ताजमहल मराठी निबंध | Taj Mahal essay in Marathi

मित्रांनो आपली भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरात ओळखले जाणारे ताजमहाल भारताची शान आहे.ताजमहाल मुघल शासक शहजहान याच्या काळात बनवण्यात आले होते. जगातील सात आश्चर्य मध्ये देखील ताजमहाल चा समावेश करण्यात आलेला आहे.

अनेकदा शाळा कॉलेज मध्ये ताज महल विषयी चा निबंध लिहिण्यास सांगितले जाते. आणि म्हणूनच आजच्या या लेखात आपण ताजमहल मराठी निबंध पाहणार आहोत. हा Taj Mahal essay in Marathi आपण आपल्या अभ्यासक्रमात अभ्यासू शकतात. तर चला सुरू करूया.. 




ताजमहल मराठी निबंध - Taj Mahal Essay in Marathi 

जगातील सात आश्चर्यांयमध्ये समाविष्ट असलेले ताजमहाल भारताचे ताज आहे. दरवर्षी जगातील कोण्या लाखो लोक ताजमहाल पाहायला येतात. ताजमहाल देशी विदेशी दोघी पर्यटकांना आकर्षित करते. सफेद संगमरवर पासून बनवलेले ताजमहाल त्याची भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. ताजमहाल ला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. कारण असे म्हणतात की मुघल बादशाह शाहजहान ने आपली पत्नी मुमताज ची आठवण म्हणून हे महाल बनवले होते.

ताज महाल भारताच्या आग्रा शहरापासून पाच किलोमीटर दूर स्थित आहे. यमुना नदी ताजमहाल च्या मागे वाहून निरंतर त्याच्या सुंदरतेचे दर्शन करीत असते. मध्ययुगीन काळात ताजमहाल बनण्याआधी त्या जागी अनेक झाडे होती. एके दिवशी या जागी फिरत असताना शाहजहान ची पत्नी मुमताज ने त्याला सांगितले की माझ्या मृत्यूनंतर माझी आठवण म्हणून येथे एक मकबरा तयार करा. मुमताज ही शहाजहानला आपल्या सर्व पत्नीमध्ये अतिप्रिय होती.

1631 मध्ये शाहजहान ने ताजमहाल च्या निर्माण कार्याची घोषणा केली. 1632 मध्ये ताजमहाल चे निर्माण कार्य सुरू झाले. ताजमहाल तयार करण्यासाठी जवळपास 11 वर्षे लागली. या कार्यात जवळपास 320 लाख रुपये खर्च लागला. ज्याची आजच्या काळात किंमत 52.8 अरब रुपये आहे. ताजमहाल ला तयार करण्यासाठी 20 हजार मजदुर लावले होते. असे सांगितले जाते की ताजमहाल तयार झाल्यावर शाहजहान ने या मजुरांचे हात कापून टाकले होते.

ताजमहल ची रचना प्राचीन मुघल कलांवर आधारित आहे. ताजमहाल च्या निर्माण कार्यात बहुमूल्य व महागडे पांढरे संगमरवर वापरण्यात आले होते. या शिवाय लाल व इतर लहान मोठे 28 प्रकारचे दगड गोटे वापरण्यात आले आहेत. ये दगड चमकदार व कधीही काळे न पडणारे आहेत. यातील काही दगडे रात्रीच्या अंधारात चमकतात.जगातील सर्वात सुंदर इमारत असलेल्या ताज महालाच्या भिंतीवर सुंदर नक्षी करण्यात आल्या आहेत. ताज महालाच्या वरच्या बाजूला 275 फूट उंच विशाल गुंबद बनवण्यात आले आहे, हे गुंबद ताजमहलच्या सुंदरतेला आणखी वाढवते. 

ताजमहल जगभरातील लोकांच्या आवडीचे ठिकाण आहे. सफेद सांगमरवरापासून बनवलेल्या ताजमहल चे सौन्दर्य चांदण्या रात्री आणखीनच वाढून जाते. ताजमहल भारताच्या अर्थव्यवस्थेत देखील महत्वाची भूमिका बाजावते. भारत शासनाला ताजमहल पहायला येणाऱ्या पर्यटकांकडून दरवर्षी करोडो रुपयांची कमाई होते. भारताचे जवाबदार नागरिक असल्या कारणाने आपले कर्तव्य आहे की आपण ताज महल व देशातील इतर प्राचीन कलाकृतींचे रक्षण करायला हवे.     

--समाप्त--

वाचा> ताजमहाल विषयी संपूर्ण माहिती


तर मित्रांनो हा होता ताजमहाल मराठी निबंध. आम्ही आशा करतो की तुम्हाला Taj Mahal essay in Marathi हा निबंध आवडला असेल व तुमच्या शालेय अभ्यासात उपयोगाचा देखील ठरला असेल. आपणास हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने