साली होळीचा सण 24 मार्च ला आहे व याच्या दुसऱ्या दिवशी 25 मार्च ला धूलिवंदन आहे.
होळी हा सण कसा साजरा करतात?
होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. यादिवशी एकमेकांवर लाकडे रचली जातात आणि त्यांना अग्नि लावली जाते. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा असतो. दिवशी लोक एकमेकांवर रंग व पाणी टाकतात व आनंद साजरा करतात.
आम्ही आशा करतो की वरील लेखातील होळी सणाची मराठी माहिती - Holi Festival Information in Marathi आपणास उपयोगाची ठरली असेल. जर आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला कमेन्ट मध्ये विचारू शकतात व याशिवाय जर आपण आपल्याकडे असणारी अधिक माहिती शेअर करू इच्छिता तर ती देखील पाठवू शकतात. धन्यवाद...
इतर लेख: