फुलांचे आत्मवृत्त/आत्मकथा मराठी निबंध | Fulache Atmavrutta Marathi Nibandh

फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध - Autobiography of Flower in Marathi: निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर गोष्टी दिल्या आहेत. फुले ही त्यापैकीच एक आहेत. फुलांचे सौन्दर्य पाहतांना व्यक्ति त्यात हरवून जातो. रंगीबिरंगी, सुगंधित फुलांची आवड आपल्याला देखील असलेच.

आजच्या या लेखात आपण फुलांचे आत्मवृत्त/आत्मकथा मराठी निबंध (Fulache Atmavrutta) पाहणार आहोत हे फुलाचे आत्मकथन आपल्याला शाळा कॉलेज मध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल. या लेखात गुलाबाचे एक फूल त्याचे आत्मकथन सांगणार आहे. तर चला Fulache atmavrutta मराठी निबंधब सुरू करूया.


fulache atmavrutta

फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध | Fulache Atmavrutta in Marathi 

(350 words)

मी बागेत फुलणारे एक प्रसिद्ध फुल आहे व तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. मी फुलांचा राजा गुलाब बोलतोय. मी सध्या एका बागेत फुललेलो आहे. माझा जन्म याच उद्यानात झाला होता. 

दोन दिवसांआधी मी पण माझ्या बाजूला असलेल्या या काटेरी आणि कोमल फाद्यांवर माझ्या भावांप्रमाणे झुलत होतो. कळीच्या रूपात स्वताला पाहून मनातल्या मनात विचार करीत होतो की एक दिवस मी पण सुंदर फुल बनेल. आणि वाट पाहता पाहता तो दिवस पण आला मी एक सुंदर फुल बनलो.

माझ्या सुगंधामुळे मधमाश्या व भवरे माझ्या आजूबाजूला गोळा होऊ लागले. सकाळ सकाळी दव बिंदूनी माझी आंघोळ घातली. जोरदार हवेने माझा चेहरा पुसला आणि सूर्याच्या प्रकाशात मी खेळणे शिकलो. वसंत ऋतु मध्ये तर माझी शोभा आणखीनच वाढते. माझ्या चारही बाजूंना गुलाबाचा गुलाब दिसतात. 

या शिवाय उद्यानात असलेले माझे अन्य फुल मित्र चंपा, चमेली, जुही, सूर्यफूल, रातराणी इत्यादी फुले उद्यानाची शोभा आणखीनच वाढवतात. आम्ही सर्वजण उद्यानात येणारे लहान मुले, मोठे व वृद्ध लोकांचे लक्ष खेचून घेतात. जर कोणी मला हात लावण्याची किंवा तोडण्याची चेष्टा केली तर माझे काटे माझे रक्षण करतात. 

मी फक्त मधमाशांना माझा रस देत नाही तर पर्यावरणालाही प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. माझ्या सुगंधाने वातावरणाला सुगंधित व मोहक करून देतो. आजकाल काही लोक मला विनाकारण तोडून घेतात. काही लोक मला तोडून मशीनी मध्ये टाकून देतात. तेथे माझ्या पाकळ्या पासून सुगंधित परफ्यूम व गुलाबजल तयार केले जाते. या सर्व गोष्टींचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात केला जातो.

या शिवाय माझ्या पाकळ्या पासून गुलकंद, शरबत, तेल व आयुर्वेदिक औषधे देखील बनवली जातात. जगभरात 22 सप्टेंबरला तर भारतात 7 फेब्रुवारीला माझ्या सन्मानार्थ 'गुलाब दिवस साजरा' केला जातो.  आपल्या देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या जॅकेटमध्ये नेहमी गुलाबाचे फुल लावत असत. पंडित नेहरूंना लहान मुले आवडत असत. याशिवाय सत्कार समारंभात गुलाबाचेच पुष्प देऊन स्वागत केले जाते. 

मानव जातीसाठी माझे भरपूर उपयोग आहेत. परंतु काही लोक कारण नसताना निर्दयपणे मला तोडून टाकतात. मला तोडल्यावर मी हळू हळू सुकू लागतो. म्हणून जर तुम्ही दुरूनच माझ्या सुंदरतेचा आस्वाद घ्याल तर मला खूप आनंद होईल.

***


फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध | Autobiography of Flower in Marathi | Fulache Atmavrutta

 Fulache Atmavrutta (250 words)

मी एक फूल आहे. मला पाहून प्रत्येकाचे मन मोहित होते. लोक मला अनेक नावांनी ओळखतात जसे चमेली, झेंडू, गुलाब, कमळ, सुर्यफुल, चंपा, मोगरा, जास्वंद इत्यादी. माझे अस्तित्व तेव्हापासून आहे जेव्हा या निसर्गाची निर्मिती झाली होती. मी निसर्गाची एक सुंदर कृती आहे, माझा सुगंध लोकांना खूप आवडतो.

मी तेव्हापासून आहे जेव्हापासून परमेश्वर आहे. कारण परमेश्वराची पूजा मलाच चढवून केली जाते. मी पृथ्वीवरील प्रत्येक कानाकोपऱ्यात सापडतो. जेव्हा मी वाऱ्याच्या वेगाने हलतो तेव्हा माझे सुंदर रूप पाहून प्रत्येक जण मंत्रमुग्ध होतो. सुगंधाची उत्पत्ती माझ्यापासून याच्या झाली आहे. माझ्यावर साक्षात देवी लक्ष्मीचा निवास आहे. मी बागेत बहरणारा फुल आहे सर्वजन माझ्या रंगांनी परिचित आहेत.

आज मी अनेक लोकांसाठी रोजगाराचे साधन बनलो आहे. माझे सौंदर्य वेगळेच आहे, मी सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत स्वतःला मोकळे करून फुलतो. माझे सौंदर्य पाहून लोक माझ्याकडे आकर्षित होतात. माझ्या पाकळ्या अतिशय मऊ व मुलायम असतात, आणि माझ्या मधून वेगवेगळ्या प्रकारची सुगंधित स्मेल येते. परंतु जेव्हा लोक मला विनाकारण तोडतात तेव्हा मला खूप दुःख होते ते मला तोडून थोडा वेळ वापरून फेकून देतात. 

या जगात माझे आयुष्य खूप कमी दिवसांचे असते, परंतु तरीही मी आनंदित राहतो. दुसऱ्यांच्या चेहर्यायावर आनंद पसरवण्याचे कार्य मी करतो. मी प्रत्येकाच्या सुख-दुःखात कामी येतो. जेव्हा महान लोकांचा सन्मान केला जातो तेव्हा माझी माळा बनवून त्यांना घातली जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हाही लोक माझा उपयोग करतात. मला परमेश्वराच्या चरणांमध्ये चढवले जाते. मी लाल, हिरवा, गुलाबी, निळा, पांढरा इत्यादी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो. जेव्हा मी फुलतो तेव्हा मधमाश्या व भवरे माझ्यावर येऊन बसतात. मी आयुर्वेदिक औषधी म्हणूनही वापरला जातो. दररोज बाग बगीचा मध्ये फुलून त्यांची शोभा वाढवतो. परंतु जेव्हा मी सुकून जातो तेव्हा मला कचर्‍यात फेकून दिले जाते आणि अशा पद्धतीने माझे अस्तित्व नष्ट होते.

***


फुलांची आत्मकथा निबंध मराठी - Fulache Atmakatha in Marathi

Fulache Atmavrutta (400 शब्द)

मी एक गुलाबाचे फुल होतो. "होतो" हा शब्द मी यासाठी वापरतो आहे कारण मला असे वाटते की मी आता फुल राहिलेलो नाही. आता मी फक्त एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेला प्लास्टिक चा तुकडा बनून गेलो आहे. माझ्या या प्रवासाची कहाणी पुढील प्रमाणे आहे.

माझा जन्म शिमला मधील गुलाबाच्या एका बागेत झाला. त्या ठिकाणी माझ्या आजूबाजूला अनेक फुले होती आणि त्यांना मी माझ्या बंधू प्रमाणे मानत असे. त्या बागेत एक व्यक्ती होते त्यांना आम्ही माळी काका म्हणून ओळखायचो. माळी काका या बागेचा मालक होता. व बागेतील सर्व झाडांची आणि फुलांची काळजी तो घेत असे. माळी काका आम्हाला खूप प्रेम लावायचा. तो बराच वेळ बागेत आम्हाला पाणी देत व आमची काळजी घेत बसायचा. 

दिवसामागून दिवस जाऊ लागले. व मी आता मोठा आणि परिपक्व झालो होतो. एके दिवशी सकाळच्या वेळी माळी काका घाईघाईत पडत आला व त्याने मला आणि माझ्यासोबत च्या इतर गुलाब बंधूंना उचलून एका गाडीत ठेवण्यास सुरुवात केली. आमच्या कुंड्यांसह आम्हाला गाडीत ठेवून शहराकडे नेण्यात आले. शहरात एका फुलांच्या दुकानाबाहेर आमची गाडी थांबली. दुकानातून काही मजुरांनी बाहेर येऊन एक-एक कुंड्या दुकानात नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. मला देखील आत नेण्यात आले व माझ्या इतर बंधू सोबत दुकानाच्या एका मोकळ्या गोडाउन मध्ये नेऊन ठेवण्यात आले. 

संध्याकाळ च्या वेळी दुकानाचा मालक गोदाम मध्ये आला व त्याने आपल्या कामगारांना सर्व गुलाब फुलांना तोडून एकत्रित करण्याचा आदेश दिला. त्याच्या आदेशाप्रमाणे आम्हासर्वांना तोडून एका टोपलीत ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी ही टोपली दुकानात ठेवण्यात आली. हळू हळू लोक येऊ लागले व गुलाबाची फुले खरेदी करू लागले. माझ्या आजूबाजूचे मित्र जाऊ लागले. आणि मग माझी सुद्धा वेळी आली एका व्यक्तीने मला खरेदी केले. व तो मला आपल्यासोबत घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर माझ्या लक्षात आले की सकाळी या माणसाचे त्याच्या बायकोशी भांडण झाले होते व तिला मनवण्यासाठी तो माझी भेट देणार होता. परंतु त्याच्या बायकोचा संताप कमी झालेला नव्हता. जसेही त्याने मला तिच्या हाती दिले तिने तावातावाने खिडकीकडे येत मला बाहेर फेकले.

आता मी रस्त्यावर पडलो होतो. माझ्या आजूबाजूने अनेक गाड्या मोटारी जात होत्या. परंतु नशिबाने मी वाचलो व माझ्यावर कोणतीही गाडी आली नाही. थोड्या वेळाने एका व्यक्तीचे कुत्रे माझ्या जवळ आले. त्याने नाकाने मला सुंगले व यानंतर मला तोंडात धरून तो त्याच्या मालका जवळ घेऊन गेला. मालकाने मला त्याच्या तोंडातून बाहेर काढले आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून आपल्या घराच्या भिंतीवर सजवून दिले. 

आज या गोष्टीला दोन दिवस झाले आहेत व आता हळूहळू माझ्यातील जीव निघत आहे. माझ्या कळ्या सुखत आहेत. मी माझे रोपट्यावरील आनंदाचे दिवस आठवून खूप दुःखी होतो. परंतु पृथ्वीवर जन्मणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंत निश्चित आहे या विचाराने मी स्वतः ला दिलासा देवून शांत करीत असतो.

***

या लेखाद्वारे आम्ही आपल्या सोबत फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध (Fulache Atmavrutta) शेअर केला. या निबंध द्वारे फुलाने त्याची आत्मकथा शेअर केली आहे. आशा करतो की हा निबंध आपल्यासाठी उपयोगी ठरला असेल.

फुलांची आत्मकथा निबंध मराठी - Fulanchi Atmakatha शाळा कॉलेज च्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचा आहे. म्हणून आपण हा निबंध आपल्या मित्र मंडळीसोबतही नक्की शेअर करा. धन्यवाद....


READ More:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने