आजच्या लेखात आपण फुटबॉल खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत. फुटबॉल अतिशय रोमांचकारी व कौशल्यपूर्ण खेळ आहे पुढील Football Information in marathi mahiti आपण लक्षपूर्वक अभ्यासा.
एका सर्व्हेनुसार लक्षात आले आहे की फुटबॉल हा जगातील सर्वात जास्त पसंत केला जाणारा खेळ आहे. जगभरातील तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांचा आवडता खेळ फुटबॉल हाच आहे. हा खेळ भारतासह अनेक देशात खेळला जातो. परंतु ब्राझील, स्पेन, फ्रान्स, अर्जेंटिना इत्यादी देशात या खेळाविषयी विशेष आकर्षण दिसून येते. फुटबॉल हा खेळ अमेरिका आणि कॅनडा या देशात विशेष लोकप्रिय आहे.
फुटबॉल खेळाची माहिती व इतिहास - Football information in Marathi
फुटबॉल शब्दाचा उगम कुठून झाला या विषयी लोकांमध्ये वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचे मानणे आहे की या खेळात चेंडूला पायाने मारले जाते यामुळे या खेळाला फुटबॉल म्हटले जाते. परंतु या खेळाला हे नाव कुठून देण्यात आले याबद्दल पक्की माहिती उपलब्ध नाही. परंतु फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय संघटन फिफा च्या माहितीनुसार फुटबॉल हा चिनी खेळ सुजू चे विकसित रूप आहे. हा खेळ चीनमध्ये 'ह्यां' वंशाच्या काळात विकसित झाला होता. फुटबॉल खेळायला जपानमध्ये असुका वंशाच्या शासन काळात खेळले जायचे. त्यानंतर इसवीसन 1586 मध्ये जॉन डेविस नावाच्या एका जहाज कप्तान द्वारे हा खेळ ग्रीनलँड मध्ये खेळला गेला.
भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले त्यांचे नाव 'नागेन्द्र प्रसाद सर्वाधिकारी' आहे. त्यांना 'भारतीय फुटबॉल चे जनक' म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.
फुटबॉल खेळाचे स्वरूप
फुटबॉल खेळाच्या दोन टीम असतात प्रत्येक टीम मध्ये 11-11 खेळाडू असतात. एक सामना 90 मिनिटांचा असतो. यादरम्यान 45 मिनिटांवर एक 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. प्रत्येक टीम चे एक गोल पोस्ट असते आणि खेळताना फुटबॉल ला पायाने मारून दोघीही टीम चा उद्देश विरुद्ध पक्षाच्या पोस्टमध्ये जास्तीत जास्त गोल करणे हा असतो. जर खेळादरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याला 'इंजरी टाईम' म्हणून काही वेळ खेळ थांबवण्यात येतो.
फुटबॉल चा चेंडू
सुरुवातीच्या काळात फुटबॉल प्राण्यांच्या मूत्राशया पासून बनवण्यात यायचा. परंतु नंतरच्या काळात यात प्राण्यांची चामडी वापरली जाऊ लागली, ज्यामुळे फुटबॉलच्या आकार निश्चित झाला. आधुनिक काळात विज्ञान विकसित झाल्याने बऱ्याच फुटबॉल कंपन्या स्थापित झाल्या व मॅच, खेळाडू व मैदान इत्यादी गोष्टींना लक्षात घेऊन वेगवेगळे फुटबॉल तयार होऊ लागले. सामान्यता फुटबॉलचा परीघ 58 सेंटीमीटर पासून 61 सेंटीमीटर पर्यंत असतो.
फुटबॉल खेळाचे मैदान - Football ground information in Marathi
फुटबॉल चे मैदान 100 मी, 64 मी पासून तर 110 मी, 75 मी पर्यंत चे आयताकार मैदान असते. मैदानाच्या लांबीला 'साइड लाइन' तर रुंदीला 'गोल लाईन' म्हटले जाते. मैदानाच्या मधोमध एक रेघ असते ही रेघ मैदानाला दोन भागात विभाजित करते. दोघी मैदानांच्या शेवटी 7.32 मीटर रुंद गोल क्षेत्र असतात.
फुटबॉल खेळाचे नियम - Rules of playing Football in Marathi
- फुटबॉल च्या खेळात दोन संघ व दोन गोल पोस्ट असतात. प्रत्येक संघाचा उद्देश विरोधी पक्षाच्या गोल पोस्टमध्ये फुटबॉल पाठवणे असतो.
- फुटबॉल च्या प्रत्येक टीममध्ये 11 - 11 खेळाडू असतात.
- फुटबॉलचा खेळ 90 मिनिटाचा असतो, ज्यात 45 मिनिटांनंतर एक ब्रेक होतो.
- या खेळात जो संघ सर्वाधिक गोल करतो तो विजयी ठरतो.
- तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य होईल की जगातील 80 टक्के फुटबॉल हे पाकिस्तान मध्ये तयार होतात.
- आतापर्यंत 22 फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आले आहेत.
- फुटबॉल चा प्रथम विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता व आतापर्यंत सर्वात जास्त 5 फुटबॉल विश्व चषक जिंकणारा देश ब्राझील आहे.
- विश्वचषकात फक्त 32 संघ देश भाग घेतात तर जगभरातील 211 देशांमध्ये फुटबॉल खेळले जाते.
- जगभरातून फुटबॉल विश्वचषक 100 करोड पेक्षा जास्त लोक पाहतात.
- फुटबॉल खेळाच्या एक सामन्या दरम्यान एक खेळाडू जवळपास 15 किलोमीटर पर्यंत पळत असतो.
भारतीय फुटबॉल खेळाडूंची नावे
भारतातील काही प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे आहेत -
- सुनील चेतरी
- भाईचुंग भूतीया
- संदेश झिंगण
- गुरप्रीत सिंह संधु
- जेजे लालपेखलूया
- जंकीचंद सिंग
- धीरज सिंग
- प्रणय हलदर
- उदंता सिंह
फुटबॉल हा खेळ कोणत्या देशात लोकप्रिय आहे?
सर्वेक्षणातून लक्षात आले आहे की यूनायटेड स्टेट्स आणि कॅनडा या दोन देशांमध्ये फुटबॉल खेळाचे सर्वाधिक चाहते आहेत. परंतु दिवसेंदिवस या खेळाची लोकप्रियता वाढीत आहे म्हणून आता US आणि कॅनडा च्या पाठोपाठ मेक्सिको, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांमध्ये देखील फुटबॉल च्या चाहत्यांची संख्या वाढीत आहे.
भारतात फुटबॉल खेळाची सुरुवात केव्हापासून झाली ?
भारतात सर्वप्रथम फुटबॉल चा खेळ 1900 च्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटिश सैनिकांद्वारे खेळण्यात आला व येथूनच भारतीयांना फुटबॉल खेळाची ओळख होऊ लागली.
फुटबॉल संघात किती खेळाडू असतात?
फुटबॉल च्या प्रत्येक संघात 11-11 खेळाडू असतात.
निष्कर्ष
तर मित्रहो ह्या लेखात आपण फुटबॉल मराठी माहिती - football information in marathi जाणून घेतली. आशा आहे ही फुटबॉल ची माहिती आपणास उपयोगी ठरली असेल. या महितीला आपले मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे देखील या विषयातील नॉलेज वाढेल आणि त्यांना देखील योग्य माहिती प्राप्त होईल.
अधिक वाचा :
Thank you for information 🙏
उत्तर द्याहटवाThank you so much
उत्तर द्याहटवाNice information sir 😊
Wow nice information,
उत्तर द्याहटवाkeep it up
Best information sir...☺️
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवा