[जीवन चरित्र] संत तुकाराम महाराज मराठी माहिती | Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम हे 17 व्या शतकातील महान वारकरी संत व लोककवी होते. तुकाराम महाराजांनी सदेह (शरीरासह) वैकुंठगमन केले. पंढरपूरचे विठ्ठल किंवा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकाराम त्यांचे अभंग व भक्ती कवितांसाठी प्रसिद्ध आहे. आजच्या या लेखात आपण संत तुकाराम महाराजांची मराठी माहिती- sant Tukaram information in Marathi मिळवणार आहोत. तर चला सुरू करूया संत तुकारामांच्या या जीवन चरित्र ला.



प्रारंभिक जीवन (sant tukaram mahiti in marathi)

संत तुकारामांच्या जन्माविषयी लोकांमध्ये अनेक मतभेद आहेत. तुकारामांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असलेल्या देहू गावात झाला. त्यांच्या जन्माचे वर्ष इ.स. 1568 ते इ.स. 1650 च्या आत सांगितले जाते. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते. तुकाराम यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. तुकोबां तीनही भावंडांमध्ये मधले होते. मोठा भाऊ सावजी तर धाकट्या भावाचे नाव कान्होबा होते. तुकोबांचा मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती.


तुकारामांचे वडील कुणबी समाजाचे असल्याने स्वतःचा व्यवसाय व लोकांना उदार पैसे देण्याचे काम करत असत. सोबतच शेतीव्यवसाय देखील करत असत. ते भगवान विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. भगवान विठ्ठलाला विष्णूचे अवतार मानले जाते. नंतरच्या काळात तुकारामांचा विवाह रखमाबाई शी करण्यात आला. रखमाबाई व तुकारामांना एक मुलगा संतू झाला. 


संत तुकारामांना साक्षात्काराची प्राप्ती 

तुकाराम 17-18 वर्षांचे असताना त्यांचे आईवडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्ती मुळे घर सोडून तीर्थाटन ला निघून गेला. या दरम्यान भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. थोरल्या भावाची बायको, रखमाबाई आणि संतू दुष्काळात गेले. गुरे ढोरे सर्व काही बुडाले. तुकारामांचे मन उदास झाले. अश्या परिस्थितीत तुकारामांनी देहू गावाजवळ भंडारा डोंगरावर विठ्ठलाची उपासना सुरू केली. तुकोबा हरी चिंतनात पूर्णपणे मग्न झाले. ध्यानाद्वारे शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला, असे म्हटले जाते की तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले. 


संत तुकारामांचे दुसरे विवाह 

नंतरच्या काळात तुकारामांनी पुन्हा एकदा लग्न केले. या वेळी त्यांच्या विवाह जिजाबाई यांच्याशी झाला. परंतु साक्षात्कार नंतर ते आपला अत्याधिक वेळ ईश्वर भक्तीत लावत असत. पूजापाठ भक्ती कीर्तन व अभंग लिहिण्यात ते आपला वेळ घालवत असत. असे म्हटले जाते की त्यांची पत्नी जिजाबाई ही धनी कुटुंबातील होती. ती स्वभावाने कठोर होती. तुकारामांची ईश्वरभक्ती पाहून ती त्यांना रात्रंदिवस टोमणे मारत असे. आपल्या पत्नीच्या व्यवहाराला कंटाळून तुकाराम नारायणी नदीजवळ जाऊन पोहोचले. परंतु तुकारामांच्या या निर्णयाला घाबरून त्यांच्या पत्नीने आपल्या दिराला पाठून त्यांना परत बोलावले व त्यांच्या मनाप्रमाणे राहण्याची सूट दिली.


संत तुकारामांचे कार्य- sant tukaram maharaj marathi information.

तुकारामांचा मूळ व्यवसाय सावरकरी करणे होता दुष्काळामुळे त्यांनी सावकारीत असलेल्या सर्व कुटुंबांना मुक्त केले. व जमिनीचे सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदी मध्ये टाकून दिली. नंतरच्या काळात तुकारामांनी अभंग लिहून कीर्तन करणे सुरू केले. तुकारामांच्या अभंगाच्या लोकांवर खूप परिणाम झाला. व्यवहाराची थोर शिकवण शब्दाशब्दातून देत असतानाच भक्तीचे रहस्यही त्यांनी उलगडून दाखवले. 


संत तुकाराम मृत्यू

काही विद्वानाद्वारे सांगितले जाते की संत तुकाराम शिवाजी महाराजांना भेटले होते. शिवरायांनी तुकारामांना आपले गुरू मानले होते. जवळपास 17 वर्ष लोकांना उपदेश करीत सन 1649 ते 1650 मध्ये त्यांनी देह त्यागला. या उलट काही लोकांचे मानने आहे की इसवी सन 1650 मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांना भगवान विठ्ठलाने सदेह वैकुंठात नेले. 


संत तुकाराम मराठी अभंग

संत तुकारामांचे काही अभंग पुढीलप्रमाणे आहेत


1) जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले |

तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ||


2) जन्माचे ते मूळ पाहिले शोधून |

दुःखासी कारण जन्म घ्यावा ||१||

पाप-पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी |

नरदेही येऊनी हानी केली ||२||

रजतमसत्व आहे त्याचे अंगी |

याचे गुणे जगी वाया गेला ||३||

तम म्हणजे काय नरक केवळ |

रज तो सबळ मायाजाळ ||४||

तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य |

करावा परमार्थ अहर्निशी ||५||


अर्थ: मानवी जन्माचे मुख्य कारण शोधल्यावर सापडले की दुःख भोगण्यासाठी हा जन्म झालेला आहे. पूर्वीच्या जन्मात केलेले पाप-पुण्याचे फळ भोगून मुक्त होण्यासाठी हा जन्म आहे. परंतु मनुष्य असा मौल्यवान नर देह मिळवूनही, मुक्त होण्याएवजी अधिक बंधनात फसत आहे. याचे मुख्य कारण राजस व तामस गुण आहेत. याच गुणांमुळे जन्म व्यर्थ जातो. तमोगुण नरका प्रमाणे दुःख व कष्ट देतो, रजोगुण प्रबळ मायाजाळ मध्ये फसवतो. तुकाराम महाराज म्हणतात की सत्वगुणातच हे सामर्थ्य आहे की मनुष्य सतत परमार्थाकडे अग्रेसर होत राहील.


Read More 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने