चिमणी पक्षी मराठी माहिती | Sparrow Information in Marathi

चिमणी ची माहिती मराठी व चिमणी पक्षी मराठी माहिती - Sparrow Information in Marathi

चिमणी म्हणजेच sparrow एक लहान पक्षी असते. ती संपूर्ण आशिया आणि युरोप खंडात आढळते. मागील काही वर्षांपासून शहरी भागातून चिमण्या अदृश्य झाल्या आहेत. परंतु तरीही ग्रामीण भागात अजूनही उत्तम प्रमाणात चिमण्या निवास करीत आहेत. 

आजच्या लेखात आपण चिमणी पक्ष्याची मराठी माहिती- Sparrow Information in Marathi मिळवणार आहोत. चिमणी काय खाते, तिचे पिल्ले, वजन, लांबी, ऊंची इत्यादी माहिती पाहणार आहोत.


Sparrow Information in Marathi

चिमणी ची मराठी माहिती - Sparrow Information in Marathi

चिमणी एक लहान आकाराचा पक्षी असते, चिमण्या संपूर्ण भारतात आढळतात. चिमणी ला इंग्रजी भाषेत स्पॅरो (sparrow) म्हटले जाते. चिमणीचे शास्त्रीय नाव passeridae आहे. जगभरात चिमण्यांच्या जवळपास 24 प्रजाती आढळतात. चिमणी झाडांवर घरटे करून राहते. चिमण्या या प्रामुख्याने समूहात राहतात. दरवर्षी 20 मार्चला विश्व चिमणी दिवस साजरा केला जातो. शहरी व ग्रामीण भागात आढळणाऱ्या चिमण्यांना मनुष्य वस्तीत राहणाऱ्या चिमण्या म्हणून ओळखले जाते याविपरित वनात राहणाऱ्या चिमन्यांना 'वन्य चिमणी' म्हणून ओळखले जाते..


चिमणीची शारीरिक रचना

चिमणी आकारात खूप लहान असते. तिचा रंग भुरा किंवा पांढरा असतो. तिची लांबी 14 ते 16 सेंटीमीटर पर्यंत असते. चिमणी चे वजन जवळपास 25 ते 40 ग्रॅम असते. ती 10000 ते 12000 फूट च्या उंची पर्यंत उडू शकते. चिमणीला एक पिवळ्या रंगाची चोच आणि उडण्यासाठी दोन पंख असतात. तिचा आवाजाला चिव चिव म्हटले जाते. चिमणीचा सरासरी जीवन काळ 4 ते 6 वर्षांचा असतो. तिचा उडण्याचा सरासरी वेग 35 किलोमीटर प्रति तास असतो.  


चिमणी किती अंडी देते ?

चिमणी वर्षभरात जवळपास 3 ते 5 अंडी देते. चिमणीची पिल्ले 13 ते 15 दिवसात घरट्यातून बाहेर पडतात. जोपर्यंत पिल्ले उडण्यायोग्य होत नाही तोपर्यंत त्यांचे आई वडील सोबत असतात. पुढील 15 ते 20 दिवसात ते उडायला लागतात. चिमणीची घरटे नेहमी पुरुष चिमण्या द्वारे बनवले जाते. 


चिमणीचे अन्न  

शहरात व गावात आढळणाऱ्या चिमण्या धान्याचे दाणे तसेच लहान मोठे किडे मुंग्या खातात. 

मांजर, साप, कुत्रे, लांडगे, गरुड इत्यादी मांसाहारी प्राणी चिमणी व तिच्या अंड्यांची शिकार करतात. 

सन 1950 मध्ये चिमण्यामुळे चीन मधील पिकांचे होत असलेले नुकसान पाहून चिनी शासनाने चिमण्यांना मारण्याचे आदेश दिले. या मुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या मारण्यात आल्या. परंतु याचे परिणाम उलट झाले. चीनमध्ये इतर किडे, जीवजंतू आणि मुंग्या ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हे किडे पिकांचे चिमण्या पेक्षा अधिक नुकसान करू लागले. आणि परिणामी चीन मध्ये लोकांना अन्नाची कमतरता व उपासमारीची दिवस आले. तर आशा पद्धतीने निसर्गाचे समतोल राखण्यासाठी चिमण्या तसेच इतर सर्वच पशू पक्षी उपयोगाचे आहेत,


चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे

चिमणी हा जरी छोटासा पक्षी असला तरी निसर्गाचे संतुलन राखण्यात उपयुक्त आहे. आपल्या वातावरणात असलेल्या कीटकांना खाऊन चिमणी नष्ट करते.

परंतु आज शहरी भागात चिमण्या जवळपास विलुप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात त्या अस्तित्वात आहेत. चिमण्यांच्या विलुप्ती मागील मुख्य कारण शहरात तयार होत असलेले मोठ मोठे उद्योगधंदे, कारखाने, वायू प्रदूषण, वृक्षतोड, गाडी मोटारी ची प्रदूषण आणि मोबाईल च्या टॉवर मधून निघणारे हानिकारक किरणे इत्यादि आहेत.

शासनाने चिमण्या व यांच्या सारख्या इतर पशू पक्षांच्या होत असणाऱ्या विलुप्ती कडे विशेष लक्ष द्यायला हवे व यासाठी योग्य पाऊले देखील उचलायला हवीत.  


तर मित्रांनो ही होती चिमणी बद्दलची मराठी माहिती - Sparrow Information in Marathi. तुम्हाला ही चिमणीची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तर या माहिती व्यतिरिक्त आपणास चिमणी विषयी अधिक काही माहीत असेल तर आम्हास कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद..


Read More 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने